Read In
मंगळवार 1 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
मंगळवार 1 डिसेंबर 2020 आज चंद्ररास वृषभ 21:36 व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 08:10 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. आजचा दिवस शुभ असल्याने तुमच्या आवडत्या गोष्टी करायला सुरूवात करावी. वरील दोन्ही राशी चा व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:– व्यवसायात नवनवीन कल्पना राबवताना दमछाक होणार आहे. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणुकीत वाढ करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषय त्रास देतील तरी तुम्ही तुमचेच म्हणणे खरे हा हेका ठेवू नका. लहान भावंडाला पर्सनल लाईफमध्ये मदत करावी लागेल.
वृषभ :–आजचा दिवस हा, या सप्ताहातील आनंदाचा व समाधानाचा असणार आहे. महिलांना कुटुंबातील व्यक्तींच्या वैयक्तिक इच्छा अपेक्षांकडे लक्ष द्यावे लागेल. विवाहेच्छुनी कोणत्याही परिस्थितीत विवाहाचा हट्ट करून घाईने निर्णय घेऊ नये.
मिथुन :– तुमच्या मनातील विचारांचा गोंधळ कमी करायचा असेल तर आज प्रथम तुमचे मन मोकळे करा. सरकारी कामातील अडचणींवर मात करून कामे मार्गी लागण्याचे संकेत मिळतील. आज कोणालाही जामीन राहू नका.
कर्क :–विश्र्वासातील माणसानेच तुम्हाला धोका दिल्याचे समजेल. अतिविश्र्वासाने कोणतीही गोष्ट उघड करू नका. नोकरीत कामाचा ताण ईतका जाणवेल की नोकरी सोडावी काय हा विचार मनात येईल. पण मनावर व विचारांवर संयम ठेवा.
सिंह :– तुमच्या घराण्याच्या रितीरिवाजानुसार कुलस्वामीनी च्या उपासनेमुळे मानसिक क्लेश कमी होत असल्याचे जाणवेल. वडिल भावंडांबरोबर महत्वाची चर्चा करूनच निर्णय घ्या. हाण मुलांना विजेच्या उपकरणांपासून सांभाळावे लागेल.
कन्या :- पत्रकार, संपादक यांनी हाती आलेली माहिती नीट तपासून खात्री करूनच त्याचे महत्व ठरवावे. वयस्कर मंडळीना पाण्यापासुन धोका संभवतो. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांनी आता फार काळजी करू नये. अपेक्षित सुधारणा होऊ लागेल.
तुळ :–कुटुंबातील वरिष्ठांच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील. तरी तज्ञांचे मत घघेऊन निर्णय ठरवा. लहान बहिणीच्या घरी एखाद्या संकटाची चाहुल लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही.
वृश्र्चिक :–सांधेदुखी च्या व्यक्तींना शारिरीक त्रास जाणवु लागेल. तरूणांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. बँकेच्या कामात घाईगडबडीने चूक कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येणार आहेत तरी काय काय करावे याचे नियोजन आवश्यक आहे.
धनु :–श्री दत्तमहाराजांच्या उपासकांनी महाराजांचे नामस्मरण केल्यास मानसिक बळ वाढेल. शिक्षकांवरील कामाचा ताण फारच वाढणार आहे. तरूण वर्गास मनाला त्रास होणार्या घटना घडतील. कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी कळेल.
मकर :–कामातील अतिताणामुळे अशक्तपणा आल्याचे जाणवेल. प्रसंगी दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. अजोळकडील मंडळींची घरी उठबैस वाढेल. तरूण वर्ग प्रयत्नांती परमेश्वर हे सिद्ध करून दाखवतील. आज अवघड विषय ही सोपा वाटेल.
कुंभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या क्षेत्रांतील कतृत्वाचे सर्व ठिकाणी कौतुक होईल. लहान मुलींना रस्त्याने चालताना वाहनापासुन सांभाळावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाची चांगली मदत मिळेल.
मीन :–मनातील तीव्र इच्छा शक्तीच्या जोरावर अवघड कामातूनही मार्ग सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना समाजातून विचार मंथन करण्यासाठी बोलावणे होईल. सरकारी योजनांचा लाभ घेताना आपल्या कामात पारदर्शकपणा ठेवावा.
|| शुभं-भवतु ||