daily horoscope

दैनिक राशीभविष्य शुक्रवार 20 नोव्हेंबर 2020

Read In

 

शुक्रवार 20 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 09:21 पर्यंत नंतर श्रवण आज गुरूचा मकर राशीत प्रवेश 13:27.. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–उद्योग व्यवसायात महत्वाच्या व नोंद करण्याजोग्या घटना घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे विषय सुरू होऊन विवाहेच्छूना जोडीदार मिळेल. आरोग्यावर कामाचा ताण जाणवेल. व्यावसायिक जुने येणे मिळण्याचे मार्ग ओपन होतील. नवीन ओळखी होतील.

वृषभ :–नोकरीत नवीन जबाबदारीची कामे स्विकारावी लागतील. अनपेक्षित लाभदायक घटना घडतील. लहान मुले आपल्या कुशाग्र बुद्धीची चुणूक दाखवतील. आज अवघड विषय ही सोप्या पद्धतीने सुटल्याचा आनंद विद्यार्थ्यांना मिळेल. महिलांना उपासनेचे महत्व कळेल व त्या इतरांनाही सांगतील.

मिथुन :–अचानक समाजकार्यात भाग घेण्याची इच्छा निर्माण होईल. घरगुती प्रश्नावरील उपायासाठी इतरांची मदत घेऊ नका तुमचा प्रश्नसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. अधिकारी मंडळीनी प्रतिष्ठेस जपताना आपण नियमबाह्य वागत नसल्याची खात्री करून घ्यावी. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होतील.

कर्क :–मनस्वास्थ्यास जपावे लागेल. अचानक हळवेपणा वाढून रडू कोसळेल. आर्थिक व वेळेचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास कोणतेच नुकसान होणार नाही व सर्व कामेही वेळेवर होतील. आजारी, हाँस्पिटलमधील मंडळीना उतार पडू लागेल व डिसचार्ज पण मिळेल.

सिंह :–तुमच्या बोलण्यातील वकीली भाषा तुम्हाला अडचणीत आणेल. कामाचा आवाका ओळखूनच काम घ्या. आर्थिक परिस्थितीत हळुहळू बदल होउ लागेल. नोकरीच्या प्रतिक्षेत असणार्‍यांनी कोणत्याही एकाच मुद्यावर अडून बसु नये. जागेचा ठरलेला व्यवहार अचानक बिघडणार याची काळजी घ्या.

कन्या :–आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न कौतुकास्पद ठरतील. पोलिस खात्यातील मंडळीना एखाद्या आरोपाला तोंड द्यावे लागेल. विद्यार्थ्यांनी जास्ती जास्त मेहनत केल्या यश गाठता येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या आदर्शाचे कौतुक होईल बोलण्यातील आदर्शपणाने इतरांना आपलेसे कराल.

तूळ :–वाहन सौख्य मिळण्याचा योग आहे तरी विचार करावा. नृत्यांगना महिलांना नेत्रदिपक यशाचा नमुना बनता येणार आहे. सकाळी पासूनचा अर्धा दिवस कांहीसा आळसांत जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल. लहान भावंडांबरोबर वैचारिक खटके उडतील तरीही त्याला समजून घ्यावे लागेल.

वृश्र्चिक :– परखड शब्द म्हणजेच स्पष्टपणा या समजूतीवर आपले विचार व्यक्त कराल. पतीपत्नीच्या व्यवहारातील अचानक पारदर्शकपणा हरवल्याचे लक्षांत येईल. मशीनवर काम करणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. व वाहन चालवताना ही घाई करू नये नियमभंग होत नसल्याची खात्री करावी.

धनु :–सख्या बहिण भावान एकामेकाचे जीव वाचवण्यासाठी आर मोठा त्यागाचा विचार करावा लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत मिळालेली संधी सोडू नका. विवाहित महिलांनी कुटुंबाकरता घेतलेल्या कष्टाची जाणीव इतरांना झाल्याचे पाहून महिला कृतकृत्य होतील.

मकर :–वडिलांना खूष करण्याकरीता तरूण पुरूष जीवाचे रान करतील. राजकिय डावपेचांचे बळी होऊ नका. तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. अर्थप्राप्ती चांगली झाल्यामुळे कर्तव्य पूर्तीचे समाधान मिळेल. समाजाकडून दखल घेतल्याने घराण्याची प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ :–तरूणांना कर्तबगारी दाखवण्याची संधी मिळेल. शारिरीक मेहनत करणार्‍यांनी आपले उद्धीष्ट्य डोळ्यासमोर ठेवावे. व्यवसायात भागीदाराच्या मताचा आदर करावा लागेल अन्यथा रोषास कारणीभूत व्हाल. जवळचे नातेवाईकांची अडचणीच्या कामात आवश्यक ती मदत मिळेल.

मीन :–तुमचे विचार कांहिना पटणार नाहीत तर काहींना प्रेरणा देणारे ठरतील. सरकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मानाचे स्थान मिळेल. पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक बाबतीतील रेंगाळलेल्या प्रश्र्नांना वेळ दिल्यामुळे प्रश्र्न सहजपणे सुटतील.

||शुभं-भवतु ||

 

One thought on “दैनिक राशीभविष्य शुक्रवार 20 नोव्हेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *