Read In
मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास वृश्र्चिक 12:21 पर्यंत नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 12:21 पर्यंत नंतर मूळ सुरू होत आहे.
मेष:- तरुणानी एकदा घेतलेले निर्णय बदलू नयेत. पगाराचे पैसे चैनीवर खर्च होतील. सहकारी व मित्रांची अचानक महत्वाच्या कामात मदत होईल.वयस्कर मंडळींचे ब्लडप्रेशर वाढण्याचा धोका आहे. लहान मुलांना फटाक्यांपासून सांभाळून ठेवा.
वृषभ:- कुटुंबात जोडीदाराच्या समनजसपणामुळे अवघडातला अवघड प्रश्नही सुटेल. किडनीचा किंवा वारंवार युरिन इन्फेक्शन चा त्रास होणाऱ्यांनी काळजी घ्यावी. नोकरीतील अति महत्वाच्या व गुप्त गोष्टींची चर्चा इतरांसमोर करू नये. पडण्या धडपडण्यापासून सावध राहावे.
मिथुन:- तरुण वयातील मुली आजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घेतील. नोकरीत बुद्धी चातुर्याने रखडलेल्या कामं मार्गी लावेल. अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींनी विज्ञान निष्ठ दृष्टिकोन ठेवावा. ओबीसीटीच्या व्यक्तिंनी प्रकृतीची काळजी करणे महत्त्वाचे आहे.
कर्क:- आजोलकडील मंडळींचा सहवास लाभेल. आवडत्या व पाळीव प्राण्याच्या प्रकृतीला त्रास झाल्याचे जाणवेल. नोकरीत कितीहीअसमाधान असले तरीही नकारात्मक विचार मनात आणू नये. वैवाहिक जीवनात मतभेदाचे रूपांतर वादात होणार नाही याची दक्षता घ्या.
सिंह:- नेहमी असमजुतीने वागणाऱ्या लहान भावंडकडून समजुतीच्या भाषा ऐकून आश्चर्य वाटेल. नोकरी करणाऱ्या आई कडून वास्तवातील विषयावर बौद्धिक मिळेल. लहान मुलांच्या डोक्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कन्या:- कुटुंबामध्ये नवीन व्यक्तीचे आगमन होईल. विवाह इच्छित व्यक्तींना योग्य निवडीची संधी मिळेल. मातुल घराण्यातील गूढ वाढतच जाईल. जोडीदाराचा लहरीपणा वाढेल. भोवतालच्या परिस्थितीतुन आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा. वडिलांचे घरापासून दूर जाणे घडेल.
तूळ:- किरकोळ विक्रेत्यांनी अति बोलण्याचा मोह टाळावा. आध्यात्मिक उपासकांना गुरुतुल्य व्यक्तीची भेट होईल. संततीशी अति व्यवहारी वागावे लागेल. अपत्य प्राप्तीच्या प्रतिक्षेतील व्यक्तिंना इच्छा पूर्तीचे संकेत मिळतील.
वृश्चिक:- बऱ्याच दिवसांपासून मनात साठलेले विचार बाहेर काढाण्यास संधी मिळेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभल्यामुळे मनातील टेन्शन दूर होईल. रागावर नियंत्रण ठेवल्यास ब्लडप्रेशर चा त्रास होणार नाही. जोडीदाराचे मनोधैर्य खचल्याचे जाणवेल.
धनु:- वकील, सल्लागार यांनी मनात जरा जरी शंका असेल तरी विषयाला हात घालू नका. पुरोहित, ज्योतिषी, ममानसोपचारतज्ज्ञ यांना आजच्या कामातून चांगले समाधान मिळेल. बँकेच्या व्यवहाराची महत्वाची कागदपत्रे शोधावी लागतील.
मकर:- अति आदर्शवदाचा विचारसरणीमुळे मानसिक कुचंबणा होईल.अपरिचित व्यक्तीकडून मानसन्मानाचे प्रसंग येतील. आजचा दिवस तुमच्या प्रवासासाठी चांगला नाही. मातृतुल्य व्यक्तीच्या प्रकृतीवर आर्थिक खर्च होईल. लहान मुलांच्या चिडचिडीचा त्रास जाणवेल.
कुंभ:- सूचक स्वप्नांचा अर्थ लावून पहा. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वासध्या बळावर राहू नये. वयस्कर मंडळींना पाण्यापासून त्रास संभवतो. व्यवसाय शेअर मार्केट किंवा लघुउद्योग यामध्ये गुंतवणूक करू नका. विवाहित बहिणीची काळजी सतावेल.
मीन:- अचानक आजूबाजूच्या वातावरणामुळे राग उफाळून येईल. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्यांना आजारात उतार पडू लागेल. व्यसनी मित्रांसाठी पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबात जोडीदाराचा सल्ला मानल्यास प्रश्न हाताळणे सोपे जाईल आणि कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
ll शुभं भवतु ll