Read In
सोमवार 10 मंगळवार 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास सिंह दिवसभर व चंद्रनक्षत्र मघा सकाळी 07:55 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी 30:27 पर्यंत. वरील दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांना गोड बातमी कळेल. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाही याची काळजी घ्यावी. किडनीचा त्रास असलेल्यांनी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा व दिलेली सर्व पथ्ये पाळावीत. कुटुंबातील महत्वाच्या कामावर चर्चा होऊन एकमत होईल.
वृषभ :–मोतीबिंदुचा त्रास असलेल्यांनी वेळेवर डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. गूढविद्ध्येच्या अभ्यासकांनी गुरू, च्या आज्ञेशिवाय कोणताही प्रयोग करू नये. वडिलांच्या मित्रांना आर्थिक व मानसिक आधाराची मदत लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका.
मिथुन :–अशक्त व इम्युनिटी पाँवर कमी असलेल्यांनी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा बेफिकीर राहू नये. तरूणांना व्यसनांचा मोह होईल तरी काळजी घ्यावी. व्यवसायात लागणारी आर्थिक मदत बहिणीकडून मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात काम करणार्यांना स्वतःच्या युक्त्या वापरता येतील.
कर्क :–हाती घेतलेल्या कामात अचानक एखादी अडचण निर्माण होईल. सरकारी नोकरदारांना बदलीच्या ठिकाणी जावे लागणार असल्याचा निरोप मिळेल. महिलांना प्रकृतीचा होणारा त्रास कमी कमी जाणवू लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून व्यवहारी विचारावर यावे लागेल.
सिंह :–दैनंदिन व्यवहारातील महत्वाच्या कामाचा नियोजित वेळ अचानक दुसर्याच कामास द्यावा लागल्याने आर्थिक नुकसान संभवते तरी काळजी घ्यावी. विवाहेच्छूंना योग्य जोडीदाराची निवड करता येईल व त्याच्याकडूनही होकार येईल. शिक्षक मंडळीना आजचा दिवस मानहानी करणारा ठरेल.
कन्या:–बोलण्यातील होय किंवा नाही यांमधे स्पष्टता ठेवा. यशासाठीचा शाँर्टकट नेहमीच नुकसान करतो हे विद्यार्थ्यांना पटेल. राजकिय क्षेत्रातील चर्चमधे तुमचा सहभाग महत्वाचा ठरेल. कुटुंबात रागावरील नियंत्रण न पाल्याने वाद विकोपाला जातील.
तूळ :–जून्या पोटदुखीच्या त्रासावर तज्ञांकडून उपाय करावेत. वडिलांच्या प्रकृतीची काळजी वाढवणार्या घटना घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे विचार सुरू होतील. नवविवाहितांना एकमेकांविषयी आश्वासक वाटू लागेल. मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज बाहेर काढावे लागेल.
वृश्र्चिक :– गर्दीच्या ठिकाणी जाताना जागरूक रहावे. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. तरूणांच्या चैनी वृत्तीत वाढ होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर आंधळेपणाने सही करू नका. रेंगाळलेल्या कामांना हातात घ्या.
धनु :– इतरांना जे जमत नाही ते तुम्हाला जमणार आहे, फक्त सुरूवात करण्याची गरज आहे. अजोळकडील मंडळींची काळजी व जबाबदारी तुम्हाला सांभाळावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणचा कामातील संथपणा दूर होऊन कामे मार्गी लागतील.
मकर :–विचारात शांतता व कृतीत पारदर्शकता असल्याने कामात सफलता येईल. रागावरील नियंत्रण हे सूत्र वागण्यातून इतरांना समजावून द्याल. अनपेक्षितपणे महत्वाच्या कामाची जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल. विद्यार्थ्यानी अभ्यासातील अडथळे प्रयत्नाने दूर करावेत.
कुंभ :–कलाकार, गायक, संगीतकार यांना उत्तम संधी चालून येईल तसेच त्यांच्या कलेचे कौतुकही होईल. लहान मोठ्या कामातून बेरोजगारांना चांगली अर्थप्राप्ती होईल. सरकारी कामातून फायदाच फायदा होईल. गरजूंना मदत करण्याची संधी तुम्ही सोडणार नाही.
मीन :–परिस्थितीनुसार विचार बदलले तर तुम्ही आनंद घेऊ शकाल. अपयशाने खचून न जाता नव्या दमाने पुनः उभे रहाल. लोकांसमोर आदर्श निर्माण करताना स्वतः अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. जागेचे कोणतेही व्यवहार घाईने करू नका.
||शुभं-भवतु ||
Dhanyawad Tai
Aabhari Aahe Tai