weekly-horoscope-2020

साप्ताहीक भविष्य रविवार 29 नोव्हेंबर ते शनिवार 05 डिसेंबर 2020

Read In

 

साप्ताहिक भविष्य

साप्ताहीक भविष्य रविवार 29 नोव्हेंबर ते शनिवार 05 डिसेंबर 2020

साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.

weekly-horoscope-2020

रविवार 29. चंद्ररास मेष 10:00 पर्यंत नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र कृतिका 30:02 पर्यंत नंतर रोहिणी. सोमवार 30 चंद्ररास वृषभ. दिवसरात्र. चंद्रनक्षत्र रोहिणी अहोरात्र.  मंगळवार 01 डिसेंबर वृषभ 21:36 पर्यंत नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 08:30 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. बुधवार 2 डिसेंबर चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्र नक्षत्र मृगशीर्ष10:37 पर्यंत व नंतर आर्द्रा. गुरूवार 03 डिसेंबर चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्र नक्षत्र आर्द्रा12:20 पर्यंत नंतर पुनर्वसन. शुक्रवार 4 डिसेंबर चंद्र रास मिथुन 07:21 पर्यंत नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसन 13:38 पर्यंत नंतर पुष्य. शनिवार 05 डिसेंबर कर्क दिवसरात्र. चंद्रनक्षत्र पुष्य 14:26 पर्यंत व नंतर आश्लेषा. 

29 रविवार  त्रिपुरारी पौर्णिमा. 30 सोमवार कार्तिक स्नान समाप्ती तुलसीविवाह समाप्ती, गुरूनानक जयंती. 3 गुरूवार डिसेंबर संकष्ट चतुर्थी, मुंबई चंद्रोदय 20:29.

मेष :–29 ची पौर्णिमा तुम्हाला इच्छापूर्तीचा आशिर्वाद घेऊन येणारी ठरेल. मनातील तीव्र इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग सापडतील. नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर 30  व 01 ला तसा संकल्प करायला हरकत नाही. व शोधमोहीम ही सुरू करा. 2 व 3 रोजी तुमच्या हातातील प्रोजेक्टला तज्ञांकडून मान्यता मिळेल. एखादे संशोधन कार्य करत असाल तर त्यातील प्रगतीही वाखाणण्यासारखी असेल. 4 व 5 ला तुम्हाला त्रासदायक असणार्‍या व्यक्तीपासून सावध हा. कोणत्याही महत्वाच्या कामात त्यांची मदत घेऊ नका. 

वृषभ :–29 नोव्हेंबर चा दिवस अतिशय कष्टाचा व धावपळीचा जाईल. 30 व 01 रोजी कामाचा आवाका व उरकाही वाढेल. बर्‍याच दिवसापासूनची पेडींग कामे बाहेर काढायला हरकत नाही. 2  व 3 रोजी आपल्या पैशाचा कसा उपयोग करावा याचे उत्तम नियोजन कराल. ज्यांची इन्व्हेस्टमेंट  कंपनी आहे त्याचे क्लायंट म्हणजे तुमचा चालता बोलता रेडीओ असेल. 4 व 5 ला जी गुंतवणूक कराल त्याबाबतचे अंदाज अचूक ठरतील. 

मिथुन :-29 , 30 व 1 ला तुमच्या धाडसी मित्रमैत्रिणींच्या मदतीने नवीन उद्धोग सुरू करण्याचे नियोजन कराल.कामाची पूर्वतयारी, प्रत्यक्ष काम व भांडवल यांवर चर्चा होऊन  प्रोजेक्ट फायनली नक्की ठरेल  व   सर्वानुमते मंजूर करण्यात येईल. 2 व 3  ला मानसिक बळ वाढेल पण हे काम तुमच्याकडून पूर्ण होईल का अशी भिती वाटेल. 4 व 5 रोजी पैसे, भाग भांडवल देणारे हात वाढतील  व पैशाची चिंता उरणार नाही. 

कर्क :–29 ला व्यवसायाचा विचार मनात येईल. सामाजिक स्तरावर तुमच्यावर प्रेम असलेले तुमचे पिताश्री तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. वडीलांसाठी दत्तक पुत्र असल्यास आवश्यक तो पाठींबा मिळेल.30 व 1 रोजी  बुद्धीच्या जोरावर वाद घालण्याची इच्छा निर्माण होईल. पण मनावर ताबा आवश्यक राहील. 2  व 3 रोजी प्रकृतीचा त्रास जाणवेल. 3 ची संकष्ट चतुर्थी श्री गजाननाची उपासना करावी. 4  व 5 ला मानसिक शक्तींवरमोठ्या कामाला सुरूवात कराल. 

सिंह :–29  ला सर्व आवडत्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्यावर वडीलांकडून कृपेचा व लाभाचा वर्षाव होईल. 30  व 01 रोजी व्यवसायात आर्थिक बाबतीत सुधारणा होत असल्याचे जाणवेल. व्यवसायाबाबतीतील तज्ञांकडून आलेल्या मोलाच्या सुचनांचा विचार कराल. 02 व 03 रोजी वडील भावंड व जावईबुवा यांच्या मदतीने नवीन कार्याला प्रारंभ कराल. पतीपत्नीच्या नात्यात भरभरून प्रेम मिळेल. 4 व 5 रोजी वडीलांकडील जवळचे नातेवाईक आपले मन मोकळे करतील. 

कन्या :–29 रोजी आरोग्याची चिंता करणारे प्रसंग घडतील. 30 व 01 रोजी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत असल्याची माहिती मिळेल. वृद्ध मंडळीना हा दिवस सुख व समाधानात जाईल. लांब गावी असलेली मुलांच्या भेटीगाठी होतील. 2  व 3 रोजी तरूण व वयस्कर मंडळीही पितृसुखाचा अनुभव घेतील. मंत्रतंत्रांच्या अभ्यासकांना उत्तम गुरू मिळेल व आत्मशक्तीचा अनुभव येईल. गुरुमाउलीच्या कृपेने अवघड गोष्टी सोप्या होतील. 4 व 5 रोजी वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टी शिकायला मिळेल. महिलांना उपासनेचे महत्व कळेल व तरूणांना खरे व खोटे याचेही महत्व समजून येईल. 

तूळ :–29 ला तुमचे उघड शत्रू, प्रतिस्पर्धी तुमच्या बरोबर सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या वागण्यातील प्रामाणिकपणा मुळे लोकांचे लक्ष वेधले जाईल. 30  व 01 हे दोन दिवस अपत्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांना आनंदाचा जाईल. दत्तक घेण्याची इच्छा असलेल्यांना कायदेशीर प्रोसेस पूर्ण करता येणार आहे. 02 व 03 रोजी हाँस्पिटलमधे असलेल्यांना पुढील  2/3 दिवसात डिसचार्ज मिळण्याचे संकेत मिळतील. 4  व 5 रोजी ज्याना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी दुर्लक्ष करू नये व नकोते धाडसही करू नये. 

वृश्र्चिक :–29 रोजी नोकरीच्या शोधात असलेल्यांना स्वतःच्या कार्यक्षेत्राप्रमाणे संधी चालून येईल. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय नोकरीचा राजीनामा देउ नये. 30 व 01 रोजी डाँक्टर्सना मंडळींना एखाद्या अनपेक्षित संकटाला सामोरे जावे लागेल. तरूणांना मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज बाहेर काढावे लागेल.  2 व 3 रोजी हट्टी मुलांना वळण लावण्याची गरज निर्माण झाल्याचे जाणवेल. 3 रोजी लहान मुलांना एखाद्या दुखापतीपासून जपावे लागेल. 4  व 5 रोजी उपासनेचे महत्व कळेल. नोकरीत आजपर्यंत केलेल्या   कामाची दखल घेतली जाईल व अपेक्षित फळ मिळेल. 

धनु :–29 रोजी मानसिक कोरडी चिंता वाढेल. 30  व 1 रोजी मनाला समाधान देणार्‍या गोष्टी घडतील. बर्याच दिवसापासून रखडलेले जूने येणे न मागताही वसूल होईल. 2  व 3 रोजी नवीन नोकरीचे मार्ग खूले होतील. आजचा तुमचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे. 4 व 5 रोजी ज्यानाी पूर्वी औषधी शेअर्समधे गुंतवणूक केली आहे त्याना चांगला नफा होणार आहे. वडीलांकडील  ज्येष्ठांची काळजी वाढवणार्‍या घटना घडतील तसेच त्यांना आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. 

मकर :– 29 रोजी कामातील केलेल्या दिरंगाई साठी पेनल्टी भरावी लागेल. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित केल्यास करिअरची वाटचाल सोपी जाईल. 30  व 01 रोजी महिलांना संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याची पोच समाजाकडून मिळेल. 2 व 3 रोजी वयस्कर मंडळीना नाकाच्या व घशाच्या इन्फेक्शनचा त्रास होईल. तरी तज्ञांचा सल्ला घ्यावा. 4  व 5 रोजी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांना देशव्यापी शैक्षणिक कार्यक्रमामधे सामिल व्हावे लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका. 

कुंभ :-  29 रोजी -मनात गूढ विचारांचे काहूर माजेल. आज कोणताच महत्वाचा निर्णय घेउ नये. 30 व 01 रोजी विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत असल्याची माहिती मिळेल.  वकिल मंडळीना कामांमधील व्यत्ययामुळे अडचणी निर्माण होतील.  2 व 3 रोजी राजकीय व्यक्तींना गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो तरी कोणतीही गुपिते अति विश्र्वासाने इतरांसमोर उघडी करू नका. 4 व 5 रोजी तरूण मंडळीनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. अनावश्यक प्रवासही करू नये. 

मीन :– 29  रोजी कुटुंबातील ज्येष्ठांच्या मानपानासाठी आर्थिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. 30 व 01 रोजी अजोळकडील मंडळींची काळजी व जबाबदारी तुम्हाला सांभाळावी लागणार आहे.  लहान भावंडाकडील अडचणीच्या वेळी त्याची भेट घेणे महत्वाचे राहील. 2 व 3 रोजी वृद्धांना सुख समाधान देणार या घटना घडतील. नातेवाईकांचे येणेजाणे राहील. 4  व 5  रोजी  बागकामाची आवड असणार्‍यांना कामातून आनंद मिळेल पण विषारी किडामुंगीपासून धोका संभवतो. सासरच्या ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. 

 

                                     || शुभं-भवतु ||

One thought on “साप्ताहीक भविष्य रविवार 29 नोव्हेंबर ते शनिवार 05 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *