Read In
सोमवार 09 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास कर्क 08:41 पर्यंत व नंतर सिंह, चंद्रनक्षत्र आश्लेषा 08:41 पर्यंत व नंतर मघा सुरू होत आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडलीचा अभ्यास करून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–मानसिक त्रास देणार्या घटना आज जराही घडणार नाहीत.. आनंद व सुखाच्या कल्पना साकार झाल्याचे जाणवेल. स्त्रीयांना आवडत्या वस्तूची खरेदी करता येणार आहे. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहे त्यांनी त्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.हाण मुलांच्या डाव्या डोळ्याला जपावे लागेल.
वृषभ :–संततीकडून अतिशय आनंद देणार्या घटना घडतील. नोकरीत व दैनंदिन कामातही मित्रांचे सहकार्य चांगले लाभेल. अध्यात्मिक अभ्यासकांना श्री गुरूकृपेचा लाभ होऊन प्रगतीचे मार्ग मिळतील. उपासनेचे महत्व इतरांना सांगाल. कुटुंबातील ज्येष्ठांची सेवा करता येणार आहे.
मिथुन :–जवळच्या नात्यातील आजारी माणसाची काळजी घ्यावी लागेल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल पण डिसचार्ज मिळणार नाही. शरीरसौष्ठव स्पर्धेतील स्पर्धकांना स्पर्धेत मोलाचे स्थान मिळेल. लहान मुलांना पोट बिघडण्याचा त्रास होईल व प्रसंगी अँडमिट करावे लागेल. .
कर्क :–दळणवळणाच्या क्षेत्रातील मंडळीना, कर्मचारी वर्गाला मोठा आर्थिक लाभ होईल. फार दिवसापासूनची चार पायांचे पाळीव प्राणी आणण्याची हौस लवकरच भागणार आहे. कौटुंबिक सुखाचा रोमहर्षक अनुभव येईल. सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा वाढत असल्याचे जाणवेल. हाती आलेले काम नव्या उमेदीने कराल.
सिंह :–संततीच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात पत्नीच्या माहेरकडील मंडळींकडून मोठ्या आर्थिक रकमेची मदत मिळेल. सरकारी नोकरदार, कलाकार, खेळाडू यांना सरकारी खात्यातून सन्माननीय बक्षिस मिळेल. सरकारी नियमबाह्य कृतीसाठी दंड भरावा लागेल.
कन्या :–सततच्या कामामुळे दमून गेल्याने एकदिवस आरामाची गरज भासेल. विद्यार्थ्यांना त्याच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटण्याची संधी मिळेल. तुमच्या प्रामाणिक विचारांचा व स्वभावाचा कोणी गैरफायदा घेणार नाही यासाठी जागरूक रहावे लागेल. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसर्यांना जाईल. कलाकार मंडळींचा सन्मान होईल.
तूळ :–अचानक महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल. आजचा दिवस तूमचा राग वाढवणारा आहे. तरी रागावर नियंत्रण आवश्यक आहे. सहकार्यांची चेष्टा मस्करी करू नका व त्यांनी केल्यास सिरियसली घेऊ नका. भावकडील मनाला त्रास होणारी बातमी कळेल. तंवरीत संपर्क साधा.
वृश्र्चिक :–तरूण, वयस्कर सर्वानाच पोटदुखीचा त्रास जाणवेल. चैनी व विलासी वृत्ती उफाळून येईल. मुलांच्या वागण्यातील गौडबंगाल कळणार नाही. त्याच्या व्यवहारांवर ल ठेवण्याची गरज निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वासात न राहता वस्तुस्थितीचे भान ठेवावे.
धनु :–कोणत्याही परिस्थितीत प्रवास करू नये, तसेच घर बदलण्याचाही विचार करू नये. व्यावसायिकांना अचानक आपल्या सांपत्तिक स्थितीबाबत चिंता निर्माण होईल. सामाजिक किंवा कौटुंबिक कोणत्याही कार्यक्रमात भाग घेऊ नये. विनाकारण अपमानकारक वागणूक मिळण्याचे संकेत आहेत.
मकर :–कलाकार मंडळीना कार्यक्रमासाठी आमंत्रणे येथील व आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. नोकरीतील बदल त्रासदायक न राहता आता सुखकर वाटू लागेल. तरूण मंडळींकडून एखादा समाजाला अचंबित करणारा पराक्रम घडेल. इच्छा न करताही महिलांना वस्त्र लाभ होईल.
कुंभ :–अध्यात्मिक अभ्यासकांना प्राणायाम, साधना याद्वारे मनःशक्तीचा अनुभव येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या ईच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन द्यावे लागेल. जवळच्या किंवा रक्ताच्या नात्यातील कडवटपणा, वाद मिटण्याची प्रसंग येथील तरी त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून घ्या.
मीन :–पित्तप्रकृती असलेल्यांनी पित्तकारक पदार्थ खाऊ नयेत व काळजी घ्यावी. तरूणांनी वाहनाच्या वेगाप्रमाणेच मनावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. कौटुंबिक मतभेदाचे रूपांतर वादात होणार नाही याची काळची घ्या. आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत.
|| शुभं-भवतु ||
Aabhari Aahe Tai
Dhanyawad Tai