Read In
सोमवार 23 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्र रास कुंभ दिवसरात्र. चंद्रनक्षत्र शततारका 13:03 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा. कुष्मांड नवमी. वरील दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– मनातील इच्छा प्रत्यक्षात पूर्ण होणार आहेत याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून किंवा मातृतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. तोंडातून अपशब्द निघणार नाहीत याची काळजी घ्या. नंतर मानसिक त्रास संभवतो.
वृषभ :–रूग्णालयात असलेल्यांना एखाद्या दैवी चमत्काराचा अनुभव येईल. डाँक्टर्सना सुद्धा आश्र्चर्य वाटेल. क्षणात व्यवसायाच्या कल्पना वेग घेतील. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची आलेली आलेली बाधा दूर होत असल्याचे जाणवेल.
मिथुन :– मित्र मंडळींच्या मदतीने कामातील अडचणींवर उपाय सापडेल. श्री जगदंबामाता संसारातील त्रास कमी करून आयुष्यात आनंद निर्माण करत असल्याचे जाणवेल. हाती आलेले काम नव्या उमेदीने करायला सुरूवात कराल.
कर्क :– जून्या पोटदुखीच्या त्रासावर तज्ञांकडून उपाय करावेत हलगर्जी पणा करू नये. अचानक खाण्यापिण्यावर जाणिवपूर्वक बंधन घालावे लागेल. नोकरीत वरीष्ठांकडून कामाचे कौतुक होईल व नातेवाईक प्रशंसा करतील.
सिंह :– व्यवसायातील भागिदार आस अचानक कणव वाटेल वतसे त्यांच्या कडून व्यक्त केले जाईल. कवी कलाकार मंडळीना आपल्या कलेचे , कष्टाचे सार्थक होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर आंधळेपणाने सही करू नका.
कन्या :–बोलण्याच्या चातुर्याने अवघड काम साधून घ्याल व आयत्या तव्यावर पोळी भाजली जाईल. अध्यात्मिक अभ्यासकांना श्री गुरूकृपेचा लाभ होईल. पासपोर्ट व्हिसासाठी आता फार त्रास घ्यावा लागणार नाही तरी विद्यार्थांचा मार्ग सुकर होईल.
तूळ :–अचानक येणार्या मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यानी आपला अभ्यास जोरदार सुरूच ठेवावा. वयस्कर मंडळीनी आजचा दिवस जपून चालावे. पडण्या धडपडण्याचा धोका आहे.
वृश्र्चिक :– बर्याच दिवसापासून ज्या गोष्टीच्या प्रतिक्षेत आहात त्याची उत्कंठा कमी होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर प्रवास करावा लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका.
धनु :– आजचा दिवस अतिशय आनंदात व उत्साहात जाणार आहे. जूनी कंटाळवाणी कामे जरी काढलीत तरी त्यातही उत्साह जाणवेल. लहान मुलांना थापायचा त्राल जाणवेल. महिलांनी धावपळ करू नये. पुरूष वर्गाचा अचानक रागाचा पारा चढेल तरी संयम आवश्यक.
मकर :– हातात घेतलेले काम पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याचा अनुभव येईल. एका वेळी दोन दगडावर पायठेवू नका. पूर्ण विचाराने निर्णय घ्या. खरेदीच्या कामात फसवणूक होण्याचा धोका आहे. तरी चौकस बुद्धीने खरेदी करा.
कुंभ :– उत्तरोत्तर प्रगतीचा मार्ग दिसू लागल्याने तुम्हाला प्रत्येक काम यशाकडे जात असल्याचे जाणवेल. आईकडील नात्यातील मंडळींची प्रत्यक्ष भेट होईल. बर्याच दिवसापासून रेंगाळलेली कामे मार्गावर आणण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार नाहीत.
मीन :–जिथे झाल तिथे वैचारिक गोंधळ उडाला असल्याचे नजरेत येईल. आज कोणाच्याही वैयक्तिक बाबतीत स्वतःचे मत देऊ नका. नंतरची जबाबदारी स्विकारावी लागेल. मातृतुल्य व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल व आर्थिक भारही सोसावा लागेल.
|| शुभं-भवतु ||
Thank you Tai