Read In
सोमवार 14 डिसेंबर 2020 च्या भारतातून न दिसणार्या खग्रास सूर्यग्रहणाचा परिणाम.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
सोमवार 14 डिसेंबर आज चंद्ररास वृश्र्चिक 23:25 पर्यंत, नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 23:25 पर्यंत व नंतर मूळ. आज खग्रास सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. हे ग्रहण वृश्र्चिक राशीस लागत असून ते धनु राशीत संपत आहे. तसेच ज्येष्ठा नक्षत्रा लागत असून मूळ नक्षत्र सुरू झाल्यावर पहिल्या तपासातील 58 मिनीटापर्यंत आहे.
संपूर्ण दिवसभर कोणकोणत्या राशीनी काय काय काळजी घ्यायची ते पाहुया.
वृश्र्चिक राशीच्या व ज्येष्ठा व मूळ नक्षत्राच्या व्यक्तीनी सर्वच बाबतीत काळजी घ्यावी.
मेष राशीच्या व्यक्तींच्या 8 व्या स्थानात हे ग्रहण होत असल्याने वाहन अपघात, दुखापत याबाबत जागरूकता पाळावी.
मिथुन:– या राशीच्या व्यक्तीनी शत्रू, गुप्तशत्रूं, हितशत्रू व प्रतिस्पर्धी यांच्यापासून सावध रहावे.
धनु:– या राशीच्या मंडळीनी कायदेशीर बाबीत जराही हलगर्जी पणा करू नये. तसेच आरोग्याच्या बाबतीत काटेकोर रहावे. सध्या कोरोना 19 च्या भिती ग्रस्त छायेत आपण वावरत आहोत. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या बाबतीतील सर्वच नियम पाळा. हाँस्पिटलायझेशनचा पण धोका आहे. वयस्कर मंडळींनी जपूनच वागावे. सोशल डिस्टनसिंग पाळावे व मास्कचा वापर करावा.
पुढील राशी नक्षत्राच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. ग्रहणाचा परिणाम किमान पुढील 15 दिवसापर्यंत रहात असल्याने ग्रहण संपले आता कांही काळजी नको करायला असा विचार करू नये.
मेष, नक्षत्र भरणी :– वाहन अपघात, कौटुंबिक नातेसंबंध बिघडण्यास कोणतेही कारण लागणार नाही. नोकरीत सहकारी, किंवा मित्रमंडळींवर जराही अवलंबून राहू नये.
सिंह, नक्षत्र पूर्वा फाल्गुनी :–कौटुंबिक स्वास्थ्य,, वाहनाची डागडुजी, शेतात आलेले पीक, भाजीपाला या सर्वांवर परिणाम होणार आहे तरी काळजी घेणे महत्वाचे आहे. आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या.
धनु, नक्षत्र पूर्वाषाढा :–आर्थिक व्यवहार करू नयेत. कर्ज घेऊ नये. कांहीही चांगले करायला गेलात तरी ते बिघडण्याचा धोका आहे. आजारपण येण्याचा धोका. डावा डोळा व पाऊलांची विशेष काळजी घ्यावी. मधुमेहीनी जराही उघड्या पावलानी वावरू नये.
हे ग्रहण ज्येष्ठा व मूळ नक्षत्रावर परिणाम करत असून मूळ नक्षत्रात मोक्ष करत आहे.
आश्लेषा, ज्येष्ठा व रेवती :–विद्यार्थी मुलामुलींनी आपल्या संकल्पना चुकीच्या नाहीत याची खात्री करून घ्यावी. तुम्ही ज्यांना आदर्श मानता ते खरच आदर्श आहेत काय याचा विचार करायला पाहिजे. ईतर लोक करतात म्हणून मलाही करायचेय या तत्त्वाने वागणारे अडचणीत येणार आहेत.
भरणी, पूर्वा फाल्गुनी, पूर्वाषाढा :–मनस्थिती बिघडेल. लहान सहान गोष्टीं मनावर परिणाम करतील तरी हा ग्रहांचा प्रभाव आहे हे लक्षात ठेवूनच वागा. व्यसन करणारे अडचणीत येतील. नटवेपणा, व नाटकीपणा करणार्याचा इतरांकडून तिरस्कार केला जाईल.
पुष्य, अनुराधा,व उत्तरा भाद्रपदा :–सरकारी, निमसरकारी खात्यातील अधिकारी वर्गाकडून पतप्रतिष्ठा कमी करणार्या घटना घडतील. तसेच अधिकारात काटछाट होईल किंवा कांही अधिकार वापरण्यावर बंधन येईल.
आता या ग्रहणाचा कोणाकोणाला चांगला परिणाम मिळणार आहे ते पाहुया.
कृतिका, उत्तरा फाल्गुनी व उत्तराषाढा :–सरकारी अधिकार्यांना मानाचे स्थान मिळेल. त्याच्या अधिकारात वाढ होईल व त्यांच्या हातून समाजाला उपयोगी असणारी कामे होतील. समाजाचा प्रतिसाद चांगला मिळेल तरी त्यांनी कामात झोकून द्यायला हरकत नाही.
रोहिणी, हस्त व श्रवण :–मनोबल वाढवणार्या घटना घडतील. ज्या कामांची बर्याच दिवसापासून भीती वाटतेय तीच कामे करायला घ्या. मानसिक दुर्बलता कमी होईल.मानसोपचार तज्ञांकडून जे उपाय करत आहेत त्याना सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
आश्लेषा, रेवती :–बौद्धीक चतुराई च्या कामात अग्रेसर रहाल. लोकांसमोर आदर्श निर्माण कराल. वकिली भाषेचा वापर करून समोरच्याला बोलूच देणार नाही. कोणत्याही प्रसंगात तत्क्षणी निर्णय घ्याल पण तरीही तज्ञांचा सल्ला घ्या. कांही वेळा बुद्धी चालणार नाही.
आजच्या ग्रहण स्पर्शाच्या वेळेची कुंडली सोबत देत आहे. त्यातील स्पष्टग्रहांवरून लक्षात येणार्या गोष्टी.
- संध्याकाळी 19:04 या वेळी मिथु. लग्न असून आर्द्रा नक्षत्र आहे व उप नक्षत्र स्वामी बुध व उपउप नक्षत्र स्वामी राहू आहे.
- रवि 28 अंश,58 कला वृश्र्चिकेत ज्येष्ठा नक्षत्रात असून उपनक्षत्रस्वामी शनि आहे.
- चंद्र 27 अंश 26 कला व ज्येष्ठा नक्षत्रात असून नक्षउपनक्षत्रस्वामी गुरू आहे
- बुध 25 अंश 52 कला व ज्येष्ठा नक्षत्रात असून उपनक्षत्रस्वामी राहू आहे.
- केतू 25 अंश 54 कला व मृगशीर्ष नक्षत्रात असून उपनक्षत्रस्वामी राहू आहे.
- शुक्र 5 अश 40 कला व अनुराधा नक्षत्रात असून उपनक्षत्रस्वामी शनी आहे. (युती नसली तरी नक्षत्र अनुराधा आहे.)
- ग्रहणांचा मोक्ष मूळ नक्षत्रात होत आहे.
कोष्टक क्रमांक 1. तारीख, वेळ ठिकाण
कोष्टक क्रमांक 2. के. फी. लग्न कुंडली.
कोष्टक क्रमांक 3.के.पी. कस्प कुंडली.
कोष्टक क्रमांक 4. के. पी. स्पष्टग्रह.
ग्रहणाचा परिणाम आपण किती दिवस असतो याचा विचार करूया. ग्रहण होताना राहू राशीचक्रात ज्या बिंदुवर असतो त्याच्यापासून 10 अंश मागे किंवा पुढे रवी आला असता ग्रहण होते. म्हणूनच याचा परिणामही 10 दिवस मागेपुढे धरून काळजी घ्यावी.
आपल्याकडे भारतात हे ग्रहण दिसणार नाही पण एक थेअरी आपण अशी मांडू की ग्रहण तर होत आहे, व दिसत नसले तरी परिणाम तर होणारच. आता आपणच याचा विचार करून ठरवुया. आजपर्यंत मी केलेला अभ्यासानुसार व अनुभवानुसार मला हेच अनुभव आल्याने मी हा लेख तुमच्यासमोर ठेवला आहे.
|| शुभं-भवतु ||
Good explanation.
Thanks.
Thank you Tai