daily horoscope

दैनिक राशीभविष्य बुधवार 02 डिसेंबर 2020

Read In

 

बुधवार 02 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

बुधवार 2 डिसेंबर 2020 आज चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्र नक्षत्र मृगशीर्ष 10:37 पर्यंत नंतर आर्द्रा. आज रविचा ज्येष्ठातील प्रवेश संध्याकाळी 18:33 ला होणार आहे. वरील दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–तुमच्या बोलण्यातील वकीली भाषा तुम्हाला अडचणीत आणेल तरी दुसर्‍याला अडकवताना स्वतःच अडकाल. व्यवहारातील गुपिते लोकांसमोर उघड करू नका. नोकरीत बदलाची अपेक्षा करणार्‍यांनी अचानक घुमजाव करू नका.

वृषभ :–वयस्कर मंडळीनी न रागावता न चिडता मुलांचे म्हणणे ऐकुन घ्यावे. अधिकारी वर्गाकडून कामातील क्लीष्ट प्रश्न सुटेल व कौतुक होईल. विद्यार्थी वर्गाने अभ्याचे नियोजन करण्यासाठी आजचा दिवशी संध्याकाळी करावे व त्यानुसार रोज वागावे.

मिथुन :–सकाळपासूनच कुटुंबात काळजीचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल. आईवडीलांसाठी त्यांच्या आवडीची वस्तू आणाल. मुलांना आजोळी जावयास मिळेल. महिलांना उपासनेचे महत्व कळेल.

कर्क :–निवृत्त कर्मचारी व अधिकारी वर्गाला कामातील क्लीष्ट प्रश्न सोडवण्यासाठी बोलावले जाईल. मानसिक आजार असलेल्यांनी दुर्लक्ष न करता समुपदेशनाची संधी घ्यावी. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर गैरसमजाचे वातावरण वाढेल.

सिंह :–घरगुती प्रश्र्नात इतरांना हस्तक्षेप करू देऊ नका. व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल करण्यासाठी कांही युक्त्या वापराव्या लागतील.विद्यार्थ्यांना पूर्वनियोजित परदेशी जाण्याचे बेत रद्ध होऊन नवीन बेत करावे लागतील.

कन्या :–जुळ्या मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल व डिसचार्ज ही मिळेल. आजच्या घडीला व्यवसायात नव्याने गुंतवणुक करू नका. कुटुंबात पत्नीबरोबर मिळुन मिसळुन काम कराल.

तुळ :– पत्नीसाठी मौल्यवान खरेदी कराल. आर्थिक खर्चातील वाढ थां बता थांबणार नाही. वयस्कर मंडळीना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल व डोळ्यांच्या बाबतीत प्राँब्लेम निर्माण होईल.विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग आज चांगलाच वाढणार आहे.

वृश्र्चिक :– सतत मागे लागून कामे करून घेण्यापेक्षा नियोजित कामात विद्यार्थांना कामात सामावून घ्या. आईव मुलांमधील नातेसंबंध ताणले जातील. नोकरीतील कामाचा वाढलेला व्याप सांभाळताना दमछाक होईल. अहंकार सोडून सहकार्‍यांची मदत घ्यावी लागेल.

धनु :– मित्रमैत्रीणींच्या सल्ल्याने विवाहाचे प्रश्न जास्त चिघळणार आहेत. कुटुंबातील वादही इतरांच्या मध्यास्थिने वाढतील. कोर्टातील कामात उगाच लुडबूड करू नका व वशिल्याचा विचार सोडून द्या. घर विकण्याचे विचार सध्यातरी करू नका. नुकसान होईल.

मकर :–पूर्वी केलेल्या शेअर्समधील गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. सध्या नवीन गुंतवणूक करू नका. नोकरीत बदलीसाठी कोणताही वशिला उपयोगी पडणार नाही. सरकारी नोकरदारांना बदलीच्या ठिकाणी जावे लागेल असे संकेत मिळतील.

कुंभ :–नव्याने बुकींग केलेल्या घराचे विषयी जास्त माहिती घ्यावी लागेल. डाँक्टर मंडळीना आपल्या कामात अडथळा आणणार्‍या गोष्टी निर्माण होतील. राजकीय क्षेत्रातील मंडळीना विरोधकांचा त्रास सोसावा लागेल. कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करतील.

मीन :–तुमच्या मनाला बोचणी लावणार्‍या घटना घडतील. तुमचे प्लस पाँईंट कोणते आहेत ते ओळखुन त्याचाच वापर केल्यास अडचणीच्या पंरसंगातूनही सहीसलामत बाहेर पडाल. व्यवसायातील नवीन ओळखी महत्वाच्या ठरतील. वकील मंडळीनी आपल्या अभ्यासाशिवाय बोलू नये.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *