daily horoscope

दैनिक राशीभविष्य मंगळवार 08 डिसेंबर 2020

Read In

 

मंगळवार 08 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

मंगळवार 08 डिसेंबर आज चंद्ररास सिंह 19:31 पर्यंत वनंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 13:47 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–कोणत्याही कामाची घाई करू नका. व्यवस्थित नियोजन केल्याशिवाय कामाला सुरूवात करू नका. कुटुंबातील आनंदाच्या क्षणी प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी द्या. लहान मुलांना त्याच्या चुकांवर बोट ठेवण्यात ऐवजी योग्य काय आहे याची कल्पना द्या.

वृषभ :–महत्वाच्या कामात आईचा सल्ला मोलाचा ठरेल. ज्येष्ठ महिलांनी सारासार विचार केल्याशिवाय कोणताही सल्ला देऊ नये. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षित कामांची पूर्तता वेळेत करावी लागेल. लहान मुलांचा हट्ट पुरवताना मनावर संयम आवश्यक राहील.

मिथुन :–नोकरीतील पेडींग कामाना महत्व देऊन त्यांची सुरूवात करावी लागेल. कोर्टातील कामातील दिरंगाई किंवा दुर्लक्ष एकंदर महागात पडणार आहे. स्वतंत्रपणे व्यवसाय करणार्यांना आज एखाद्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागेल.

कर्क :–व्यवसायातील आर्थिक बाबी कमी जास्त होतील हे फक्त आज व उद्याच होणार आहे काळजी करू नका. बाजारातील लहान खरेदीचे निमित्त साधून मोठी खरेदी कराल. तरूण वर्गास चमचमीत खाण्याची इच्छा होईल. दुसर्‍यांच्या विचाराने वागू नका.

सिंह :–आपल्या मनातील ईमले किती चुकीचे आहेत याची स्पष्टपणे कल्पना येईल. तरूणांनी कोणतेही काम आततायीपणा करू नये. घराच्या विक्रीचा व्यवहार कितीही पटला असला तरी आज त्या व्यवहारास सुरूवात करू नका, व्यवसाय रेंगाळेल.

कन्या :– नाजुक पचनशक्ती च्या मंडळीनी पोटाची काळजी घ्यावी. अगदी हलक्या आहाराच्या अपचनाचा सुद्धा त्रास होईल. लहान मुलांच्या नाकाचा प्राँब्लेम उद्भवेल. स्वतःच्या मालकीच्या जागेतील व्यवसाय जोरात चालणार असल्याचे संकेत मिळतील.

तुळ :– महिलांना कांही महत्वाच्या क्षणी आपण दुर्बल असल्याची भावना निर्माण होईल. धाडसाने प्रसंगाला सामोरे गेल्यास प्रसंगाची भिती निघून जाईल. मानसिक कमकुवत महिलांनी आज एटीम मार्फत कोणतेच आर्थिक व्यवहार करू नयेत.

वृश्र्चिक :–दत्तक नात्यातील मंडळींची प्रत्यक्ष भेट होईल व अडचणींच्या प्रसंगावर मार्ग काढाल.ज्येष्ठांनी मुलीच्या लग्नाची उगीच घाई करू नये. विचारपूर्वक निर्णय घ्यावा. बहिण भाउ एकमेकाच्या प्रेमाखातर स्वतः नुकसान सोसून व्यवहार करतील.

धनु :–वयस्कर मंडळीना पोटदुखीचा त्रास जाणवेल. प्रेमविवाह ठरलेल्या मुलामुलींना अचानक एकमेकांमधील दोष दिसू लागतील व नातेसंबंधात दुरावा निर्माण होईल. बँकेत पैसे ठेवणे किंवा काढणे यासारखी कोणतीही जोखमीची कामे करू नका.

मकर :–टेक्निकलच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यानी आपल्या प्रोजेक्टकडे विशेष लक्ष द्यावे. इतरांवर अवलंबून राहू नये. डॉक्टर मंडळींना अचानक मोठ्या प्रमाणात कामाचा लोड वाढेल. केवळ गप्पा मार आर्या लोकांशी आज भेट होईल व वेळ वाया गेल्याचे जाणवेल.

कुंभ :–नाक, कान, घसा तज्ञ डाँक्टर्सना गुंतागुंतीच्या केसमधे लक्ष घालावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून आवश्यक व अपेक्षित सहकार्य मिळेल. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आवश्यक राहील आज दुखापत होण्याची शक्यता आहे.

मीन :–आज करण्यात येणारी गुंतवणूक उद्याला लाभदायक राहणार आहे. वकिल मंडळीनी जून्या पेडींग केसेसना बोर्डावर आणण्याचा प्रयत्न केल्या आजचा दिवसाचा उपयोग करून घेता येईल. कामाचे महत्व ओळखूनच पैसे खर्च करावेत इतरांच्या सांगण्यावरून करू नये.

|| शुभं-भवतु ||

 

One thought on “दैनिक राशीभविष्य मंगळवार 08 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *