लक्ष्मीप्राप्तीसाठी करावयाचे सिद्ध मंत्र व पद्धत
मनुष्याची पैसे व सुख मिळवण्याची धडपड सतत सुरूच असते. काहींचे कष्ट कमी पडतात तर काहींचा मार्ग चुकतो तर काहींचा आत्मविश्वासच कमी पडतो व अशा वेळी माणसे खचून जातात व आता काय करावे हे सुचत नसल्याने दिशाहीन होतात. पण अशा वेळी अनादि काळापासून चालत आलेल्या सिद्ध असलेल्या मंत्रांचा फारच उपयोग होतो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. म्हणूनच दिवाळीच्या या चार दिवसात करता येणारे लक्ष्मीप्राप्ती चे उपाय तुमच्यासमोर ठेवत आहे. आपल्या कुलदेवतेला नमस्कार करून श्रद्धेने हे मंत्र केल्यास तुम्हाला पण लक्ष्मीचा वरदहस्त लाभेल.
1)वसुबारस:– गुरूवार 12 नोव्हेंबर. वसुबारसेला संध्याकाळी शुचिर्भूत होऊन दर्भासनावर किंवा पाटावर बसून पूर्वेकडे तोंड करावे. स्फटिकाच्या माळेवर पुढील मंत्र 108 वेळा म्हणावा. व पांच अभिमंत्रित लवंगा लक्ष्मी देवीला अर्पण कराव्यात. स्फटिकाची माळ नसेल तर स्वच्छ पांढर्या शुभ्र मण्यांची माळ घ्यावी. व पुढे रोज हाच मंत्र किमान 11 वेळा म्हणावा.
मंत्र :- ॐ हरिणीं सुवर्णरजतस्त्राम् |चंद्रा हिरण्मयीं लक्ष्मी जातवेदो म आवह |
****************
2)धनत्रयोदशी:–आज आपल्याजवळ असलेल्या पैसे व नोटांपैकी प्रत्येकी पाच पाच नोटा घेऊन त्या एका तबकात ठेवाव्यात व लाल नोटा बांधण्यासाठी लाल धागा पण पुजेत ठेवावा. .त्यावर हळद कुंकु व पांढरे फूल वहावे.तुपाचे निरंजन लावून ठेवावे व त्या लक्ष्मी समोर बसून पुढील मंत्र 108 वेळा म्हणावा. व त्यास दुधसाखरेचा नैवेद्ध दाखवावा. दुसरे दिवशी पुन्हा तुपाच्या निरांजनाने ओवाळून दुधसाखरेचा नैवेद्ध दाखवावा. व ते पैसे लाल धाग्याने बांधून तिजोरित ठेवावे. पुढे रोज हाच मंत्र 11 वेळा म्हणावा.
मंत्र :–ॐ तां म आवह जातवेदो लक्ष्मीमनप गामिनीम्|यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्र्वं पुरूषानहम्||
********************
3)धनत्रयोदशी :–धनत्रयोदशी पासून दारिद्र्य नाशक व लक्ष्मीदायक प्रभावी मंत्राचा स्फटिकाच्या माळेवर रोज सकाळी 108 वेळा जप करावा. पहिल्या दिवशी प्रथम माळेची पूजा करावी व जप झाल्यावर पांढरे फुल व्हावे. व दुधसाखरेचा नैवेद्ध दाखवावा.
तीन महिन्याच्या आतच लक्ष्मीच्या कृपेचा लाभ होईल.
मंत्र :–ॐ र्हीं श्रीं क्लीं सौ: जगत्प्रसूत्यै नम: |
****** ****************
4) धनत्रयोदशी :– श्री शाबरी देवीचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. ज्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीची काळजी लागली आहे अशांनी हा मंत्र जरूर करावा व त्याचा अनुभव घ्यावा. धनत्रयोदशीला संध्याकाळपूर्वी स्नान करून दर्भासनावर बसावे नसल्यास पाटावर बसावे. व समोर तुपाचे निरांजन लावून स्फटिकाच्या माळेवर 108 वेळा हा मंत्राचा जप करावा. आजपासून नऊ दिवस रोज 108 वेळा करावा व तेथून पुढे रोज फक्त 09 वेळा करावा.
मंत्र :–ॐ शाबरी देव्यो मम गृहे लक्ष्मी स्थिर कुरू कुरू स्वाहा |
******* ******************
नरकचतुर्दशी
1)नरकचतुर्दशी :–ऋग्वेदातील हा मंत्र अतिशय महत्वाचा आहे. या मंत्राचा असा अर्थ आहे किं, हे लक्ष्मी, तू दाता आहेस. जो याचक तुझ्याकडे विनंती करतो त्याला तू कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीस. त्याला झोळी भरभरून देऊन त्याच्यावर कृपा करतोस. आता माझी प्रार्थना आहे कि मला या संकटातून बाहेर काढण्याची कृपा कर.
ॐ भूरिदो भूरि देहिनो मा भद्रं भूर्या भर |भूरि घेदिन्द्र दित्ससि |
ॐभूरिदा र्हसि श्रुत: पुरूत्रा शुर वृत्रहन् |आ नो भजस्व रा सिध: ||
हा मंत्र रोज संध्याकाळी केल्यास अतिशय आश्चर्यकारक अनुभव येईल.
************************
2)नरकचतुर्दशी :–नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी शुचिर्भूत होऊन, पिवळे वस्त्र नसावे. श्री महालक्ष्मीच्या मुर्ती मोर किंवा प्रतिमेसमोर बसावे. तुपाचे निरांजन लावावे. देवीला लाल फुल वाहून प्रार्थना करावी. व पुढील मंत्र स्फटिकाच्या माळेवर 108 वेळा सलग 21 दिवस करावा. व पुढे रोज 11 वेळा करावा. कुटुंबात कोणत्याही प्रकारचे असलेले पैशाचे दुर्भिक्ष निघून जाईल. खात्रीने आर्थिक प्रश्र्न सुटतो.
मंत्र :–ॐ नमो पद्मावती पद्मनयने लक्ष्मी दायिनी बाधाभूत प्रेत विन्ध्यवासिनी सर्व शत्रु संहारिणी दुर्जन मोहिनी ऋद्धिसिद्धी कुरू कुरू स्वाहा |ॐ क्लीं श्रीं पद्मावत्यै नम||
*****************
शुभं – भवतु