daily horoscope

दैनिक राशीभविष्य गुरूवार 19 नोव्हेंबर 2020

Read In

 

गुरूवार 19 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज गुरूवार चंद्ररास धनु 15:29 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 09:37 पर्यंत व नंतर उत्तराषाढा. आज पांडवपंचमी असून त्याला कडपंचमी असेही म्हणतात.

मेष :– विद्यार्थांना स्पर्धात्मक यशाची वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळतील. कुटुंबात कांही मतभेदाचे प्रसंग येऊन जूना वाद उफाळून येईल.तरूणांना भाग्योदयाचे मार्ग सापडेल. अचानक आर्थिक प्राप्ती होत असल्याचे जाणवेल.

वृषभ :–थोरामोठ्यांच्या ओळखाने महत्वाच्या कामात मदत होईल. व्यवसायात यश व प्रसिद्धी ए हरखून जाल. लहान मुलांकडून महत्वाची वस्तू हरवली जाईल. घराची वा गाडीची किल्ली वगैरे त्यांच्या हातात देउ नका.

मिथुन :–विवाहेच्छूंना परिचयातून विवाहाचे संबंध जुळत असल्याचे जाणवेल. व्यवसायात सरकारी योजनांमधून चांगला लाभ होईल. अध्यात्मिक मंडळीना अभ्यासाची ओढ जाणवेल. व त्या प्रमाणात मार्गदर्शनही मिळेल.

कर्क :–नोकरीतील बदलाच्या प्रतिक्षेतील तरूण तरूणीना आजचा अनुभव महत्वाचा वाटेल. वयस्कर मंडळी क्षणात कांही तरी होतय या भावनेने घरात गोंधळ उडवून देतील. एकत्र कुटुंबात एकवाक्यता मुळे अवघड काम सोपे होऊन जाईल.

सिंह :–आज एखाद्या दुर्घटनेची शक्यता आहे तरी सर्वच ठिकाणी सांभाळून रहावे. व्यावसायिकांना भरगच्च लाभ देणारा दिवस आहे. कुटुंबात आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमलेल्या एकवाक्यता होऊन वारसा हक्काचा प्रश्र्न अगदी खुल्या दिलाने सुटेल.

कन्या :–कोणत्याही प्रकारची मोठी खरेदी आज करू नका. खरेदीत फसगत होण्याचे संकेत आहेत. कोणतेही बेकायदेशीर व्यवहार आज करू नका. आज कोणाला उधारही देऊ नये. पैसै येण्याचे मार्ग लाभतील. कुटुंबात मतभेदांची प्रकरणे कांही कारणाने चिघळतील.

तूळ :–व्यवसायात एकदम तेजीचा अनुभव मिळेल. ओबिस मंडळीनी आरोग्याची काळजी स्वतःच्या मनाने न घेता तज्ञांचा सल्ला घ्यावा. गूढविद्ध्या शिकण्याची इच्छा असणार्‍यांनी प्रथम श्री नवनाथांची उपासना सुरू करावी.

वृश्र्चिक :– जून्या गुंतवणुकीवर सध्या कांहीच घाई करू नका. नोकरदार मंडळींना नोकरीवर एखादे संकट आल्याचे जाणवेल. घर भाड्याने घेत असाल तर आज तो प्रश्र्न सुटेल. उच्चशिक्षण घेण्याचे निश्चित होईल व परदेशी जाण्याचे ही ठरेेल.

धनु :–तरूणांना कुसंगतीतून त्रास होणार आहे, ही धोक्याची सुचना समजावी. अपत्यप्राप्तीच्या इच्छुकांना गुरूकृपेचा लाभ होईल. प्रवासाला जात अशाला तर महत्वाचे डाँक्युमेंटस् सांभाळावे लागतील. पूर्वनियोजित परदेशी जाण्याचे बेत रद्ध होतील.

मकर :–वाहन खरेदीचा लाभदायक योग सोडू नका. वाहन व्यवसायाला लावण्याचा विचार करू नका. व्यवसायात आर्थिक ओघ चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल असे दिसते.

कुंभ :–नोकरीत अचानक आर्थिक कोंडी होण्याचे संकेत मिळतील. आई वडीलांसाठी महत्वाची प्रेमाची खरेदी कराल. व आनंद मिळेल. प्रवासात जून्या दुखण्यांवर नवीन डाँक्टरची ओळख होईल किंवा रेफरन्स मिळेल.

मीन :–नोकरीतील मंडळीना आपले एक शुभ पर्व सुरू असल्याचे जाणवेल. वरिष्ठांकडून पोचपावती मिळेल. आर्थिक व्यवहारातील गुंतागुंत चुटकीसरशी सोडवाल. सामाजिक क्षेत्रातील मंडळीना विरोधकांचा त्रास कमी झाल्याचे जाणवेल.

|| शुभं-भवतु||

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *