गुरूवार 12 नोव्हेंबर 2020 ते सोमवार 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत रोजी कोणत्या घडामोडी कराव्यात.
12 गुरूवार चंद्ररास कन्या व चंद्र नक्षत्र हस्त 25:54 पर्यंत.संपूर्ण दिवस शुभ आहे.(गुरूद्वादशी व वसुबारस)
13 शुक्रवार चंद्ररास कन्या 12:31 पर्यंत नंतर तूळ, चंद्रनक्षत्र चित्रा 23:05 पर्यंत. (धनत्रयोदशी)
14 शनिवार चंद्ररास तूळ चंद्र नक्षत्र स्वाती 20:09 पर्यंत. (नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन)
15 रविवार चंद्ररास तूळ 11:58 पर्यंत नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 17:16 पर्यंत.
16 सोमवार चंद्ररास वृश्र्चिक व चंद्रनक्षत्र अनुराधा 14:36 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. (बलिप्रतिपदा पाडवा व भाऊबीज)
वरील ग्रह, राशी, नक्षत्र स्वामी, उपनक्षत्रस्वामी यांवरून हे पांच दिवस आपल्याला कसे लाभदायक आहेत ते पाहुया. गुरूवारचा दिवस शुभ आहे. कोणत्याही शुभकार्याला लाभदायक. श्री दत्त गुरूंच्या उपासकांना विशेष लाभदायक. ज्यानी अजूनही दिक्षा घेतलेली नाही त्यांना दिक्षा घेण्यास, गुरूमंत्र घेण्यास लाभदायक दिवस. श्री दत्त उपासकांना हा दिवस म्हणजे पर्वणीच आहे.
शुक्रवार ते सोमवार सर्व दिवस आनंदी असून दीपावलीचा आनंद द्विगुणित करणार आहेत. या पाच दिवसात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लाभदायक आहेत, काय खरेदी करावे, कोणत्या विक्रीच्या व्यवहारातून फायदा होणार आहे याचा विचार करूया.
लाभदायक :– इंजिनीअर, आर्किटेक्ट, कौन्सिलर, पत्रकारितेतील बातमीदार, अनुवादक, किराणा व्यापारी, शिक्षक वर्ग, वकील व फिरते एजंट. जून्या आजारावर नविन औषध सुरू करण्यास, डाँक्टर बदलण्यास. राजकारणात प्रवेश करण्यास, पदाधिकारी स्विकारण्यास. विविध भाषांचा अभ्यास करणे. चित्रकला, नृत्य शिकण्यास सुरूवात करणे. वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास सुरू करणे, लहान शेतकरी. पुरोहित, भटजी, क्लासची. सुरूवात करणे, उपहारगृह, खानावळ, सर्वात महत्वाचे म्हणजे नविन दागिने घालण्यास अतिशय लाभदायक दिवस.
खरेदी व विक्री मधे विशेष लाभदायक :–आंतरराष्ट्रीय व्यापार, कपड्याचे किरकोळ विक्रेते, कागदाचे विक्रेते, स्टेशनरी,छपाईची शाई, पुस्तके, खाण्याचे तेल व तूप , मसाला पापड, शीतपेय, आईस्क्रिम, कडधान्य व डाळी. जनावरे खरेदी करणे,
शुभारंभ करण्यास :–विवाह, बारसे, बी पेरणे, नवीन दुकान सुरू करणे, गृहारंभ करणे, औषधी वृक्ष लावणे, कान टोचणे व सर्वात महत्वाचे म्हणजे लहान मुलास किंवा आजारी माणसास अन्नप्राशनास सुरूवात करणे.
आज काय करू नये :– आजारी व्यक्तींना, मुळांत त्रास असलेल्यांना, व लहान मुलांना या गोष्टींपासून सांभाळावे. व्हिटँमीन बी ची कमतरता, कफ प्रवृत्तीच्या व्यक्ती, पचनशक्ती कमी असणारे, अँसिडीटीचा त्रास, अमिबायोसिस अपुरा श्र्वासोच्छवास, हिस्टेरिया, मनोविकार, नैराश्य, उतारवयातील रक्तदाबाचे विकार. अतिश्रमाने ग्लानी येणे. उगाचच औषध घेण्याची फार सवय असलेल्यांना त्रासदायक.
शनिवारच्या लक्ष्मीपूजनाचा माहिती व पूजा विधी शुक्रवार 13 च्या लेखामधे पहा.