Read In
शनिवार 21 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज शनिवार 21 नोव्हेंबर 2020 चंद्ररास मकर 22 :24 पर्यंत नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 09:52 पर्यंत व नंतर धनिष्ठा.वरील रास नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–उद्धोग व्यवसायात बदल करण्याचे विचार येतील. आदर्शवत वाटणार्या व्यक्तींबरोबर भेट होईल. आजपर्यंत केलेल्या कामाचे श्रेय मिळेल व चुकीचे केले असल्यास नुकसान होईल व त्रासही होईल. सकाळ नंतर स्वभावात अचानक रागीटपणा, कडकपणा येईल.
वृषभ :–वडिलांच्या आईकडील नात्यातून आनंदाची बातमी कळेल. आज्जीची भेट घडेल व प्रेमाचा वर्षाव होईल. एखाद्या कान्फरन्समधे ओरिएंटेशन देण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना नवीन विषयावर संशोधन करण्याची मागणी करण्यात येईल.
मिथुन :–पोटाची अपचनाचा तक्रार उद्भवेल. स्वतःच्या मालकीच्या जागेतील व्यवसाय जोरात चालेल पण त्यातही नवनवीन फंडे वापरावे लागतील. कौटुंबिक महत्वाची चर्चा सर्वांसमोर करून हसे करून घेउ नका. संततीच्या आरोग्याची चिंता वाढेल.
कर्क :–विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचे बेत ठरतील. उच्चशिक्षणातील अडथळे सहजपणे दूर होणार नाहीत तरी मेहनत वाढवावी लागेल. नात्यातील लहान बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल.
सिंह :–नोकरीतील होणार्या अडचणी कमी होऊ लागतील. लहान मुलांना अग्नी पासून, फटाक्यांपासून जपावे लागेल. तरूणांच्या चैनी वृत्तीत वाढ होत असल्याचे जाणवेल व पैसे ही खर्च होतील. व्यावसायिकांना बँकेच्या ओ. डी. बाबत चिंता निर्माण होईल.
कन्या :–चैन, मौजमजा करण्याकडे कल राहील. हातातील पैशाचा विचार न करता अचानक मोठा खर्च करण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून आपले मत खराब करू नका. कुटुंबात वादग्रस्त विषय त्रास देतील व मतभेदाचे प्रसंग वाढतील.
तूळ :–कामातील कष्टांचे प्रमाण वाढूनही मानसिक आनंद मिळेल. वडिलांच्या नात्यातील ज्येष्ठांच्या मानपानासाठी आर्थिक खर्चाचे नियोजन करावे लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पनेमुळे वैवाहिक जीवनात तक्रार सुरू होईल.
वृश्र्चिक :–तुमचे. म्हणणे मांडताना त्याची मुद्धेसुद तयारी करा. आपले म्हणणे मांडताना अग्रेसिव्ह होऊ नका. विद्यार्थी अभ्यासाच्या निमित्ताने इतर गोष्टीतच लक्ष जास्त घालतील. मुलांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावे लागेल.
धनु :– स्वभावातील लहरीपणात, तापटपणात अचानक वाढ झाल्याचे जाणवेल. मोठ्यांबरोबर बोलताना व्यक्त होताना नम्रपणा ठेवावा लागेल. वरवर आकर्षक वाटणार्या योजनेत पैसे गुंतवण्याचा मोह होईल. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका.
मकर :–मनातील आदर्शवत योजना कागदावर उतरवण्यासाठीचा आजचा दिवस महत्वाचा आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये. रात्रभरचा प्रवास तर बिलकुल करू नये. अपेक्षित बाबींची पूर्तता करण्यासाठी सरकारी नियमांची माहिती करून घ्या.
कुंभ :–आज तुमच्या मनाला सकाळपासूनच आळस वाटेल पण तुम्हाला त्यावर मात करावी लागेल. बालहट्ट बरोबर स्त्रीहट्ट ही पुरवावा लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेचा मोह आवरता येणार नाही व सत्तेबरोबर संकटही ओढवून घेतील
मीन :–कामाच्या ठिकाणची घाई त्रासाला कारणीभूत होईल. विवाहेच्छूंना आपल्याला नक्की काय पाहिजे हेच न कळल्यामुळे निर्णय घेता येणार नाही. अचानक खाण्यापिण्यावर जाणिवपूर्वक बंधन घालावे लागेल. नोकरीत सहकारी वर्गाची चांगली मदत मिळेल.
|| शुभं – भवतु ||
Dhanyawad Tai