Read In
बुधवार 09 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
बुधवार 09 डिसेंबर आज चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 12:32 पर्यंत व नंतर हस्त. वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–आज तुमच्या मनात आरोग्याबाबत उगाचच शंकेची पाल चुकचुकणार आहे. सर्व ठिक असूनही शंकांचे काहूर उठेल. त्यामुळे मानसिक दडपण येईल. आज बातम्या बघून त्याचाच विचार करत बसाल. डाँक्टरांशिवाय इतर कोणाचाही सल्ला घेऊ नका.
वृषभ :–प्रथम अपत्याकडून आनंद व समाधान देणारी बातमी कळेल. लेखक मंडळींना जूने आजपर्यंत रखडलेले मानधन मिळेल. नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागाल. नोकरीत सहकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. व कामाचे क्रेडिट ही मिळेल.
मिथुन :–आज सकाळपासूनच कामाची धांदल उडणार आहे. कामाच्या महत्वानुसार त्याला अग्रक्रम द्या व नंतर काम सुरू करा. डोळ्यांना दुखापत किंवा मोठी इजा होण्याची शक्यता आहे. महिलांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवल्यास पुढील त्रास होणार नाही.
कर्क :–व्यवसायात किंवा मार्केटमध्ये सध्या गुंतवणूकीची गरज निर्माण होईल. शारिरीक कष्ट करणार्यांनी न झेपणारे काम अंगावर घेऊ नये. मानसोपचाराची गरज असलेल्यांनी वेळ न दवडता डाँक्टरांचा भेट घ्यावी व सल्ला पण ऐकावा.
सिंह :–खरेदीचा मूड उसळून येईल पण आज अविचाराने खरेदी करू नका. आई, मावशी यांच्याकरिता दवाखान्यात जावे लागेल. मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज वडील बबंधुसमोर बाहेर काढाल. कुटुंबातील अडचणींवर उपाय सापडेल.
कन्या :–कुटुंबातील आदर्श वाटणार्या मान्यवर महिलेच्या सन्मानासाठी मोठा खर्च कराल. वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यावसायिकांच्या हातात आलेली एखादी मोठीस़ंधी निसटून जाईल. मानसिक आजार असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये.
तुळ :–राग व प्रेम या दोन्ही वृतींचे दर्शन आज तुमच्या वागण्यातून दिसेल. सार्वजनीक कामात घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरेल. तरूण वर्गास हातातील प्रोजेक्टमध्ये अडचणी निर्माण होतील. महिलांचे मूडस् बदलत राहतील.
वृश्र्चिक :–:काल केलेल्या कामावर पुन्हा नजर टाकावी लागेल. आज पुन्ः त्याबाबतची चर्चा करण्यापेक्षा आवश्यक तेथे दुरूस्ती करा. तरूण वर्गास आपल्या नावाने लोक ओळखत असल्याचा आनंद मिळेल. वडिलांच्या नात्यातील लहान मुलांची प्रकृती बिघडल्याने कळेल.
धनु :–डाँक्टर मंडळीना पेशंटसाठी समुपदेशनाचे कामही करावे लागेल. शिकाऊ डाँक्टर्सना कामाचा मोठा ताण जाणवेल. व्यावसायिक जुने येणे मिळवण्याचे नवीन मार्ग सापडतील. महिलांच्या क्राँनिक दुखण्यांवर डाँक्टरांकडून आवश्यक ती ट्रिटमेंट मिळेल.
मकर :–विद्यार्थ्यांना आपले संशोधन कार्य योग्य मार्गाने जात असल्याचे जाणवेल व तशी वरिष्ठांकडून पोचही मिळेल. सरकारी नोकरदारांनी कामात केलेल्या तत्परतेबद्धल. त्यांना मानपत्र मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील तरूणांना विशेष संधी मिळेल.
कुंभ :–कुटुंबातील एकोपा टिकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न कराल. आर्थिक बाबतीत जरी एकवाक्यता झाली नाही तरी इतर बाबी सुरळीत सुरू राहतील याची खात्री पटेल. स्वभाव उतावळा बनल्यानेप्रत्येक गोष्टीत घाई कराल व कामाचा गोंधळ होईल.
मीन :–नोकरीत वरिष्ठ पदावर असलेल्यांना गुप्तशत्रूंचा त्रास होईल. अधिकारी वर्गाने आपल्या अधिकाराचा गैरवापर होत नसल्याची खात्री करून घ्यावी. व्यावसायिकांनी बाजारातील नवा कल बघून योजना आखल्यास व्यवसाय वृद्धी चांगली होईल.
|| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai