Read In
शुक्रवार 27 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शुक्रवार 27 नोव्हेंबर आज चंद्ररास मेष दिवसरात्र, व चंद्रनक्षत्र आश्र्विनी 24:11 पर्यंत नंतर भरणी. आज द्वादशीची तिथी सकाळी 07:46 ला संपत असून त्रयोदशी सुरू होत आहे. आज प्रदोष आहे. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष:–कुटुंबातील मोठ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नकोशी वाटेल. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासात नवीन ओळखी होतील. वडिलोपार्जित संपत्तीबाबत वाद मिटवण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. नोकरीच्या ठिकाणी कोर्टाच्या कामातून मुक्त करण्यासाठी विनंती केल्यास सुटका होईल.
वृषभ :–तरूण वर्गास आपण सुंदर दिसावेचे वेध लागतील. व बाजारातील काँसमेटीक्सची खरेदी कराल. शिक्षक वर्गाची मेहनत वाढल्याने मानसिक ताण पडणार्या गोष्टी घडतील. फार दिवसानंतर घराला भाडेकरू चालून येईल. व्यवहारात पारदर्शकता ठेवा.
मिथुन :–जुळ्या मुलांना प्रकृतीचा त्रास जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून खरेदीचे बेत उधळले जातील. प्रवासात मोबाईल किंवा तत्सम महत्वाची वस्तू हरवण्याची धोका आहे तरी काळजी घ्यावी. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क :–नोकरीतील वादग्रस्त विषयावर चर्चा होऊन निर्णय प्रक्रियेत तुमचा सहभाग राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल. छानछोकी व चैनीच्या वस्तूसाठी वारेमाप खर्च केल्याचे मनाला लागेल.
सिंह :–आपलेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास करू नका. समोर अनेक प्रश्र्न उभे राहतील. दत्तक पुत्र घेण्याबाबतचा निर्णय पक्का होईल व त्या दृष्टीने कामही सुरू होईल. पौगंडावस्थेतील मुलांना उगीचच मानसिक अस्थिरता येईल.
कन्या :–नोकरीच्या ठिकाणी महत्वाची हरवलेली कागदपत्रे अचानक सापडतील व आनंद होईल. लेखक व प्रकाशक यांना नवीनच प्रकरणाचा अनुभव येईल. ज्येष्ठांना पत्रकारांच्या प्रश्र्नांना तोंड द्यावे लागेल. घरातील स्वच्छता करताना हरवलेला दागिना सापडेल.
तूळ :–हातात घेतलेल्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे लागेल. संमोहनाच्या क्षेत्रातील अभ्यासकांना चित्रविचित्र अनुभव येतील. दुसर्याच्या चुका काढल्यामुळे अचानक नोकरीतील इतरांची बोटे तुमच्याकडे वळतील. घरातील वातावरण व्यावहारिक उपदेशाचे राहील.
वृश्चिक:- आज तुमच्या बोलण्यातून इतरांना घमेंडीची झलक दिसणार आहे. क्रेडिट कार्ड घेऊन शॉपिंग करत असाल तर अनाठायी मोठा खर्च होईल. तात्विक विचारांवर संतती बरोबरचे वाद विकोपाला जातील. वयस्कर मंडळींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
धनु:- ज्यांनी तुमचे पूर्वी मॅन दुखावले आहे अशा व्यक्तींची भेट घडेल. मातृतुल्य व्यक्तीच्या उपदेशाने, सुचनेने फार मोठया संकटातून वाचाल. मुलांच्या लहरी वागण्याचा त्रास होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाचे कष्ट वाढतील.
मकर:- तुमच्या वागण्यातील अति व्यवहरिपणा वाढेल. कुटुंबातील अपेक्षांचे ओझे वाटल्याने परस्परातील वाद वाढतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे आज अभ्यासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होईल. रुग्णालयातील मित्राची काळजी वाढेल.
कुंभ:- जवळच्या मित्रासाठी पोलिस स्टेशन किंवा वकिलांकडे जाण्याचा प्रसंग येईल. घडत असलेल्या घटनेचा अनुभव पूर्वी कधीतरी घेतलेला जाणवेल. स्वप्नातील घटनेच्या अर्थातून पुढील घटनेचे संकेत मिळतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन:- प्रवासात वाद होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःचे म्हणणे मांडताना आक्रमकता वाढेल. मुलांसाठी अचानक मोठा खर्च निघेल. महत्त्वाचा मेल पाठवताना चेक करा. वडील किंवा पितृतुल्य व्यक्तीबरोबर बौद्धिक चर्चा होईल.
ll शुभं भवतु ll
Aabhari Aahe Tai