Read In
गुरूवार 10 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
गुरूवार 10 डिसेंबर चंद्र रास कन्या 21:51 पर्यंत नंतर तूळ व चंद्रनक्षत्र हस्त 10:50 नंतर चित्रा. आज शुक्राचा वृश्र्चिक राशीत प्रवेश 29:16 ला होणार आहे. आज स्मार्त एकादशी आहे.वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजोळ कडील नात्याच्या मदतीने व्यवसायातील तीढा सुटण्याचे मार्ग सापडतील. ओटीपोट व कंबर दुखीचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. खाजगी नोकरीतील अधिकारी मंडळीना आपले अधिकार धोक्यात येत असल्याची जाणिव होईल.
वृषभ :– काव्य लेखन करणार्यांना एक उत्तम संधी मिळणार आहे तरी त्याचे सोने कसे करायचे याचा आधीच विचार करून ठेवा. लांबच्या प्रवासाच्या पल्ल्यात अचानक प्रवास खंडित करावा लागेल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल.
मिथुन :–गुप्त ठेवलेल्या गोष्टींना कोणाजवळही ओपन करू नका अन्यथा त्याला बाजाराचे स्वरूप येईल. विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी मनोबल वाढवावे लागेल. बागकामाची आवड असणार्यांना आपली हौस भागविता येणार आहे.
कर्क :–गायक व शिकाऊ गायकांना आपली कला सादर करण्याची चांगली संधी मिळणार आहे. वयस्कर मंडळीना उजव्या कानाचा काहितरी त्रास निर्माण होईल. कुटुंबात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. आज जागेचा कोणताही व्यवहार करू नका.
सिंह :–समारंभाच्या निमित्ताने महिलांना नटण्या सजण्याची संधी मिळेल. गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेला प्रकृतीचा त्रास कमी होऊ लागल्याचे जाणवेल. लहान मुलांवर लक्ष ठेवावे लागेल ते नाकात कांहीतरी घालण्याची व दुखापतीचा धोका संभवतो.
कन्या :– वकिलांना समोरच्या पार्टीच्या कारवायांवर शंका येऊन त्याच्या विरूद्ध अँक्शन घेतली जाईल. लहान मुलांची अचानक आज बंडखोरी वृती वाढल्याने मित्रांबरोबर मारामारी करूनच घरी येतील. ज्येष्ठ मंडळींच्या मनातील विचारांचा सुगावा लागणार नाही.
तूळ :–र्हदयविकार असलेल्यांनी तब्बेतीकडे जराही दुर्लक्ष करू नये. सर्वाना तरूणांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील. तरूण मुलींना अचानक सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा निर्माण होईल. दत्तक मुलीस मानसिक धैर्य दाखवावे लागेल.
वृश्र्चिक :–आज आपण आपल्या मनाजे राजे आहोत हे ज्ञात घ्या. सर्वच गोष्टी आज तुमच्याच मनासारख्या होणार आहेत. शिक्षक वर्गास हातातील प्रोजेक्ट अतिशय योग्य पद्धतीने यशस्वी होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर प्रवास करावा लागेल.
धनु :–सार्वजनिक कामातील तुमचा सहभाग मोलाचा ठरेल. ज्येष्ठ महिलांनी शारिरीक कष्ट करताना विचार करावा, पायाचे, गुडघ्याचे आँपरेशन झालेले असल्यास विशेष काळजी घ्यावी लागेल दुखापत होण्याचा किंवा पडण्या धडपडण्याचा धोका आहे.
मकर :–महिलांना सासूबाई किंवा सासरच्या नात्याबरोबर प्रवास करावा लागेल. वडिलांची सेवा करावी लागेल व त्यातून आनंद मिळेल. तरूणांनी हवेत इमले बांधण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा. महिलांना लहान भावंडांबरोबर जमवून घ्यावे लागेल.
कुंभ :–स्वभावातील अतीधाडसीपणाचा त्रास होऊन अडचणीत याल व संकट ओढवून घ्याल. तरूणांना आजपर्यंत कधीही न वाटणारी काही तात्विक विचार मान्य होतील. व्यावसायिकांना बँकेच्या ओव्हरड्राफ्टबाबत बँकेकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मीन :–नव्याने घेतलेल्या वाहनात अचानक काहीतरी बिघाड निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाची, मेहनतीची योग्य दिशा ठरवल्यास चांगले यश मिळेल. कौटुंबिक वातावरण अतिशय आनंदाचे व उत्साहाचे राहणार आहे.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai