Read In
बुधवार 18 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
बुधवार 18 नोव्हेंबर चंद्र रास धनु दिवसरात्र व चंद्र नक्षत्र मूळ 10:39 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. या रास व दोन नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटे ५.३० च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. विनायक चतुर्थी आहे. तरी श्री गजाननाच्या उपासकांनी नेहमीची उपासना करावी.
मेष :–भाग्य म्हणजे काय? याचा अर्थ तुम्हाला आज कळणार आहे. पूर्वजांचे आशिर्वाद व या जन्मीची कर्तव्य कर्मे हे मिळवून देतात यावरचा विश्र्वास दृढ होईल. लहान भावंडासाठी घेतलेल्या कष्टाचे फळ सर्वांना दिसून येईल.
वृषभ :सकाळपासूनच लहान मुलांच्या संगतीत राहता येणार आहे. नातेवाईकांसाठी कपड्यांची खरेदी कराल. आर्थिक बाबतीत नियोजनाचे महत्व कळेल. नोकरीत आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेतली जाईल व कौतुकही होईल.
मिथुन :–वयस्कर मंडळींच्या सुखासाठी आज त्यांची सरबराई कराल. करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घेऊन गाण्यातून सर्वांना खूष कराल. बाजारात जाताना फार पैसे नेऊ नका. विनाकारण व अचानक बिनागरजेची खरेदी कराल.
कर्क :–तरूणांना चैन करण्याचा मोह होईल. हाँटेलींगवर मोठा खर्च कराल. सोने खरेदीचा बेत असल्या तुंहाला लाभदायक ठरणार आहे. अपचनाचा किंवा अँसिडीटीचा त्रास होण्याची शक्यता आहे तरी खाण्यावर नियंत्रण ठेवा.
सिंह :–आपल्यापेक्षा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. आईच्या तब्बेतीची चिंता वाढेल. कालपर्यंत लहान वाटणारी मुले आज मोठ्या मुलांसारखी वागतील. डाव्या पायाची दुपारनंतर काळजी घ्या. दुखापत होण्याचा धोका आहे.
कन्या :–बोलण्याच्या ओघात एखाद्याच्या जिव्हारी लागत नाही ना याची काळजी घ्या. आजपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणार्या फायद्याचे समाधान वाटणार नाही. वृद्धाश्रमाशी संबंधितांना आजवर केलेल्या कामाचे समाधान मिळेल.
तूळ :–लहान सहान गोष्टींत मानापमानाच्या कल्पना ठेवू नका. कामाच्या घाईगडबडीत महत्वाच्या कामाचा विसर पडेल. प्रथम बँकांच्या कामाना प्राधान्य द्या. सामाजिक स्तरावर तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल. मित्रांसाठी आर्थिक झळ सोसावी लागेल.
वृश्र्चिक :–चिंता करणार्यांना महत्वाच्या घटनांचा त्रास संभवतो. सासुबाईंची, तसेच सासुरवाडीची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल व 20 तारखेला डिसचार्ज मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील मंडळीना विरोधक त्रास देतील.
धनु :–गुरूतुल्य व्यक्तीकडून अतिशय महत्वाचे मार्गदर्शन मिळेल. जून्या दुखण्यांवर डाँक्टरांकडून आवश्यक ती ट्रिटमेंट करून घेण्याची संधी प्राप्त होईल. व्यावसायिकांना या वर्षीच्या कामात आर्थिक प अप्पर ाप्ती चांगली झाल्याचे जाणवेल.
मकर :–मावशीकडील नात्यातून महत्वाच्या अडलेल्या कामात मदत मिळेल. महिलांना प्रकृतीचा त्रास संभवतो तरी दुर्लक्ष करू नये. आपले ब्लडप्रेशर वाढण्याची कारणे स्वतःच शोधून काढा. कोर्टातील अडकलेल्या प्रकरणात मार्ग सापडेल.
कुंभ :–वैयक्तीक कलागुणांना समाजाकडून मानसन्मान मिळेल. कलाकारांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय राहील. व्ावयायिकांना सरकारी योजनांमधून सहाय्य निधी मिळेल. बँकेचे कर्ज प्रकरण हाताळताना अडचणी निर्माण होतील.
मीन :–कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा अपेक्षांना प्राधान्य देऊन स्वतःच्या मनाल मुरड घालाल.वास्तुविषयक व्यवहारांवर प्रथम तज्ञांचा सल्ला घ्या. वडिलांकडील मंडळींच्या बरोबर मोठ्या व्यवहारात सहभागी होता येणार आहे.
|| शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai