Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 15 नोव्हेंबर ते शनिवार 21 नोव्हेंबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
रविवार 15 अमावास्या 10:37 पर्यंत, चंद्ररास तूळ 11:58 पर्यंत नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र विशाखा 17:16 पर्यंत नंतर अनुराधा. सोमवार चंद्ररास वृश्र्चिक अहोरात्र. चंद्रनक्षत्र अनुराधा 14:36 पर्यंत. मंगळवार चंद्ररास वृश्र्चिक 12:21 पर्यंत नंतर धनु, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 12:21 पर्यंत. बुधवार चंद्ररास धनु दिवसरात्र, चंद्रनक्षत्र तूळ 10:39 पर्यंत नंतर पूर्वाषाढा. गुरूवार चंद्ररास धनु 15:29 पर्यंत नंतर मकर, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 09:31 पर्यंत. नंतर उत्तराषाढा. शुक्रवार चंद्ररास मकर दिवसरात्र, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 09:21 पर्यंत नंतर श्रवण. शनिवार चंद्ररास मकर 22:24 पर्यंत नंतर कुंभ, चंद्रनक्षत्र श्रवण 09:22 पर्यंत नंतर धनिष्ठा.
रविवार अभ्यंगस्नान, अन्नकूट, गोवर्धन पूजन व महालय समाप्ती.
सोमवार बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा व भाऊबीज
रविचा वृश्र्चिक राशीत प्रवेश 06:53.
बुधवार विनायक चतुर्थी
गुरूवार पांडवपंचमी
शुक्रवार गुरूचा मकर राशीत प्रवेश13:27.
वरील सर्व ग्रह नक्षत्रांचा व उपनक्षत्रस्वामींचा विचार करून तसेच दैनंदिन पहाटे ५.३० च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–एकदा घेतलेल्या निर्णयात बदल करू नका. 15 ला कुटुंबात जोडीदाराकडून अतिशय महत्वाचे सहकार्य मिळेल. नोकरीतील अडचणींच्या प्रसंगावर मात करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल. 16, 17 तब्बेतीबाबत कांही त्राल उद्भवेल तरी काळजी घ्यावी. 18, 19 तुमच्याविषयी माघारी जवळचेच लोकांनी गाँसिप केल्याचे कळेल. 20, 21 हातात पैसे राहणार नाहीत. अविचाराने किंवा भावनेच्या भरात खर्च करू नका. हाँस्पिटलायझेशनची गरज भासेल. सध्या गुंतवणूक चा विचार नको.
वृषभ :–महत्वाच्या कामात मनाचा गोंधळ होईल. व्यावसायिकांनी बाजारातील नवा कल बघून आपल्या योजना आखाव्यात. 15 ला प्रकृतीची कुरबुरी होईल. 16, 17 ला व्यवसायातील उधार उसनवार वसूल होतील. नवविवाहितांना एकमेकांविषयी आश्वासक वाटू लागेल. 18, 19 ला झोपेची तक्रार जाणवेल. पित्ताचा त्रास वाढेल. सासुरवाडीकडून मौल्यवान भेट मिळेल. 20, 21 ला दत्तमहाराजांच्या कृपाशिर्वाद मिळेल. दत्त उपासकांनी व्रतस्थ राहिल्यास आश्र्चर्यकारक लाभ होतील.
मिथुन :–15 रोजी संततीच्या मनाचा विचार करावा लागेल. मुलांचा लहरीपणा वाढल्याने मानसिक त्रास होईल. 16, 17 ला राजकिय व्यक्तींना त्याच्या विरोधकांकडून त्रास होईल. कोठेही, कोणाकडेही व्यक्त होतांना बोलण्यापूर्वी विचार करावा. 18, 19 ला जोडीदाराबरोबर तात्विक मतभेद होऊन वाद वाढेल. व्यवसायात प्रतिस्पर्धी बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या वागण्यातील प्रामाणिकपणा मुळे लोकांचे, मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. 20, 21 ला मनाचा हळवेपणा वाढेल. अती विचारही करू नका.
कर्क :–15 रोजी विवाहित महिलांनी आईच्या प्रकृतीची विशेष विचारपूस करावी. 16, 17 ला संततीच्या बुद्धीचे सामाजिक स्तरावर कौतुक झाल्याचा आनंद अनुभवता येईल. प्रथम संततीकडून प्रतिष्ठा वाढवणारे कार्य होईल. लहान भावंडांबरोबर वैचारिक खटके उडतील तरीही त्याला समजून घ्यावे लागेल. 18, 19 ला कोर्टाच्या कामात कांहीतरी गडबड होण्याचा धोका आहे. साक्षिदारावरचा विश्र्वास डळमळीत होईल. 20, 21 व्यवसाय वृद्धीचे नवीन मार्ग सापडतील. कुटुंबातील आनंदावर अती व्यवहारीपणा मुळे विरजण पडेल.
सिंह :–15 रोजी लहान भावंडाकडून महत्वाच्या कामाची जबाबदारी स्विकारली जाईल. 16, 17 रोजी अचानक प्रवास करावा लागेल. सरकारी वाहनाने प्रवास करावा. विद्यार्थ्यांनी आपल्या एकाग्रतेत वाढ करण्यासाठी प्राणायामाचा अभ्यास करावा. 18, 19 तुमच्या प्रयत्नांची दिशा चुकणार नाही याची काळजी घ्या यावी लागेल. 20, 21 राजकिय मंडळीनी तज्ञांबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा करूनच आपली मते व्यक्त करावीत. नेतृत्वाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. जवळच्याच लोकांकडून खोटी स्तुती केली जाईल.
कन्या :–15 रोजी हातात असलेल्या पैशाबाबतचा हिशोब लागत नसल्याचे जाणवेल. आर्थिक गणिते विसकटतील. 16, 17 ला नवीन नोकरी संदर्भातील किंवा महत्वाच्या कामाबाबतचा निर्णय कळेल. 18, 19 ला गर्भवती स्त्रीयांनी विशेष काळजी घ्यावी. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 18, 19 ला मातृतुल्य नात्याबरोबर मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. उच्च शिक्षण घेणार्यांना मनाची संभ्रमावस्था झाल्याचे जाणवेल. 20, 21 गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल.
तूळ :–15 आनंदात व सुखाचा अनुभव येईल. मनातील ईच्छा पूर्ण होण्याचे मार्ग सापडतील. 16, 17 ला सरकारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्यांनी तज्ञांचे योग्य ते मार्गदर्शन घ्यावे म्हणजे यश हुलकावणी देणार नाही. तरूणांनी एकतर जागरणे टाळावी नाहीतर तब्बेतीची त्रास जाणवेल. 18, 19 रोजी राजकिय मंडळीना मान सन्मान घडेल. मित्राच्या व्यवहारात साक्षिदार रहावे लागेल तरी पूर्ण माहिती घ्यावी. 29, 21 सांधेदुखीतचा त्रास डोके वर काढेल. तरूणांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये.
वृश्र्चिक :–15 रोजी खूप दिवसानंतर मनासारख्या आवडत्या गोष्टींचा अनुभव घ्याल. कुटुंबातील आवडत्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. 16, 17 रोजी नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या वागण्यातील प्रामाणिकपणावर खुष होतील. 18, 19 अडकलेल्यांना मदत करण्याची संधी मिळेल. जागेच्या व्यवहारात वाद होणार नाहीत याची दखल घ्या. व्यावसायिकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे विचारांचा कल राहील. 20, 21आपल्या बोलण्याने कोणीही दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. शक्यतो मौन पाळा.
धनु :–15 ला विचारात स्पष्टता ठेवल्यास मानसिक संभ्रम निर्माण होणार नाही. प्रिय व्यक्तीबरोबर सामंजस्याने वागल्यास वाद निर्माण होणार नाहीत. 16, 17 ला तुमच्या वैयक्तिक अडचणींचा दुसरे फायदा करून घेत नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. 18, 19 ला कोणत्याही गोष्टींवर डायरेक्ट बोलणे टाळल्या विनाकारण शत्रूत्व निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारची विघ्नबाधा होऊ नये यासाठी कामाला सुरूवात करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. 20, 21 आपल्या क्षमतेचा विचार करूनच मग एखाद्याला आश्र्वासन द्या.मकर :–
मकर :–15 रोजी कौटुंबिक ताणतणाव निवळण्यासाठी पतीपत्नीनी एकमेकास वेळ दिल्यास वातावरणांत हलकेपणा येईल. 16, 17 ला पुढील घटनांचा अंदाज आल्यामुळे योग्य नियोजन करण्यास सोपे जाईल व त्यामुळे आर्थिक कोंडी होणार नाही. 18, 19 ला विद्यार्थ्यानी व कोणत्याही क्षेत्रातील स्पर्धकांनी भूतकाळाचा विचार न करता फक्त वर्तमानकाळाचाच विचार करून प्रयत्न करावेत. 20, 21 तुमच्यावर सोपवलेल्या सरकारी कामाची जबाबदारी पूर्णपणे सांभाळाल.कोणत्याही कागदपत्रावर विचार करूनच मग सही करा.
कुंभ :–15 ला इतरांविषयी व्यक्त होतांना त्याच्या भावनांचा मान ठेवावा लागेल अन्यथा रोषास कारणीभूत व्हाल. 16, 17 ला तुमचे अंदाज खरे ठरतील पण त्यांना बाजारू स्वरूप देऊ नका. इतरांच्या स्वातंत्र्याचा मॅन ठेवा. 18, 19 वडिलांकडील नातेवाईकांना मदत करण्यासाठी वेळ व पैसेही खर्च करावे लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमाविषयी फेरविचार करा. व्यवहार त्रासदायक ठरणार आहे. 20, 21 मुलांकडून अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे जाणवेल तरी त्यांना समजून घ्या व काँन्सिलरची मदत घ्या. मुलांबरोबर हट्टीपणाने वागू नका.
मीन :–15 ला स्वभावातील मानभावीपणाचा त्रास होऊन सहकारी दुखावतील. व्यवसायात नव्याने गुंतवणूक करतांना प्रथम मागिल अनुभव जमेला धरा. 16, 17 कोणतीही गोष्ट फार ताणून न धरता समंजसपणा ए प्रश्र्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात मंगलकार्याचे नाद उमटतील. महत्वाच्या व्यक्तीबरोबर चर्चा करताना शब्द जपून वापरावेत. 18, 19 लहानशा प्रवासाचा योग येईल. संततीच्या आरोग्याची चिंता वाढणार आहे 20, 21 सरकारी नियमांचे पालन तत्परतेने करा त्यात दिरंगाई केल्यास त्रास होईल.
||शुभं – भवतु||