weekly-horoscope-2020

साप्ताहीक भविष्य रविवार 13 डिसेंबर ते शनिवार 19 डिसेंबर 2020

Read In

 

साप्ताहिक भविष्य

साप्ताहीक भविष्य रविवार 13 डिसेंबर ते शनिवार 19 डिसेंबर 2020

साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.

weekly-horoscope-2020

रविवार 13 डिसेंबर ते शनिवार 19 डिसेंबर 2020 चे साप्ताहिक राशीभविष्य. 13 रविवार चंद्ररास  वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 25:39 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. 14 सोमवार चंद्ररास वृश्र्चिक 23:25 पर्यंत. नंतर धनु, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 23:25 व नंतर मूळ. 15 मंगळवार चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्र नक्षत्र मूळ 21:30 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. 16 बुधवार चंद्ररास धनु 25:47 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा 20:03 पर्यंत नंतर उत्तराषाढा. 17 गुरूवार मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 19:12 पर्यंत व नंतर श्रवण. 18 शुक्रवार चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 19:03 पर्यंत नंतर धनिष्ठा. 19 शनिवार चंद्ररास मकर 07:15 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 19:39 पर्यंत नंतर शततारका. वरील प्रमाणे प्रत्येक दिवसाच्या राशीनक्षत्रानुसार व  दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. 

सोमवार 14 रोजी अमावास्या 21:46 पर्यंत आहे. मंगळवार 15 रोजी देवदीपावली असून श्री मार्तंडभैरव षडरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. गुरूवार 17 रोजी बुध 11:38  वाजता धनु राशीत प्रवेश करत आहे. शुक्रवार 18 रोजी विनायक चतुर्थी आहे. शनिवार 19 रोजी नागपूजन, नागदिवे चा दिवस आहे. 

मेष:–13 व 14 रोजी सासुरवाडीकडून कांही महत्वाच्या आर्थिक बाबींवर चर्चा केली जाईल व त्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. तसेच हे दोन दिवस प्रवास मात्र करू नका. अडथळे येतील, व अपघात, दुखापत यासारखा त्रासही होईल. 15 व 16 रोजी लाभदायक घटना घडतील. भाग्योदयाचे संकेत मिळतील. तुम्ही करत असलेले काम नेटाने करायचे असा निश्र्चय व नियोजन केल्यास नक्कीच भाग्योदयाचे वाट सापडेल. 17, 18, 19  रोजी मात्र फक्त व्यवसायाबाबतचेच विचार करा. व्यवसायातील घडामोडींचा बारकाईने अभ्यास केल्यास यशाचे दिवस लांब नाहीत याची खात्री बाळगा. 

 

वृषभ :–13  व 14  रोजी तरूण वर्गाकडून वयस्कर मंडळींसाठी अतिशय मोलाचे सहकार्य होईल. बँकेची कामे व सरकारी अडलेल्या कामासाठी वेळ द्याल. उच्चशिक्षणातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न कराल. 15, व 16 रोजी व्यवसायातील लाभदायक गोष्टींचाच विचार कराल. नवनवीन युक्त्या, प्रयोग यांचा विचार केला जाईल. 17.,18, व 19 रोजी कलाकार मंडळींना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. नोकरी व व्यवसायाच्या दोन्ही ठिकाणी मित्रमंडळींचे व हाताखालील कर्मचार्‍यांचे भरघोस सहकार्य मिळेल..

 

मिथुन.:– 13 व 14 रोजी नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित  असलेला बदल लवकरच होणार असल्याची सुचना मिळेल. वैवाहिक जीवनातील अडचणीत मात्र आज वाढ होणार आहे तरी नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. 15 व 16  रोजी व्यवसायातील अडीअडचणीं वर चर्चेने उपाय सापडेल. तसेच भागिदाराकडून आर्थिक मदतीचा हात मिळेल. 17.,18.,व 19 रोजी कांही महत्वाची कामे करून घेण्यासाठी आर्थिक देवघेव करावी लागेल. पण तुमच्याकडूनच काम होणार असेल तर आर्थिक व्यवहार अंगाशी येईल तरी जपूनच करावेत. 

 

कर्क :–13. व 14  रोजी नव्याने गुंतवणूक करणार असाल तर अभ्यासपूर्ण व्यवहार करा. कारण हा व्यवहार फार मोठा लाभ करून देणार आहे. शेअर मार्केट मधे व्यवहार करताना तज्ञांच्या मतानेच करा. 15 व 16  रोजी महत्च्याच्या मौल्यवान वस्तुंची खरेदी कराल. आईकडील नात्याकडून चिंतेची बाब निर्माण होईल. राजकिय मंडळीना आपले शत्रू माघार घेत असल्याचे किंवा निष्क्रिय होत असल्याचे जाणवेल. 17, 18 व 19 रोजी पोटदुखीचा त्रास  सतावेल. बाहेरील खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.  अधिकारी वर्गाने आपले अधिकार वापरताना जागरूक रहावे. 

 

सिंह :–13. व 14 रोजी ज्यांची कफ प्रवृत्ती आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. फुफ्फुसांचा विकार असलेल्यांना विकार बळावण्याचा धोका आहे तरी बेफिकीर राहू नये. 15  व 16 रोजी बुद्धीजीवी वर्गाकडून अतिशय महत्वाची बौद्धीक कौशल्याची कामे घडतील. मंत्र्यांचे पी. ए., सरकारी अधिकारी वर्ग यांचेकडून जनतेच्या हिताच्या योजनांचा आढावा घेतला जाईल. 17,  18 व 19 रोजी नोकर वर्गाकडून उल्लेखनीय कामगिरी होईल. महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तु यांची चोरी होण्याचे भय आहे तरी काळजी घ्यावी लागेल. पूर्वी केलेल्या कांही चुकीच्या कामाबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागेल. 

 

कन्या :–13 व 14 रोजी महत्वाचा पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. आँफीसमधील कामासाठी आँफीस च्या बाजूने कोर्टात जावे लागेल. 15  व 16 रोजी ऐश्र्वरयवान कुटुंबाना एखाद्या संकटाला सामोरे जावे लागेल. तरूणांना मनातील इच्छा अपेक्षांच्या आहारी जाऊन चालणार नाही. 17,  18 व 19 रोजी लेखन व काव्य करणार्या मंडळींना गगन ठेंगणे वाटेल व त्यांच्याकडून आकाशाला गवसणी घालण्याची तयारी सुरू होईल. प्रेमप्रकरणात शुद्ध विचाराने वागल्यास  तुम्हाला यश येईल. 

 

तुळ :–13  व 14  रोजी वडिलार्जित धनाबाबत सर्वांच्या एकमताने तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल व खरोखरच तुमची जबाबदारी वाढेल. राजकीय व खाजगी कोणत्याही ठिकाणी तुम्ही तुमचे वाक् चातुर्य दाखवाल व पाहणारे भारावून जातील. 15 व 16 रोजी एक्स्पोर्ट इंम्पोर्ट, तसेच दळणवळणाच्या खात्यात काम करणार्यांना अतिशय जागरूक रहावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळणे काहीसे अवघड जाईल. 17.   ,18   व 19  रोजी अँग्रीकल्चर शाखेच्या पदाधिकार्यांना अवघड व जबाबदारीचे काम स्विकारावे लागेल. त्यात तुमच्या कार्य कौशल्याचा कस लागेल. 

 

वृश्र्चिक :–13 व 14 रोजी तुमच्या स्वभावातील धाडसी वृत्ती अचानकपणे उफाळून येईल. तुमची बलस्थाने ओळखूनच मग कार्य हातात घ्या व कार्याची दिशा ठरवा. 15  व 16 रोजी शासकिय, निमशासकीय आश्रमशाळा, वृद्धाश्रम यांच्याबरोबर वाटाघाटी होऊन त्याच्या हितासाठी आग्रही रहाल. व्यावसायिकांच्या हातात आलेली एखादी मोठीस़ंधी निसटून जाईल. 17, 18 व 19 रोजी तुम्ही जिद्धीने यश मिळवण्यासाठी ग्राउंड लेवलच्या कामात सहभागी व्हाल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधक त्रास देतील तरीही तुमची ताठर भूमिकेला चिकटूनच रहाल. 

 

धनु :–13 व 14 – रोजी समाजाच्या बाजूने महत्वाच्या प्रश्र्नांची फोड करण्याचे काम तुमच्यावर सोपवले जाईल. तुम्ही तयार केलेल्या प्रश्र्नांना इलेक्ट्राँनिक माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले जाईल.15. व 16  रोजी सामाजिक स्तरावर काम करणार्या सच्चा कार्यकर्त्यांना विरोधकांकडून आरोप च्या पिजर्यात उभे केले जाईल. 17 18 व 19 रोजी वडिलांकडील नातेवाईकांना मदत करण्यासाठी विनंती केली जाईल व तुमच्याकडूनही आवश्यकतेपेक्षा जास्त मदत केली जाईल. 

 

मकर :–13 व 14 रोजी वडील भावंडाकडून तसेच मित्रांकडून न मागताही मोठी मदत मिळेल व तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. वयस्कर मंडळीना 15 व 16 रोजी सुना, जावई यांच्याकडून प्रेमाचा वर्षाव होईल  व त्यांच्याकडून सुग्रास भोजनाचा बेत ठरविला जाईल. तरूणांना त्याच्या व्यवसाय वृद्धीचे मार्ग सापडत असल्याचे जाणवेल. 17, 18, व 19  रोजी एखादा तयार उद्धोगधंदा चालवण्याची आँफर मिळेल तरी बारकाईने अभ्यास करून निर्णय घ्या. तज्ञांचिही मदत घ्या. 

 

कुंभ :–पितृसुखाला पारखे झालेल्यांना 13 व 14  रोजी पितृसुखाचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कतृत्वाने तुम्हाला आदर्श मानले जाईल. 15  व 16  रोजी मंत्रतंत्रांच्या अभ्यासकांना उत्तम गुरू मिळेल व त्यांच्या कर्तृत्वाने भारावून जाल. शिक्षण, व्यापार याऐवजी स्वतःतील संन्यासी वृत्ती वाढू लागेल. 17, 18  व 19 रोजी बहीण भावांचे संबंध वृद्धींगत होतील व एकमेकांविषयी चा जिव्हाळा वाढेल. काका व आत्या यांच्या प्रेमळ वृत्ती पुढे भारावून जाल व त्यांच्या मनाला आनंद देणार्‍या गोष्टी घडतील.

 

मीन :–13 व 14 रोजी संत सज्जनांची संगत लाभेल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्‍यांना श्री गुरूमाऊलीकडून आशिर्वाद मिळेल. 15  व 16 रोजी वयस्कर मंडळीना मेहुणे, भावजय व, नातवंडे यांच्यासाठीही विशेष आर्थिक तरतूद करण्याची इच्छा निर्माण होईल. कुटुंबातील इतर सदस्यही स्वतःहून त्यात सहभागी होतील. दत्तक पुत्राच्या मदतीने एक मोठे प्रोजेक्ट पूर्णत्वाला घेऊन जाल. आई वडीलांच्या जून्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचा मानस व्यक्त कराल. तुम्हाला 17 , 18  व 19 रोजी समाजासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जाईल. 

 

  ||  शुभं-भवतु  ||

 

One thought on “साप्ताहीक भविष्य रविवार 13 डिसेंबर ते शनिवार 19 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *