Read In
सोमवार 07 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
सोमवार 07 डिसेंबर आज चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 14:31 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. वरील रास नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज कालभैरव जयंती आहे.
मेष :–आज तुमच्या सगेसोयर्यांकडून कौतुकाची बरसात होणार आहे. व्यावसायिकांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायातील गुंतवणूक वाढवण्यास हरकत नाही. औषधी क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. लहान मुलांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. मशीनवर काम करणार्यांनी विशेष काळजी घ्यावी.
वृषभ :–वयस्कर मंडळीना सुग्रास जेवणाचा व आवडत्या पदार्थांचा आनंद मिळेल. वडिलांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या मानपानासाठी आर्थिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. कुटुंबातील सदस्यांची व्यक्तिगत पातळीवर काळजी घ्याल व त्यांच्या गरजांकडे लक्ष द्याल.
मिथुन :–ज्येष्ठ महिलांना घरगुती वस्तु खरेदी करण्याचा मोह आवरता येणार नाही. लहान भावंडांच्या अडीअडचणींकडे बारकाईने लक्ष दिल्यास मनस्ताप वाचेल व परिस्थितीतून मार्ग काढणे सोपे जाईल.तरूणांना आपल्या आवडत्या कामासाठी वेळ देता येणार आहे.
कर्क :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध वृद्धींगत होण्यासाठी नम्रपणे व्यवहार करा. कुटुंबातील सदस्यांचे एकमेकाबरोबरचे संबंध अतिशय सुखसमाधानाचा राहण्यास सुरूवात होईल. सरकारी योजनांतून मिळणार्या कामांची माहिती घेतल्यास उत्पन्नाचा एक स्त्रोत सापडेल.
सिंह :– तरूणांनी आपले इगो सोडून दिल्यास काम करणे सोपे जाईल व तुमच्याविषयी असलेले गैरसमज वाढणार नाहीत. वयस्कर मंडळीनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी व डाँक्टरांच्या सल्ल्यानेच वागावे. बोलताना संदर्भ लागणार नाहीत अशी वक्तव्ये करू नका.
कन्या :–लहान मुलांच्या डाव्या डोळ्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. नोकरीत महत्वाच्या कामाचे पेपर्स सापडणार नाहीत किंवा काँम्प्युटरमधील एखादी फाईल करप्ट होईल व मनस्ताप वाढेल. कुटुंबातील कर्तृत्ववान महिलेचा आदर्श नजरेसमोर ठेवून कामाची दिशा ठरवाल.
तूळ :–तुमच्या बोलण्यातील वकीली भाषा तुम्हाला अडचणीत आणेल तरी कोणतीही गोष्ट अती ताणू नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणतेही नवीन कामाला आज सुरूवात करताना पूर्ण विचार करून व स्वतःचा आवाका ओळखून करा.
वृश्र्चिक :–कोणत्याही चळवळीत काम करत असाल तर प्रथम परिणामांचा विचार करा व मगच कामाला सुरूवात करा. आनंदाच्या भरात स्वतःची गुपिते उघड कराल. पतीपत्नीच्या नात्यात अचानक वादग्रस्त विषयांवर चर्चा सुरू होईल. सामाजिक पातळीवर प्रतिष्ठा वाढत असल्याचे जाणवेल.
धनु :–उच्चशिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी आपल्या प्रयत्नांबरोबर तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. नोकरीत अधिकारी वर्गाकडून कामातील क्लीष्ट प्रश्न सुटेल व मोठे कौतुक होईल. महत्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यापूर्वी साधकबाधक विचार करून व तज्ञांबरोबर चर्चा करून घ्यावी.
मकर :–कामाच्या अग्रक्रमानुसार त्याचे नियोजन केल्यास काम करणे सोपे जाणार आहे. नोकरीत जून्या सहकार्यांची भेट होऊन नवी उर्जा मिळेल. अडकलेल्या कामाना प्राधान्य दिल्यास निदान कामाला सुरूवात होईल. लहान भावंडांबरोबर वैचारिक खटके उडतील तरीही त्याला समजून घ्यावे लागेल.
कुंभ :–व्यवसायातील नव्या मार्गांची माहिती मिळेल व व्यवसाय वृद्धीचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून महत्वाचे मार्गदर्शन मिळेल. मनातील द्विधा मनस्थितीवर मात करून योग्य निर्णयाला येण्यासाठी पूर्वग्रह सोडून विचार करावा लागेल.
मीन :–व्यवसायातील वृद्धीसाठी नात्यातून मोठी आर्थिक मदत मिळेल. वयस्कर मंडळीना विसेमरणाचा त्रास जाणवत असल्यास त्वरीत डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. गूढविद्ध्या, मंत्रशास्त्र शिकण्याची इच्छा निर्माण झालेल्यांनी तज्ञ व योग्य गुरूकडून मार्गदर्शन घ्यावे.
|| शुभं-भवतु ||