Read In
शुक्रवार 04 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शुक्रवार 4 डिसेंबर आज चंद्ररास मिथुन. 07:21 पर्यंत नंतर कर्क, चंद्रनक्षत्र पुनर्वसु 13:38 पर्यंत व नंतर पुष्य. वरील रास नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–शरिरावर एखादी जखम असल्या विशेष काळजी घ्यावी लागेल. रक्तस्राव होण्याचा त्रास होईल. कौटुंबिक चर्चेतून जमिनीच्या व्यवहाराचा प्रश्र्न निकालात निघेल. महिलांशी संबंधित व्यवहारांमूळे अडचणीत येण्याचे संकेत आहेत.
वृषभ :–कलाकार मंडळीना आपल्या कलेमुळे नवनवीन कामाचे प्रसंग येथील. मुलांकडून वादाचे विषय निर्माण केले जातील तरी फार तणाव वाढू देऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण निर्माण होऊ मानसिक गोंधळ उडेल.
मिथुन :–गेल्या महिन्यातील घडलेल्या विशेष घटनांचे पडसाद आता पुन्ः नव्याने सुरू होणार आहेत. आपल्या कार्य क्षमतेला आव्हान देणार्या घटना घडतील. मित्रपरिवाराबरोबर महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करून निर्णयाला याल.
कर्क :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध वृद्धींगत होण्यासाठी नम्रपणे व्यवहार करा. तरूणांना व वयस्कर मंडळीना झोपेचा अतिरेक होईल. विद्यार्थी वर्गाला आज सुस्ती येईल. असो आजचा एक दिवस आराम करा. आवडत्या छंदाला वेळ द्या
सिंह :–तुमच्या मनाप्रमाणे घडलेल्या घटनांचा आढावा घ्याल व मन सुखावून जाईल. मानसिक आजार असलेल्यांना असलेल्यांना आज आरामाची गरज निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी मी हुषार आहे या स्वतःच्या कोशातून बाहेर येण्याची गरज आहे.
कन्या :–देव धर्म करणार्या व्यक्तीनी उगाच त्याचे स्तोम करू नये. कुटुंबातील सर्वानीच व्यावहारी प्रश्र्नांवर आपली मते व्यक्त करूनच नंतर निर्णय घ्यावा. पतीपत्नीमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतल्यास वादावर पडदा पडेल.
तूळ :– त्वचेच्या जूनाट त्रासावर तज्ञांकडून उपाय करावेत हलगर्जी पणा करू नये. लहान मुलांच्या त्वचेची काळजी घ्यावी. वयस्कर मंडळीनी व सोरायसिस असलेल्यांनी जराही वेळ काढूपणा करू नये. आईवडीलांना अपेक्षित असलेल्या सुख व आनंद देणार्या घटना घडतील.
वृश्र्चिक :–विवाहेच्छूंना परिचयातून विवाहाचे संबंध जुळत असल्याचे जाणवेल. व्यवसायात आवश्यक असणारी गुंतवणूक न मागताही उभी राहील. राजकीय मंडळींना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करावा लागेल.
धनु :–कुटुंबात आईकडील नातेवाईकांचे येणे होईल. लहान बहिणीबरोबर समंजसपणे वागल्यास वादाचा प्रसंग उद्भवणार नाही. तुमच्याकडून आज गरजवंताला आर्थिक मदत मिळणार आहे तरी मोठ्या मनाने द्या.
मकर :–पाण्याच्या ठिकाणी जात असाल तर धोका संभवतो. महत्वाची व मौल्यवान खरेदी कराल. कुटुंबात सुनबाईंच्या प्रेमाखातर हिर्याची खरेदी कराल. लहान मुलांचा कानाचा त्रास अचानक वाढेल तरी दुर्लक्ष करू नका.
कुंभ :–मागिल आठवड्यातील घटनांची पुनरावृत्ती होईल व मन सुखावून जाईल. दीर भावजयीच्या नात्यातील दुरावा दूर होऊन प्रेमाची भावना वाढेल. प्रयत्नांती परमेश्वर हे सिद्ध करून दाखवाल. व्यवसायात आर्थिक ओघ वाढेल.
मीन :– आईवडीलांबरोबर हस्त खेत जाणारा आजचा दिवस महत्वाचा ठरेल. अनेक विषयावर चर्चा होऊन एकमताने निर्णयापर्यंत याल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्याचा आनंद वृद्ध आईवडीलांना मिळेल.
|| शुभं-भवतु ||