importance of rama ekdadashi

रमा एकादशी व्रताचे महात्म्य

|| रमा एकादशी व्रताचे महात्म्य ||

11  नोव्हेंबर 2020 बुधवार दिपावलीची सुरूवात रमा एकादशीने करा.

importance of rama ekdadashi

रमा एकादशी चे व्रत 11 नोव्हेंबरच्या  बुधवारी आहे. एकादशी म्हणजेच 11 वी तिथी. दिवाळीच्या अमावास्येच्या आधीची पाचवी तिथी  म्हणजेच एकादशी. या एकादशी पासूनच दिवाळीच्या सोहळ्याला सुरूवात होते.या दिवशी महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी श्री विष्णु अवतारातील श्री कृष्णाची पुजा करतात व धनलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करतात.

रमा एकादशीला श्री कृष्णाच्या अवतारातील श्रीविष्णुची पूजा केली जाते. अनादि काळापासून महिला आपल्या अखंड सौभाग्यासाठी या व्रताची पूजा करतात. असेही म्हंटले जाते किं या व्रताची उपासना केल्यामुळे आपल्या सर्व पापांचा नाश होतो. एवढेच काय पण अगदी ब्रह्महत्येचे पापही या पुजेने नष्ट होते. आता आधुनिक युगात पाप व पुण्य यांच्या संकल्पनाच बदलल्या आहेत. आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या एखाद्या कृतीमुळे  दुसर्‍या व्यक्तिला झालेला त्रास म्हणजे पाप असे आपण मानुया. याच्या उलट आपल्याकडून कळत नकळत दुसर्‍याला झालेली मदत म्हणजे पुण्य होय.

रमा एकादशीच्या कथेचा उल्लेख श्री पद्म पुराणात आहे. आपण त्या कथेचा विचार करण्याऐवजी त्याचा आशय समजून घेऊया.

एखादे व्रत जेव्हा स्विकारलेली जाते तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ते व्रत करावयाचे असते. शारिरीक वा मानसिक स्थिती जरी आपल्या बाजूने नसेल तरही त्या व्रताला न सोडता त्याचे पालन करावयाचे असते.  व तसे पालन करताना कितीही अडचणी आल्या तरी त्यावरील श्रद्धा जराही ढळू न देता त्याचे पालन करावयाचे असते. तसे पालन केल्यास त्याचे फळ नक्कीच चांगले व लाभदायक ठरते.

राजा मुचुकुन्दने त्याच्या मुलीचा चंद्रभागाचा विवाह राजा चंद्रसेनचा मुलगा राजपुत्र शोभन याच्याबरोबर करून दिला होता. तो प्रकृतीने अतिशय दुबळा व अशक्त होता, त्यामुळे तो कोणताही उपवास करू शकत नव्हता. योगायोगाने तो आपल्या सासुरवाडीला आला तेव्हा एकादशी होती व राजाचा सक्त नियम्नुसार हे व्रत प्रत्येकजण करत होता व कोणीही अन्नाचे भोजन करत नव्हते.  शोभनला त्याच्या प्रकृतीची खात्री नसल्याने दोघेही पतीपत्नी काय करावे याच्या चिंतेत होते.शेवदी परमेश्वरावर  विश्वास व श्रद्धा ठेवून राजपुत्र शोभन याने व्रताचे आचरण केले.. पण याचा परिणाम असा झाला कि राजपुत्र शोभन याचा मृत्यु झाला. बिचारी चंद्रभागा खूपच दुःखी झाली पण राजा मुचुकुन्दने विरोध केल्यामुळे ती राजपुत्र शोभनबरोबर सती जाऊ शकली नाही.

राजपुत्र शोभन याने अतिशय मनोभावे रमा एकादशी चे व्रत केले होते. त्यामुळे मृत्युनंतर राजपुत्र शोभन याने  मंदराचल पर्वतावर देवनगरी वसवली. राजा मुचुकुन्दने जेव्हा मंदराचल पर्वतावर या देवनागरीत आला तेव्हा राजपुत्र शोभनला पाहून व त्याचे वैभव पाहून आश्र्चर्यचकीत झाला.  त्याने ही गोष्ट चंद्रभागाला सांगितल्यावर  ती ताबडतोब देवनगरीला गेली. हा सर्व चमत्कार फक्त आणि फक्त रमा एकादशीच्या व्रताचा आहे हे तिने ओळखले व तिचे सौभाग्य अखंड टिकण्यासाठी रमा एकादशीच्या व्रतावरील तिची श्रद्धा व विश्र्वास यात वाढ झाली व ती राजपुत्र शोभनबरोबर आनंदाने राहू लागली.

या पौराणिक कथेचा साराश एवढाच कि, हे व्रत महिलांना अखंड सौभाग्यासाठी वरदान ठरले आहे. पण यातील मुख्य गोष्ट ही कि हे व्रत पति व पत्नी दोघांनी करायचे असते.  चला तर मग 11 तारखेच्या बुधवारी या रमा एकादशीच्या व्रताची उपासना करूया. या व्रताची वेळ व पूजा विधी उद्याच्या लेखात पाहुया.

One thought on “रमा एकादशी व्रताचे महात्म्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *