Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 22 नोव्हेंबर ते शनिवार 28 नोव्हेंबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
22 रविवार चंद्ररास कुंभ दिवसरात्र, व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 11:08 पर्यंत नंतर शततारका. (गोपाष्टमी.) 23 सोमवार कुंभ दिवसरात्र, चंद्रनक्षत्र शततारका 13:03 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा,( कुष्मांड नवमी) . 24 मंगळवार कुंभ 08:51 पर्यंत नंतर मीन व चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 15:30 पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा. 25 बुधवार मीन दिवसरात्र, व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 18:19 पर्यंत नंतर रेवती( विष्णुप्रबोधोत्सव, प्रबोधिनी स्मार्त एकादशी.) . 26 गुरूवार मीन 21:19 नंतर मेष व चंद्रनक्षत्र रेवती 21:19 पर्यंत नंतर अश्र्विनी.(चातुर्मास समाप्त, भागवत एकादशी,पंढरपूर यात्रा, तुलसीविवाहारंभ) 27 शुक्रवार मेष दिवसरात्र, व चंद्रनक्षत्र आश्र्विन 24:21 नंतर भरणी.(प्रदोष) 28 शनिवार मेष चंद्रनक्षत्र भरणी. (वैकुंठ चतुर्दशीच्या उपवास,मध्यरात्री विष्णुपूजन व उद्या रविवारच्या सुर्येदयाला शिवपूजन व कार्तिक स्वामी दर्शन 12:47 ते 30:02 पर्यंत. बुद्धाचा वृश्र्चिक राशीप्रवेश )
वरील सर्व राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–22, 23 ला मित्रमंडळींच्या मदतीने अवघड कामाची सुरूवात केल्यास त्यात यश मिळेल. त्यांच्या ओळखीने होणारे एखादे काम असेल तर नक्की तुम्ही त्या कामाविषयी मित्रांशी बोला. 24, 25, 26 परदेशाशी संबंधित कामे मार्गी होतील. एक्स्पोर्ट इंम्पोर्ट च्या व्यावसायिकांनी आपली कामात या तारखांना विशेष लक्ष घालावे. नोकरीसाठी किंवा उच्चशिक्षणासाठी परदेशी जाउ इच्छिणार्यांनी योग्य माहितीच्या आधारे आपली कामे सुरू करावीत. 27, 28मनातील इच्छा पूर्ण करणारे दिवस. प्रत्येक कार्य यशाकडे जाईल. त्याला प्रयत्नांची जोड द्या.
वृषभ :–22 , 23 व्यवसायातील गणिते चांगल्या प्रकारे सुटू लागतील. पूर्वनियोजित कामावर लक्ष केंद्रित करा. गुडघ्यांची काळजी घ्या. 24, 25, 26 व्यवसायातील उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. कोणत्याही परिस्थितीत उधार उसनवार करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषय त्रास देतील. 27, 28 तरूणांनी डाव्या डोळ्याची काळजी घ्यावी. आँपरेशन झाले असल्यास डाँक्टरांचा सल्ला मोडू नये. या दोन दिवसात फक्त खर्चाचीच कामे निघतील तरी प्राँयारिटी तुम्हालाच ठरवावी लागेल. एखादा दंडही भरावा लागेल. काळजी घ्या.
मिथुन :–22, 23 रोजी वडिलांचा सल्ला महत्वाचा ठरेल. उगाच घाई करू नका. वडिलांकडील नात्याचा सल्ला तुमच्या करिअरमधे मदत करू शकेल. कुटुंबातील वातावरण अतिशय शांत व आनंदी राहील. 24, 25, 26 या तीन दिवसात कुटुंबातील सर्वजण मिळून एखाद्या देवदर्शनाला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात आत्मविश्वासपूर्ण राहून कामाची सुरूवात कराल. 27, 28 रोजी मित्रमंडळींच्या मदतीने एखाद्या अवघड कामाचे शिवधनुष्य उचलाल. या दोन दिवसात जीभेचे चोचले पुरवाल.
कर्क :–27, 28 ला राजसुखाची कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे जाणवेल. सरकारी नोकरमंडळीना मान सन्मानाचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. 24, 25, 26 या तीन दिवसात तुमच्याकडून दानधर्म घडेल. अध्यात्मिक अभ्यासकांना श्री गुरूकृपेचा लाभ होईल व स्वतःवरील विश्र्वास वाढेल. आपण करू शकतो ही भावना वृद्धींगत होईल.22, व 23 रोजी नोकरीत सहकार्यांबरोबरील संबंधात कांही प्रमाणात नाराजी निर्माण होईल त्यामुळे आपण व आपले काम एवढेच मर्यादित रहा.
सिंह :–22, 23 रोजी व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. वकील मंडळीनी आपल्या अभ्यासाशिवाय समोरील पार्टीबरोबर बोलू नये. वैवाहिक जीवनात प्रेमाचे भरते येईल. 27, 28 रोजी व्यवसायातील खाचा खोची तज्ञांकडून समजतील. पतीपत्नी यांनी आपल्या व्यवसायातील वृद्धीसाठी आपण काय काय करू शकतो याचा आढावा घ्यावा. विद्यार्थ्यांनी उच्चशिक्षणाबाबतची माहिती व करियर याचे मार्गदर्शन तज्ञांकडून घ्यावे व मगच पाऊल उचलावे. 24, 25, 26 फार मोठे व्यवहार करू नयेत तसेच अनावश्यक प्रवास टाळावा.
कन्या :–23, 24 रोजी नोकरीमध्ये अचानक एखादी गूढरित्या बातमी कळेल. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाही याची काळजी घ्यावी व त्रास होत नसला तरी डाँक्टरांकडे जाऊन यावे. 25, 26 या दोन दिवसात व्यवसायाबाबत चे प्रयत्न करावयाचे आहेत त्याची पूर्व तयारी करावी. पार्टनर, बँक प्रकरण, गुंतवणूक, मार्केट याबाबतची सखोल माहिती घ्यावी. 27 व 28 रोजी महिला व पुरूष वर्गास दोघांनाही सासुरवाडीकडून आवश्यक ती मदत मिळेल. महिलांना प्रकृतीचा त्रास संभवतो. काळजी घ्या.
तूळ :–22, 23 रोजी संततीच्या वाटचालीतील प्रगती कळेल. आजारी मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आर्थिक गुंतवणूक चे आडाखे बरोबर निघतील. पुढील गणिते ही तज्ञांच्या मदतीने करा. व्यवसायात मोठ्या धाडसी प्रकल्पाची योजना आखाल. आत्मविश्वासपूर्ण राहून कामाची सुरूवात करा. 24, 25, 26 कुटुंबात कांही प्रमाणात आजारपणाचा त्रास होईल. पुरूष मंडळीना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर अचानक खूपच खर्च होईल. 27, 28 ला पतापत्नी मधील एकवाक्यता किती महत्वाची आहे याचा अनुभव येईल. कोणाबरोबरही वाद घालू नका.
वृश्र्चिक :–22, 23 रोजी शेतकरी मंडळींना कांही सुखाच्या गोष्टी कळतील. कोणताही निर्णय अचानक पणे घेऊ नका तुमचा प्रश्र्न तज्ञांना विचारून मगच काम करा. 24, 25, 26 रोजी मातृतुल्य व्यक्तीकडून मोलाचा सल्ला मिळेल. न्यायालयातील कामास प्राधान्य देउन वकीलबुवांची भेट घ्यावी लागेल. संततीचे आजारपण मानसिक त्रासास कारणीभूत होईल. मुलांना एखादा जूना आजार असल्यास नवीन डाँक्टरांचा सल्ल्याने उपचार करावेत. वडिलांच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल पण डिसचार्ज मिळण्यास जरा विलंब लागेल..
धनु :–22, 23 या दोन दिवसात तुमच्या नावांवर एखादा पराक्रमाची नोंद होईल तरी सध्या आजूबाजूला काय चाललेय त्याची दखल घ्या. नोकरीतील तुमचा कामाचा आवाका आश्र्चर्यकारक राहील. 24, 25, 26 ला माझ्या सारखा सुखी कोणीच नाही अशी भावना राहील. सामाजिक स्तरावर तुमचे नांव चमकेल. 26 ला समाजाकडून तुमच्या नावाला संमती मिळेल. 27, 28 ला जून्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. सध्या नवीन गुंतवणूक करण्याचा विचार असेर तर फक्त या दोन दिवसातच करा.
मकर :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेत असलेल्याना 22, 23, च्या दरम्यान गोड बातमी कळेल. गर्भवती महिलांनी हा संपूर्ण आठवडा भर आराम करावा. फार्मसीच्या विद्यार्थांना अभ्यासाबरोबर जुळवून घ्यावे लागेल. 224, 25, 26 दळणवळणाच्या क्षेत्रातील मंडळींना एक्स्ट्रा अधिकार मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी गुरूगृही जाण्याची संधी मिळेल. 27, 28 रोजी होलसेल मार्केटच्या व्यावसायिकांना भरपूर लाभ होईल. मध्यम वर्गास, लघु उद्धोगातून चांगली प्राप्ती होईल.
कुंभ :–22, 23 ला तुम्ही मनात आणाल ते करून दाखवाल. आर्थिक ओघ वाढणार आहे. विद्यार्थी मनापासून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा तुमची प्रतिष्ठा वाढवेल. 24, 25, 26 ला अभ्यास न करणार्या मुलांना गोडीने अभ्यासास प्रोत्साहित करा. त्याच्या प्रयत्नांची चेष्टा करू नका. कुटुंबात पत्नीबरोबर मिळुन मिसळुन काम कराल त्यामुळे घरातील वातावरण आनंदाचे राहील. 27, 28 ला राजसुखाची कल्पना प्रत्यक्षात उतरल्याचे जाणवेल. हातात भरपूर धन आल्याने इतरांना मदत कराल.
मीन :–24, 25, 26 ला तुमचा व्यक्तिगत आदर्शवादाचा समाजाकडून गौरव होईल. नोकरीत सहकार्यांबरोबरील संबंध अतिशय खेळीमेळीचे राहून कामाचा आवाका वाढेल. नविन प्रोजेक्ट्स ना मंजुरी मिळेल. 27 व 28 रोजी पैसे कमवण्यामागील कष्टाची कल्पना येईल. तरूण वर्गास ही हीच जाणिव होईल. सरकारी कामातून फायदाच फायदा झाला नाही तरी वेगळ्याच कामाचा अनुभव मिळाल्याचा आनंद मिळेल व सामाजिक पातळीवर प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील मंडळीना आनंदोत्सव साजरा करावा अशी उर्मी येईल. 22, 23 या दोन दिवसात प्रकृतीची काळजी घ्यावी.
|| शुभं-भवतु ||