Read In
गुरूवार 03 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
गुरूवार 03 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मिथुन दिवसरात्र असून चंद्रनक्षत्र आर्द्रा 12:20 पर्यंत व नंतर पुनर्वसु आहे. आज संकष्ट चतुर्थी आहे. व मुंबईचा चंद्रोदयाची वेळ 20:29 आहे. आजचा दिवस फारसा लाभदायक नसून संध्याकाळी 07:26 नंतर शुभ आहे. तरी दिवसभरात फार, अती महत्वाची कामे करू नयेत.
मेष :–महत्वाचा पत्रव्यवहार केला जाईल. तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करता येईल. लेखकांना प्रकाशित करावयाच्या साहित्याला योग्य प्रकाशक मिळेल. गायक व वादक मंडळीना आपल्या स्वकर्तृत्वावर समाजमान्यता मिळाल्याचे जाणवेल. हाती आलेले काम नव्या उमेदीने कराल.
वृषभ :–मनाला होणारी चिडचीड, मानसिक त्रास यातून बाहेर पडण्याचे दिवस आता लांब नाहीत हे लक्षात घ्या. पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात अतिकष्ट करू नका. त्याचाही त्रास होईल. गुढशास्त्रांचा अभ्यास करताना लक्षांत ठेवण्याचे नवनवीन प्रयोग कराल. नोकरीमध्ये आज कष्ट वाढणार आहेत.
मिथुन :–आज स्वभावात शांतपणा येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी सारासार विचार करूनच कृती करावी. प्रत्येक गोष्ट अंगावर घेऊ नये. वकिल मंडळीना चमत्कारिक अनुभव येईल. विशेषत: क्रिमिनल केस संदर्भात ही घटना घडेल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील.
कर्क :– मनातील भावनांचा वेग आवरणार नाही. नात्यातील कटु अनुभवाने मन दुखावले जाईल. मानसिक आजार असलेल्यांना खरोखर आरामाची गरज आहे. मित्रपरिवारात हस्त खेळत दिवस कसा काढता येईल याचा विचार करा. कोणालाही कोणत्याही प्रकारचा शब्द देऊ नका.
सिंह :–पशूपक्ष्यांपासून इजा होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीनी काटाकुट्यातून किंवा झाडांच्या गर्दीतून जाऊ नये.वडीलांकडील नात्यातून मनाला वाईट वाटणारी बातमी कळेल. गर्भवती महिलांनी आज एकदम आराम करावा लहानशी धावपळ ही करू नये. अचानक त्रास होण्याची शक्यता आहे.
कन्या :–तुम्ही काम करत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांकडून कौतुकाचे शब्द येथील. प्रोबेशन पिरेड असलेल्यांना नवीन काँन्ट्रक्टस् करण्याची संधी मिळेल. आजच्या सूचक स्वप्नांचा विचारपूर्वक अर्थ लावल्यास घडणार्या घटनांबाबत पूर्व सूचना मिळेल.
तूळ :–व्यवसायातील तुमच्या कामाला पूरक असलेल्या संधी चालून येतील. फक्त आपल्या कामाचा आवाका व आपल्या क्षमताांचा विचार करून पाऊल पुढे टाका. अशी लाभदायक संधी परत येणार नाही. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. व डाँक्टरांचा सल्ला मोडून काहीही करू नये.
वृश्र्चिक :–जूने बालमित्र भेटल्यामुळे मानसिक उर्जा वाढेल. तुमच्या कामातील अडचणींची चर्चा मित्रांबरोबर करा काहीतरी मार्ग सुचेल.औषधाच्या दुकानदारांनी डाँक्टरांची प्रिस्क्रिप्शन्स् बारकाईने बधून मगच औषधे द्यावीत तुमच्याकडून गडबड होण्याचा धोका आहे.
धनु :–राजकीय मंडळींना मानहानीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागेल. तुमच्याकडून झालेल्या चुका परत होणार नाहीत याची काळजी घ्या. तरूणांनी मानपानाच्या अपेक्षा न करता कर्तव्याला महत्व द्यावे तुमच्या सानिध्यात आज अविचारी माणसे येथील तरी कोणत्याही व्यक्तिगत विषयावर चर्चा करू नका.
मकर :–राहत्या घराच्या सुखसुविधासाठी खर्च उद्भवेल व तो करावा लागेल. नोकरदार मंडळीना तात्पुरत्या काळासाठी दुसर्या गावी जावे लागेल. पोटदुखी, अन्नाशयाचा अल्सर असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. अती आत्मविश्वासात राहू नये. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारानेच अभ्यासाचे नियोजन करावे.
कुंभ :–गूढ शास्त्रांचा अभ्यास करणार्यांनी आपली स्वतःची मताने कोणताही विचार करू नये. मौल्यवान वस्तुंच्या खरेदीचे बेत ठरतील. उच्चशिक्षणातील अडथळे सहजपणे दूर होणार असल्याने तुम्ही तुमचे विचार बदलू नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण निर्माण होईल.
मीन :–पित्त प्रकृतीच्या मंडळीनी पित्तकारक पदार्थ खाऊ नयेत. झोपेची तक्रार असलेल्यांनी जागरण होणार नाही याची दखल घ्यावी. मानसिक खिन्नता वाढेल. वैवाहिक जीवनात वाद असलेल्यांना विरह सहन होणार नाही. कोणत्याही प्रकारची. मित्रमंडळी किंवा इतर कोणाचाही सल्ला घेऊ नये.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai