Read In
शनिवार 05 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
5 डिसेंबर शनिवार 2020 आज चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 14:26 पर्यंत. नंतर आश्लेषा. वरील दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–मनाची चलबिचल वाढेल. जोडीदार लांब असलेल्या स्त्रीयांनी आपले मन एखाद्या छंदात रमवावे. नोकरीत अडचणी निर्माण झालेल्या प्रश्नावर शांतपणे विचार करूनच निर्णय घ्या. आपल्या इच्छेऐवजी परिस्थितीला जास्त महत्व देऊन व्यवहार करा. आनंदाच्या भरात स्वतःची महत्वाची गोष्ट देऊन टाकाल.
वृषभ :–आपल्या बोलण्यात स्पष्टता ठेवा. कमकुवत बोलण्याने काहीच साध्य होणार नाही. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेतल्या तर तुमच्याच मनाला त्रास होणार आहे. व्यावसायिकांनी बाजारातील नवा कल बघून योजना आखल्यास व्यवसाय चांगला चालेल.
मिथुन :–योग्य वेळी माघार घेतली तर विषय जास्त चिघळणार नाही. तरूण मुलामुलींना नाच गाण्यात जास्त इंटरेस्ट निर्माण होईल.थरांवर टिका करण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीचा वेगाकडे लक्ष द्या. इलेक्ट्राँनिक्सच्या क्षेत्रातील मंडळीना कामाचा आवाका आवरणार नाही.
कर्क :–मनातील इच्छा प्रत्यक्षात पूर्ण होणार आहेत याचे संकेत मिळतील त्याबाबत जागरूक राहून काम तसेच पुढे सुरू ठेवा. व्यवसायात मोठी उलाढाल न करता व्यवसाय कसा सुरू ठेवता येईल याचा विचार करा. वाहनावर अचानक खर्च निघणार आहे. घरासाठी कर्जाचा विचार सध्यातरी करू नका.
सिंह :–आज तुमच्या स्वभावातील आक्रमकपणा अचानक उफाळून येणार आहे. सरकारी अधिकारी वर्गाने आपले विचार पूर्ण अभ्यासून मगच मांडावेत. आज हातात घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी इतरांना वेठीला धरू नका. मधुमेहीना आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या :–कालपर्यंत लाजत बोलणारी मुलगी आज अचानक बोल्डपणे वागू लागेल पण हा परिणाम फक्त 28 डिसेंबरपर्यंत राहील. सध्या आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागत आहे पण लवकरच हा त्रास कमी होईल. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल.
तुळ :–पित्ताचा त्रास असलेल्यांनी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा बेफिकीर राहू नये. तरूणांना व्यसनांचा विचारही करता येणार नाही. व्यसन केल्यास स्वभावात अचानक बदल होऊन त्याचा त्रास वाढेल. वयस्कर मंडळीना सांधेदुखीतचा त्रास होईल. गुढशास्त्रांचा अभ्यास करताना स्वतःचे फंडे वापरू नका.
वृश्र्चिक :–वाहनांच्या गर्दीच्या ठिकाणी जाताना अतिशय काळजीपूर्वक रहा. लहान वाटणारी दुखापत मोठे डोके वर काढेल. तरूण मुलींना आपली मानसिक कुचंबणा होत असल्याचे जाणवेल.. जून्या दुखण्यांवर इलाज करण्यासाठी सारखे डाँक्टर्सना बदलू नका.
धनु :–आँन लाईन शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलांना डोळ्यांचा त्रास जाणवेल. वडिलांकडून तसेच सासूरवाडीकडून छोट्या गोष्टीसाठी मोठे उपदेशाचे डोस दिले जातील. मोबाईल वरून त्रासदायक गोष्टी घडतील. कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची गोड माहिती मिळेल.
मकर :–कामातील केलेल्या दिरंगाई मुळे फारच मानसिक त्रास होईल. मध्य्यम वयाच्या स्त्री पुरूषाना पायदुखी, टाचादु, खीचा त्रास होईल. बचत केलेल्या पैशाला वाट फुटेल. व स्वतःचाच राग येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी सारासार विचार करूनच कृती करावी. का, ही गोष्टी अंगाशी येथील.
कुंभ :–विवाह ठरलेल्यांनी एकमेकाच्या अपेक्षांना तडा जाणार नाही याची दखल घ्यावी. शेअर्समधील गुंतवणूक विलक्षण फायदा देणारी ठरेल. विशेषतः औषधी कंपन्यांच्या शेअर्सचे तुमचे अंदाज खरे ठरतील. उच्चशिक्षणातील अडथळे सहजपणे दूर होऊन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग समोर दिसेल.
मीन :–बहिण भावंडातील छुपेवाद उफाळून येतील. आदर्शवत वाटणार्या व्यक्तींबरोबर भेट होईल व मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज बाहेर काढावे असे वाटेल .10 वर्षाच्या आतील मुलांच्या डोक्याला दुखापत होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीना सोशल वर्क करण्याची संधी मिळेल.
|| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai