Read In
शनिवार 28 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शनिवार 28 नोव्हेंबर चंद्ररास मेष दिवसरात्र आहे. चंद्र नक्षत्र भरणी 27:18 पर्यंत व नंतर कृतिका वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. मध्यरात्री श्री विष्णुपूजन व रविवार 29 च्या सुर्योदयाला श्री शिवपूजन ( रविवारी 29 ला वैकुंठ चतुर्दशी आहे. दुपारी 12:47 नंतर पौर्णिमा सुरू होत आहे. त्यामुळे त्रिपुरी पौर्णिमा आहे.
मेष :–आजचा दिवस अलभ्य लाभाचा आहे. तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत व ज्या बाबींवर तुम्ही मेहनत घेत आहात त्यावर तुम्हाला यशाचा मार्ग खुला होणार आहे. बंधुराजांकडील ख्याली खुशाली ची चौकशी करावी. गर्भवती महिलांना प्रकृतीचा त्रास संभवतो तरी काळजी घ्यावी.
वृषभ :–जवळच्या प्रेमाच्या नात्याकरीता लहानसा प्रवास संभवतो. कुटुंबातील कर्तृत्ववान महिलेचा आदर्श नजरेसमोर ठेवून कामाची दिशा ठरवाल. तुम्ही घेतलेल्या एखाद्या महत्वाच्या निर्णयाला जोडीदाराची साथ मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याची पोच समाजाकडून मिळेल.
मिथुन :–घशाच्या त्रासातून सुटका पाहिजे असेल तर आता तुमचा हट्ट सोडा व स्पेशालिस्ट सल्ला घ्या. वयस्कर मंडळीना झोप न लागण्याचा त्रास होईल. पुरूष मंडळीना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. क्रेडिट कार्डचा वापर आज करू नका. आर्थिक नुकसान संभवते.
कर्क :–कुटुंबात वादग्रस्त विषय त्रास देतील.नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध वृद्धींगत होण्याचे संकेत मिळतील त्याबाबत जागरूक राहून सकारात्मक वागावे. बोलताना समोरील व्यक्ती दुखावली जाणार नाही याची दखल घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल.
सिंह :–व्यवसायातील नव्या मार्गांची माहिती मिळेल. लहानसे कँन्टीन चालवणार्यानी आपली क्वालिटी मेंटेन केल्यास व्यवसाय जोरात चालणार आहे. बँकेचे कर्ज प्रकरणात चौकशीला बोलावले जाईल. मानसिक आजार असलेल्यांना आरामाची व समुपदेशनाची गरज भासेल.
कन्या :–बोलण्याच्या पद्धतीत थोडाफार जरी बदल केलात तरी बरीचशी कामे सोपी होतील. व्यावसायिकांना व्यवसायात आर्थिक भर टाकण्यासाठी तडजोडी स्विकाराव्या लागतील. लहान मुलाच्या डाव्या डोळ्याला दुखापत होण्याचा धोका आहे. साक्षिदारावरचा विश्र्वास डळमळीत होईल.
तूळ :– जून्या पोटदुखीच्या त्रासावर तज्ञांकडून उपाय करावा लागेल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेचा सराव केल्यास अभ्यासात चांगली सुधारणा होईल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना इतक्यात आराम पडू लागेल. नवविवाहितांना एकमेकांविषयी आश्वासक वाटू लागेल.
वृश्र्चिक :–गर्दीच्या ठिकाणी जाताना जागरूक रहावे लागेल. सहकारक्षेत्रातील कर्मचार्यांना कामातील गोंधळाबाबत जबाबदार धरले जाईल. मानसिक त्रास देणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. आईवडीलांसाठी प्रवासाचा बेत ठरवावा लागेल.
धनु :–आजचा दिवसात राजकिय मंडळींना मानहानीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल. तरूणांना मनातील भावभावनांना आवर घालावा लागेल. स्वार्थी विचार करणार्यांना त्यांच्या कामात अडचणी निर्माण झाल्याचे जाणवेल. घर घेण्याचे विचार सुरू होतील.
मकर :–कामातील केलेल्या दिरंगाईसाठी पेनल्टी भरावी लागेल. व्यवसायात मोठी उलाढाल केली जाईल. खाजगी संस्थेतील कर्मचारी वर्गाला एखाद्या मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. आपल्या रागावर ताबा ठेवल्यास कुटुंबात पुढे होणारे वाद टळतील.
कुंभ :– विवाहेच्छूंना परिचयातून विवाहाचे संबंध जुळत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना त्यावरील अटी व शर्ती समजून घ्या. कोर्टाची कामे मार्गी लागण्यासाठी प्रथम वकीलांशी संपर्क केल्यास घाई करू नका.
मीन :–व्यवसायातील आर्थिक कोंडी सुटण्यासाठी हातपाय हलवावे लागतील. बँकेकडून ओव्हरड्राफ्टची बोलणी यशस्वी करावा. वयस्कर मंडळीना सर्दी तापाचा त्रास जाणवेल. लहान भावंडाला पर्सनल लाईफमध्ये मदत करावी लागेल.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai