Read In
गुरूवार 26 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
गुरूवार 26 नोव्हेंबर 2020 आज चंद्ररास 21:19 पर्यंत व नंतर मेष रास सुरू आहे. चंद्र नक्षत्र रेवती 21:19 पर्यंत वनंतर अश्र्विनी नक्षत्र सुरू होत आहे. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज चातुर्मास समाप्त होत असून व तुलसीविवाहास प्रारंभ होत आहे. आज भागवत एकादशी आहे व पंढरपूरची यात्रा आहे.
मेष :–कोणत्याही निमित्ताने प्रवास करू नका व पूर्व नियोजित प्रवास ठरला असल्यास त्यात बदल करा. आज तुमची पतप्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे विचार सुरू होऊन पुढील महिन्याचे नियोजन कराल.
वृषभ :– तरूण वर्गाची स्वप्ने पूर्ण होण्याचे मार्ग सापडतील..शिस्तप्रिय महिलांना आँन लाईनच्या माध्यमातून शिस्तीचे नवनवे प्रकार सापडतील. गायक व वादकांना आपली कलेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल व इतरांकडून कौतुकही होईल.
मिथुन :–महिलांना चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचे वेध लागतील. पूर्वनियोजित कामाला टांग मारून तरूण मुले व मुली आपल्याच नादात राहतील. अपत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण न झालेले दत्तक घेण्याचा विचार करतील व त्याला ज्येष्ठांकडून होकारही मिळेल.
कर्क :–जून्या फार पूर्वी प्रकृतीला झालेला त्रास पुन्हा डोके वर काढेल.. प्रकृतीचे नियम न पाळल्याचा हा परिणाम असेल तरी त्या दृष्टीने विचार करावा. शेअर मार्केटमधे दुपारनंतरची गुंतवणूक फायदेशीर ठरणार नाही. तरी करू नये.
सिंह :–सकाळपासून मनावर आलेला ताण तणाव दुपारनंतर कमी होईल. तरी दुपारपर्यंत कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण निर्माण होईल तरी त्याची कारणे शोधावी लागतील. तुम्हारी तुमची दृष्टी बदलावी लागेल.
कन्या :–तरूणांना पप्रेमसंबंधात बिघाड झाल्याचे जाणवेल. त्याला दुसर्याला जबाबदार धरण्यापेक्षा आत्मचिंतन आवश्यक राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकारात असलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करून मगच कामाचे नियोजन करा.
तूळ :–कुटुंबात प्रेमसंबंध दृढ झाल्याचे जाणवेल. अपत्यप्राप्तीच्या इच्छुकांनी तज्ञ डाँक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. पतीपत्नीमधील व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येणार आहेत तरी त्याबाबतच्या तुमच्या योजना तयार असाव्यात.
वृश्र्चिक :–कुटुंबात आर्थिक राजकारणाची सुरूवात होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक घडामोडींना सुद्धा तुम्ही तुमच्या बाजूना वळवू शकता यावर विश्वास ठेवून प्रयत्न केल्यास आज तुम्हाला चांगले यश मिळेल.
धनु :–आज तुमच्या मनावर पगडा असलेल्या व्यक्तींची भेट होईल. प्रत्यक्ष न झाल्यास फोनवर होईल. तरी आढावा घ्यावा. विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षणाबाबतची आपले विचार स्पष्ट ठेवल्यास त्यातून तुमचे हीत साध्य होईल बौद्धीक क्षेत्रात महत्व वाढेल.
मकर :–आर्थिक कोंडी सुटता सुटता पुन्हा वाढत असल्याचे जाणवेल. हाती आलेले काम नवीन पद्धतीने करण्याचा प्रयत्न केल्यास त्यातील नाविन्याचा अनुभव येईल व त्याबाबत ज्येष्ठांकडून कौतुक होईल व प्रसिद्धी मिळेल.
कुंभ :–फळ विक्रेत्यांना अचानक नुकसानीला सामोरे जावे लागेल. तरूणांना मनातील भावभावनांना आवर घालावा लागेल. स्वार्थी, व लबाड लोक आज तुमच्या सानिध्यात येथील. तरी त्यांच्या आहारी जाउ नका फसगत होईल. लहान मुले प्रलोभनाला फसतील.
मीन :–नोकरीतील वाद व कायदेशीर बाबीं मिटवावयाच्या असल्यास मध्यस्थी उपयोगास येथील. . रूग्णालयात असलेल्यांची चौकशी करण्याचे एका नवीन कामाची जबाबदारी राहील.वयस्कर मंडळींचा आजचा दिवस एकदम सुख समाधानात जाईल.
|| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai