Read In
शुक्रवार 11 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शुक्रवार 11 डिसेंबर 2020 आज चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 08:47 पर्यंत व नंतर स्वाती सुरू होत आहे. आज भागवत एकादशी आहे. वरील रास व नक्षत्राचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–कुटुंबाततील जोडीदाराबरोबरील चर्चेतून वादग्रस्त विषय वाढत जातील. तरी सुरूवातीलाच हे लक्षांत ठेवा. राजकीय व्यक्तींनी सध्या व्यावहारिक विचार करावा. भावनेत अडकून व्यवहार करू नयेत. शक्यतो रोखीने व्यवहार करू नयेत.
वृषभ :–आज तुमच्या मनाला सकाळपासूनच कांहिशी हुरहूर वाटेल. कोणत्याही कामात विशेष लक्ष लागणार नाही. स्वतः वाहन चालवून प्रवास करू नये व शक्यतो दुसर्याच्या वाहनावरही बसू नये. दुखापतीचा दाट संभव आहे.
मिथुन :–नोकरीत आज फार चाणाक्षपणे वागावे लागेल. ज्या कामाला तुमच्याकडून उशीर झाला आहे त्याला तुम्हीच जबाबदार असल्याचा आरोप केला जाईल. कलाकार मंडळींना शालेय शिक्षण विभागाकडून एखादी जबाबदारी सोपवण्यात येईल.
कर्क :–लहान मुलांना आगीपासून सांभाळावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाबरोबर स्पर्धात्मक वातावरण निर्माण करू नका. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. किडनीचा त्रास असलेल्यांनी बेफिकीरीने वागू नये.
सिंह :–जबाबदारीच्या पदावर असलेल्यांनी कोणतीही निर्णयप्रक्रिया घाईघाईने घेऊ नये. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीला आजचा दिवस चांगला आहे. आजची गुंतवणूक लाभदायक होईल. वयस्कर मंडळीना हाडे दुखण्याचा त्रास होईल.
कन्या :–कुटुंबात मुलीच्या विवाहाचे बाबतीत विचार विनिमय सुरू होईल. मुलीचा विचारही महत्वाचा राहील.जूनी वास्तू विकण्याचे विचार होतील पण त्यासाठी एकमताने विचार करणे महत्वाचे राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकारात असलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करा.
तूळ :–जून्या पोटदुखीच्या त्रासावर तज्ञांकडून उपाय करावेत हलगर्जी पणा करू नये. व्यवसायात अचानक लाभदायक बाबींची माहिती मिळेल. डाव्या डोळ्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. आजचा दिवस सामान्य आहे.
वृश्र्चिक :–कायद्याच्या बाबतीत जराही चालढकल करू नका. महत्वाच्या कामात वकिलांची मदत घ्या. आयुष्यातील ताण तणावदूर ठेवायचे असतील तर तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलावा लागेल. प्रेमाच्या व्यवहारात नातेसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.
धनु :–आजचा दिवस हा कुटुंबासमवेत राहून कौटुंबिक आनंद घेण्याचा आहे. आजोळकडील नातेवाईकांचे येणे होईल. लहान लहान मुलांची घरात गडबड राहील. ज्येष्ठांनी दिलेला शब्द पाळण्याचा प्रसंग निर्माण होईल. तिखट, चमचमीत जेवणाचा बेत होईल.
मकर :–मान सन्मानाने चकित व्हाल. सरकारी पदाधिकार्यांचे शाही स्वागत होईल. ज्या ठिकाणी असाल तेथे सन्नानच होईल. तुमच्याकडून चार उपदेशाचे शब्द ऐकण्यास लोक आतुर होतील. समोरील लोक तुम्हाला गुरूसमान आदर करतील.
कुंभ :–मनातील इच्छा आकांक्षा ओपनली व्यक्त कराल. तुम्हाला गुरूस्थानी मानलेल्यांकडून तुमच्या कतृत्वाचे कौतुकच होईल. सरकारी कामातही तुमचा धबधबा राहील. कुटुंबातील सदस्यांना प्रेमाचे भरते येईल.
मीन :–आज तुमच्याकडून समाजातील चुकीच्या रूढीबाबत कडवे व रोखठोक विचार व्यक्त होतील. व्यावसायिकांनी आपले मार्केटींग कसे करावे याचा विचार करण्यास योग्य वेळ आहे. लहान मुलींनी आपले लक्ष फक्त अभ्यासाकडेच वळवावे.
|| शुभं-भवतु ||
Aabhari Aahe Tai