Read In
सोमवार 30 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
सोमवार 30 नोव्हेंबर 2020,पौर्णिमा, कार्तिक स्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, गुरूनानक जयंती. आज चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी अहोरात्र. वरील रास व नक्षत्राचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :-आज बर्यापैकी प्रत्यक्ष लाभ पदरात पडणार आहे. अनपेक्षितपणे लाभाच्या पैशावर इतरांची नजर असल्याचे जाणवेल. महिला आज मनाप्रमाणे पैसे खर्च करणार आहेत. व्यवसायात कांही महत्च्याच्या निर्णयाबाबत विचार करावा लागेल.
वृषभ :–व्यवसाय उद्धोगातून चांगली प्रगती झाल्याचा अहवाल मिळेल. तरूणांचे मनःस्वास्थ्य पाँझिटीव्ह अँटीट्ूडचे राहील. महिलांना गृहव्यवस्थापनात अधिक रस निर्माण होउन त्याविषयीचे तज्ञांकडून ज्ञान घेण्याची इच्छा होईल.
मिथुन :–नव्याने सुरू केलेल्या व्यवसायात चांगला जम बसेल. कामातील कार्यक्षमता वाढल्याचे लक्षात येईल. सामाजिक स्तरावर तुम्हाला तुमचे कर्तृत्व सिद्ध करावे लागेल. अजोळकडील मंडळींची काळजी व चौकशी करून आर्थिक जबाबदारीचा विचार करावा.
कर्क :–मानसिक कमकुवत पणा कमी होऊन आज कामाचा आत्मविश्वास वाढेल. नव्याने खरेदी केलेल्या वस्तूत कांहीतरी बिघाड झाल्याचे जाणवेल. शिक्षक प्रोफेसर मंडळीना आपले बुद्धी कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आजच्या सूचक स्वप्नांचा विचारपूर्वक अर्थ लावल्यास घडणार्या घटनांबाबत पूर्व सूचना मिळेल.
सिंह :–मुलांनी पुनः पुनः विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पूर्ण विचारानेच द्यावी लागतील. कोणताही निर्णय अचानक घेऊ नका. परदेशी असलेल्या मुलांबरोबर हेल्दी संवाद साधल्यास त्यांचेही मानसिक बळ वाढेल. शिक्षकांवरील व बौद्धीक क्षेत्रातील व्यक्तींचा कामाचा ताण वाढेल.
कन्या:- कालचा पाढा आज पुन्हा गिरवू नका. मुलांच्या सवयींकडे आज जास्तच बारकाईने लक्ष द्यावे लागेल. त्यांचे फाजील लाड करू नका. वडील भावंडाच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल व डिसचार्ज ही मिळेल. आजच्या घडीला कोणतीही आर्थिक रिस्क घेऊ नका.
तूळ :–किरकोळ विक्रेते, लहान घरगुती उद्धोग करणारे यांना चांगली समाधानकारक कमाई होईल. वडील भावंडांबरोबरील चर्चा अतिशय समाधान कारक राहील. आरोग्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक वागल्यास प्रकृतीचा त्रास उद्भवणार नाही. तुमच्याकडून आज इतरांना आनंद व समाधान मिळेल.
वृश्र्चिक :–नवीन गुंतवणुकीतून चांगला लाभ संभवतो. ओळखीतील मोठ्या पदावरील अधिकार्यांच्या मदतीने तरूणांना नोकरीच्या ठिकाणची कांही कामे सोपी होतील. व्यावसायिकांना बँकेच्या ओव्हरड्राफ्टबाबत बँकेकडून पूर्ण सहकार्य मिळेल तरी त्याचा विचार करायला हरकत नाही.
धनु :–कांही विशिष्ट क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या वैयक्तीक कलागुणातून विशेष प्रसिद्धी मिळेल. नोकरीची मुलाखत मागेपुढे असेल तर तुमची निवड होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या ईच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे लागेल व त्यातूनही आनंद मिळेल.
मकर :–त्वचेच्या जूनाट त्ररोगाचा पुनः त्रास सुरू होईल. सरकारी कामातून नवीन विवीदा भरणे किंवा तत्सम कामाची जबाबदारी सांभाळावी लागेल. मुलांच्या प्रेमप्रकरणात मनाला त्रास देणार्या घटना घडतील.विवाहेच्छूचे कुटुंबात मंगलकार्याचे विचार सुरू होतील.
कुंभ :–व्यावसायिकांना आपला व्यवसाय स्वतःच्या मालकीच्या नवीन वास्तु हलवता येणार आहे. त्याबाबतची पूर्वतयारी करावी. पुरोहित, पुजारी, ज्योतिषी यांना नवीन कामाच्या माध्यमातून लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्यांना श्री गुरूमाऊलीकडून आशिर्वाद मिळेल.
मीन :–मनातील इच्छा व्यक्त करण्यास उत्तम दिवस आहे. श्री जगदंबे मोर बसून प्रथम संकल्प करून तुमच्या मनातील तीव्र इच्छा देवीला सांगा व त्याला प्रयत्नांची जोड द्या. वैयक्तीक, स्वतंत्र व्यावसायिकांना सरकारी योजनेचा कसा लाभ घेता येईल याची तज्ञांकडून माहिती घ्यावी.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai