Read In
मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 चंद्ररास कुंभ 08:51 पर्यंत नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 15:30 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा सुरू होत आहे. वरील दोन नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांना त्यांच्या आई वडीलांना गोड बातमी सांगता येणार आहे. घरातील लहानसहान दुरूस्तीच्या कामासाठी पैसे खर्च होतील. व्यावसायिकांना व्यवसायात आर्थिक भर टाकण्यासाठी अचानक महत्वाच्या तडजोडी कराव्या लागतील.
वृषभ :–कलाकार मंडळीना आपल्या कलेमुळे कार्यक्रमासाठीचे अडलेले मानधन अचानक मिळेल. लहान मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावल्याचे लक्षात येईल. तरूणांना आपल्या व्यवस्थितपणा व पारदर्शक व्यवहाराचा अभिमान वाटेल.
मिथुन :–पतीपत्नीच्या व्यवहारातील वैयक्तिक गुप्त गोष्टी इतरांसमोर मांडू नयेत. मुलांकडून अचानक प्रगतीची व आनंदाची बातमी मिळेल व तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल. कालपरवापर्यंत समझदार असलेली मुले अचानक स्वतःचा रंग दाखवतील.
कर्क :–व्यावसायिकांच्या ऊधारीचा प्रश्र्न सुटण्याचे मार्ग सापडतील. महिलांच्या क्राँनिक दुखण्यांवर परफेक्ट इलाज मिळून आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. तराणा ना आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्यात फार मोठी धन्यता वाटेल.
सिंह :–चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. त्यावर अचानक खर्च होईल. तरी विचाराने वागा. नोकरदारांना आपल्या होमटाउनला बदली होण्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी गुरूगृही जाण्याची संधी मिळेल.
कन्या :–तरूणांना पाठदुखीचा त्रास संभवतो. स्पाँन्डीलायसीसचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये किंवा बेफिकीरी राहू नये. पूर्वी केलेल्या शेअर मार्केट मधील गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल तरी व्यवहार करण्याचा विचार करावा.
तूळ :–नवनव्या योजनांची आखणी करतांना व्यवसायातील नवीन फंडा सापडेल. मैत्रीच्या संबंधातून हाती घेतलेल्या कामात मदत मिळेल., कोणतेही काम आज न अडता मार्गी लागेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
वृश्र्चिक :–आई वडीलांच्या सेवेची संधी मिळेल. मानसिक शक्तीच्या जोरावर अवघड कामे सोपी वाटतील. व्यवहारातून अचानक आर्थिक वृद्धी होईल. तुमच्या कामाचे महत्त्व इतरांना न कळल्याने ते तुम्हाला समजावून सांगावे लागेल.
धनु :–कुटुंबात नव्या पाहुण्यांचे आगमन होईल. लहान भावंडांबरोबर वैचारिक चर्चा होऊन मनासारखा सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राजकिय मंडळीना समाजहिताची कामे केल्याबद्दल समाजाकडून कौतूकाची थाप मिळेल.
मकर :–शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला फायदा होणार आहे. व्यावसायिकांना बँकेच्या ओव्हरड्राफ्टबाबत बँकेकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीतील महत्वाच्या कामासाठी अडचणींच्या गांवी बदली होऊन जावे लागेल. मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज बाहेर काढावे लागेल.
कुंभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. गुरूतुल्य व्यक्तीची भेट होऊन कौटुंबिक प्रश्र्नांवर चर्चा होईल. नोकरीतील अधिकारी वर्गाकडून कामातील क्लीष्ट प्रश्नावर चर्चा होऊन एकमताने सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.
मीन :–कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा अपेक्षांना प्राधान्य दिल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.विवाहेच्छूनां मनासारखा जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याने मानसिक आनंद मिळेल. वडिलांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या मानपानासाठी आर्थिक खर्चाचे नियोजन करावे लागेल.
||. शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai