Read In
बुधवार 25 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
बुधवार 25 नोव्हेंबर 2020 चंद्ररास मीन दिवसरात्र, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा 18:19 पर्यंत व नंतर रेवती. वरील दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. (प्रबोधिनी स्मार्त एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव)
मेष :–आज चे महत्वाचे काम म्हणजे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणीही कामात संथपणा येईल व वातावरण काहीसे संशयास्पद राहील. राजकीयदृष्टय़ा आज अतिमहत्त्वाची कामे करू नयेत.
वृषभ :–मित्रमैत्रिणींबरोबर पूर्वी सुरू केलेला उद्धोग पुन्हा नव्याने सुरू करण्याचा विचार केला जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हातातून गेलेल्या संधी परत मिळण्याची आशा आहे. प्रत्येक कामाकडे नवीन उर्जेने पाहिल्यास यशाचा मार्ग सापडेल.
मिथुन :–व्यावसायिक पातळीवर वृद्धीचे संकेत मिळू लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमावर विचार करून नवीन दृष्टीने आखणी करावी लागेल. औषधी क्षेत्रातील मंडळीना नवनवीन फंडे राबवावे लागतील. राजकिय मंडळींना आपली घोडदौड विजयाकडे असल्याचे जाणवेल.
कर्क :–कुटुंबात आनंदी आनंद साजरा होईल व नातेसंबंधातील कटु गोष्टी स, पुषंटात येत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला आवश्यक ठरेल. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवून त्यांना मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सिंह :–नव्याने सुरू केलेल्या उद्धोगातील प्रगती समाधानकारक राहील. महिलांनी व्यवसायात घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे जाणवेल. घर घेण्याचे विचार सुरू असल्यास घाई करू नये अजूनही फक्त शोधमोहीम ठेवावी. इंटरनेट वरून च्या सेमिनार चा बेत ठरेल.
कन्या :–नवीन खरेदीचे बेत फसतील. तरी आँन लाईन कोणतीच खरेदी करू नये. वयस्कर मंडळीनी पायाची काळजी घ्यावी. मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी फक्त डाँक्टरांचा सल्ला पाळावा. आज तुमचा आरामाचा दिवस आहे हे विसरू नका.
तूळ :–आजारी मंडळींच्या प्रकृतीत सुधारणा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणच्या वातावरणातील गढूळपणा कमी होउ लागल्याचे जाणवेल. हाती आलेले काम नव्या उमेदीने करावयास सुरूवात केल्यास कामाचा आवाका आवरता येईल.
वृश्र्चिक :–संततीकडून अतिशय आनंद देणार्या घटना घडतील. तरूणांनी जागरणे करणे, व्यसनाच्या आधिन जाणे यांवर विचार करावा. अचानक संपूर्ण दिवस गुंतवून ठेवणारे काम निघेल. महिलांशी संबंधित व्यवहारांमूळे अडचणीत येण्याचा धोका आहे.
धनु :–पुजारी, पुरोहित, ज्योतिषी यांनी सांगितल्यावरून तुमच्या कुटुंबात एखादा धार्मिक विधी पार पडेल. महिलांना ब्लडप्रेशरचा, व मनावर ताण आल्याचा त्रास संभवतो. सासुबाईंची काळजी घ्यावी लागेल व प्रसंगी अँडमिट ही करावे लागेल.
मकर :–एक्स्पोर्ट इंम्पोर्ट च्या कामात नव्याने निर्णय घ्यावे लागतील. उधार उसनवार दिलेल्या मोठ्या रकमा परत मिळण्यासाठी कठोर पाऊल उचलावे लागेल. सरकारी योजनांचा विचार करून त्याची माहिती घेतल्यास व्यवसायाचा नवीन मार्ग सापडेल.
कुंभ :– कांहीही कष्ट न करता दुसर्यांच्या सांगण्यावरून आपले मत कलुषित करू नका. पैश्यापेक्षा माणुसकी महत्वाचे असते हे सिद्ध करून दाखवाल. व्यवसायात आर्थिक ओघ वाढेल व उधारी वसूल होईल व त्यासाठीचे आवश्यक ते नियोजन करणे.
मीन :–तुमच्याच राशीतील चंद्र मनाला आल्हाद देणार्या गोष्टी घडवणार आहे. हातातील पैशात भरभक्कम रक्कम जमा होणार आहे. वडिलांकडील कुटुंबातून काळजी लावणारी घटना घडेल. विवाहाची बोलणी पुढे सरकण्यासाठी तडजोडीचे धोरण स्विकारावे लागेल.
|| शुभं-भवतु ||
Aabhari Aahe Tai