Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 08 नोव्हेंबर ते शनिवार 14 नोव्हेंबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
या सप्ताहात चंद्र कर्क, सिंह, कन्या व तूळ या राशीतून भ्रमण करणार आहे.8 रविवार चंद्र रास कर्क असून नक्षत्र पुष्य काळी 8:44 पर्यंत व नंतर आश्लेषा आहे. सोमवार 9 रोजी चंद्र रास कर्क 08:421 पर्यंत व नंतर सिंह. तसेच चंद्रनक्षत्र आश्लेषा 08:41 पर्यंत व नंतर मघा सुरू होत आहे. मंगळवार 10 रोजी चंद्र रास सिंह असून मघा नक्षत्र सकाळी 07:55 पर्यंत व नंतर दिवसभर पूर्वा फाल्गुनी आहे. बुधवार 11 रोजी सिंह रास दुपारी 12:00 पर्यंत असून नंतर कन्या सुरू होत आहे. दिवसभर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. गुरूवार 12 रोजी दिवसभर कन्या रास असून हस्त नक्षत्र 25:54 पर्यंत आहे. तसेच गुरू द्वादशी, गोवत्स द्वादशी व वसुबारस आहे. शुक्रवार 13 रोजी कन्या रास दुपारी 12:31 पर्यंत असून चित्रा नक्षत्र 23:05 पर्यंत आहे.या दिवशी धनत्रयोदशी व यमदीपदान व प्रदोष आहे. शनिवारी 14 रोजी तूळ रास असून स्वाती नक्षत्र 20:09 पर्यंत आहे व नंतर विशाखा नक्षत्र सुरू होत आहे.
मेष :–8 व 9 रोजी ज्यांना प्रकृतीत काहीही त्रास निर्माण झाला असेल त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल डिसचार्ज ही मिळेल. नोकरीतून कांही महत्वाचे लाभ होणार आहेत. पण याच दोन दिवसात संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 10 व 11 रोजी लहान मुलांच्या अंगावर लाल पुरळ उठण्याचा त्रास होईल. याच दोन दिवसात स्वपराक्रमाने उच्चपदावर गेलेल्यांना सार्वजनीक जीवनात मान मिळेल. 12 ची गुरूद्वादशी नोकरीत मानसिक आनंद मिळवून देईल. या सप्ताहात नवीन घराचा विचार सहजपणे मार्गी लागेल. 13 ची धनत्रयोदशी धनाचा लाभ करून देणारी ठरेल. 14 चे लक्ष्मीपूजन कुटुंबात धनलक्ष्मीला स्थिर करेल व धनाची वृद्धीही करणार आहे.
वृषभ :–8 व 9 रोजी व्यावसायिकांना चांगला धनलाभ होईल. गँरेज मालक, मेकँनिक, मशिन आँपरेटर यांना चांगला लाभ होणार आहे जे येथे नोकरी करतात त्यांनाही मोठा लाभ मिळेल. 10 व 11 रोजी पोलीस खाते, सुरक्षा रक्षक , महसूल खाते यांच्यावर कामाचा ताण पडणार आहे व 9 व 10 मधे आरोग्य विभाग, सर्जन , डाँक्टर यांना मात्र कामातून जरा उसंत मिळणार आहे. 12 ची गुरूद्वादशी विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याच्या मार्गावर नेणारी ठरेल. 13 ची धनत्रयोदशी धनाचा लाभ करून देणारी तर आहेच पण त्याही पेक्षा धनसंचयात फार मोठी भर घालणारी ठरेल. 14 चे लक्ष्मीपूजन व्यवसाय उद्धोगातून जूनी येणी वसूल करणारे ठरेल.
मिथुन :–8 व 9 एखाद्या संकटाची सूचना देत आहे. तरी संकटाच्या क्षेत्रात सावध रहावे. सेल्समन , एजंट, औषध कंपन्यांमधील वर्ग, औषध विक्रेते, व स्टेशनरी विक्रेते यांची चांगली चलती राहील. राजकीयदृष्टय़ा ज्येष्ठांना हा सप्ताह कांहीसा त्रासदायक व कष्टाचा जाईल. 12व 13 दरम्यान कलाकार मंडळींना आपल्या कला इलेक्ट्राँनिक मिडीया मार्फत लोकांसमोर सादर करता येतील. 10 व 11 रोजी बालसंगोपन केंद्र, शिक्षक , यांत्रिक कामाचा कुशलवर्ग यांना निरनिराळ्या क्षेत्रातून मोठी मागणी येईल व त्याच्या बुद्धिमत्तेचा व अनुभवाचा वापर सामाजिक पातळीवर होईल. 14 चे लक्ष्मीपूजन गुरूवर्यांच्या आशिर्वादाने अतिशय उत्तमपणे संपन्न होईल.
कर्क :–8 व 9 रोजी महत्वाच्या व उच्चपदावर असलेल्या व्यक्तीबरोबर संपर्क होऊन बोलण्याची संधी मिळेल व त्याचा उपयोगतुमच्या नियोजनासाठी होईल. लोखंडाच्या व्यावसायिकांनी कोणत्याही आर्थिक उलाढाली करू नका. फक्त जून्या येण्याकडे लक्ष दिल्यास वसुली चांगली होईल. 10 व 11 रोजी शिक्षक, मुख्याध्यापक, लेखक, साहित्यकार यांना त्यांच्या विचारांना सामाजिक अनुकूलता मिळेल. धान्य, गवत व कागदाचे व्यापारी यांना चांगली बरकत येईल. तसेच आर्किटेक्ट, इंजिनिअर्स यांना मोठ्या कामांची काँन्ट्रक्टस् मिळतील. सरकारी नोकरीतील मंडळीना कामाचा ताणही जाणवेल पण चांगला लाभही होईल.
सिंह :–10 व 11 रोजी सर्व क्षेत्रात तुमचा सन्मान होणार आहे.समाजसेवक,पुढारी,प्रशासक व संचालक बोर्ड याना महत्वाच्या कामाच्या नियोजनात सामावून घेतले जाईल. राजकिय घडामोडींचा परिणाम वरील मंडळींच्या विचारावर होणार नाही ह्याची पूरेपुर दखल घेतली जाईल 12 व 13 रोजी कामाचा पसारा वाढेल व त्याचबरोबर तुमचे महत्व ही वाढणार आहे. 13 व 14 रोजी मौल्यवान दागिन्यांची खरेदी होईल तसेच कुटुंबासाठी कपडे व आवडत्या वस्तूंची खरेदी होईल. 14 चे लक्ष्मीपूजन एक्स्पोर्ट इंम्पोर्ट च्या कामात अतिशय लाभदायक ठरेल. 8 व 9 रोजी तुमची अंगमेहनत वाढेल व नोकरीच्या ठिकाणी अडचण निर्माण होईल.
कन्या:– 8 व 9 रोजी कामाच्या कार्यक्षेत्रात सहकार्यांच्या व मित्रांच्या मदतीने कामे मार्गावर राहतील. 12 व 13 रोजी प्रोफेसर, चित्रकार, कलाकार, लेखक यांना मानसन्मानाचे जाईल. बातमीदार, जाहिरातदार, पुस्तक विक्रेते, वर्तमानपत्रात काम करणारे यांना तरलाभदायक होईल. वयस्कर मंडळीना पोटात मळमळणे, चक्कर येणे, व अँसिडीटीचा त्रास जाणवेल. 14 चे लक्ष्मीपूजन व्यवसायात वृद्धी आणणारे ठरेल. बँकेचे कर्ज प्रकरणही लवकर होऊन जाईल. 10 व 11 रोजी परदेशी असलेल्या मंडळीना भारतात येण्याची संधी उपलब्ध होईल. लहान मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन त्याना नवनवीन प्रयोग करण्याची ईच्छा होईल.
तूळ :– 14 रोजीचे लक्ष्मी पूजन तुमच्याच राशीत असल्याने धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. त्यातही 8 वाजून 09 मिनिटांपर्यंत असलेले स्वाती नक्षत्र हे तुमचे नशीब मोत्याप्रमाणे चमकवणार आहे. लक्ष्मी प्राप्तीतील अडचले या नक्षत्रातील राहू दूर करणार आहे. 10 व 11 रोजी मित्रांच्या भागीदारीतील व्यवसाय तसेच पती पत्नीच्या भागीदारीतील व्यवसायात लक्ष्मी पूजनापासूनच वृद्धी होणार आहे. इंजिनिअर, आर्किटेक्ट, बांधकाम क्षेत्र, कागदाचे विक्रेते यांना विशेष लाभदायक राहील. फिरते अजेंट, सिनेमातीळ कर्मचारी, चित्रकार, पेंटर फोटोग्राफी करणारे यांनी लक्ष्मीची पूजा आपल्या इच्छेनुसार करून प्रार्थना करावी.12- 13 रोजी कोणतीही कोर्टाची कामे काढू नयेत. दवाखान्यात ऍडमिट असलेल्यांना मात्र नक्कीच घरी जायला मिळणार आहे.
वृश्चिक:- 12 ची गुरुद्वादशी व 13 ची धनत्रयोदशी तुम्हाला व्यवसायात पाय घट्ट रोवण्यात मदत करत आहे. अग्निशी संबंधित असलेले व्यवसाय जसे हॉटेल, कॅन्टीन, सोनरकाम बेकारी इत्यादींना ही धनत्रयोदशी लाभ देत आहे. 10 आणि 11 रोजी नोकरीतील सहकारी वर्ग आणि व्यवसायातील स्किईल्ड वर्कर्स यांच्या मदतीने जगन्नाथाचा रथ ओढणार आहात. खाजगी कंपनीतील अकाउंटंट व कापड मिल मधील कामगार यांना भरभक्कम प्रेमाची भेट मिळेल. 14 रोजी गर्भावती महिलांनी शारीरिक कष्ट ना करता आराम करावा. हट्टी व चिडखोर स्वभावाच्या मंडळींनी मॅन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा व खर्चिक वृत्तीवर नियंत्रण करावे.
धनु:- 14 चे लक्ष्मी पूजन हे तुम्हाला अतिशय लाभदायक असून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मंडळीना त्यांची इच्छापूर्ती करणारी ठरेल. घरापासून लांब राहणाऱ्या मंडळींना पूर्वनियोजित नसूनही घरी जाता येणार आहे. 12 ची गुरुद्वादशी व 13 च धनत्रयोदशी उत्तम वस्त्रालाभ व धनप्राप्तीचे संकेत देत आहे. नास्तिक मंडळींनाही लक्ष्मी कुबेर प्रसन्न होऊन त्यांची धन वृद्धी करतील. 8 व 9 रोजी महिलांना सासरकडून व पुरुषांना सासुरवाडीकडून चांगला धनलाभ संभवतो.नवीन घराच्या प्रतिक्षेतीळ मंडळींना वरसहक्कांचा लाभ होईल. नव्याने आधीकार घेतलेल्या नोकरदार वर्गास मानसन्मान मिळेल. 10 व 11 रोजी पितृघरण्याकडील वृद्ध मंडळींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊन घरात आनंदाचे वातावरण राहील.
मकर:- 8 व 9 रोजी कुटुंबात वैवाहिक जोडीदाराच्या सल्ल्याने एखाद्या उद्योगाची सुरुवात केल्यास आगामी वर्षात चांगला धनलाभ होईल. कागद, पुस्तके, शाई व मिठाई बेकरी चे पदार्थ, बॅग व पर्स यातील व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. 12व 13 रोजी एखाद्या दूरच्या प्रवासाचे नियोजन होऊन त्याच्या माध्यमातून ट्रिप काढाल. या अनुभवातूनही व्यवसायाची सुरुवात करू शकता. 14 चे लक्ष्मी पूजन अतिशय भाग्यशाली राहणार असून आजपर्यंत नकारात्मक झालेल्या गोष्टींना अचानक सकारात्मक स्वरूप येऊ लागेल. लक्ष्मी पूजन हे नातवंडांच्या हातून केल्यास विशेष लाभदायक राहील.
कुंभ:- 8 व 9 रोजी नोकरीतील वादग्रस्त विषय व त्रासदायक घटनांना मागे टाकून प्रगतीच्या वाटेवर पदार्पण कराल. 12 व 13 रोजी शिक्षण संस्थेशी संबंधित व्यक्तींना एखादा पुरस्कार जाहीर होईल. लहानश्या नोकरीत असलेल्यांना त्यांच्या कामातील योगदानाबद्दल चांगले पँकेज मिळेल. व्यवसायातील आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना 10 व 11 रोजी पुढील वाटचालीसाठीचे मार्ग सापडतील. 14 रोजी चे लक्ष्मीपूजन तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी भरघोस यश देणारे ठरेल तरी सरकारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्यांनी श्री लक्ष्मीची प्रार्थना करावी.
मीन :-8 व 9 रोची कशातही तुंतवणूक करू नये. आज शेअरमार्केट मधे फक्त ब्युटी हेल्थ च्या प्राँडक्टमधेच गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होईल. श्री लक्ष्मीच्या उपासकांना अकल्पित धनलाभ होणार आहे. 10 व 11 रोजी नोकरीच्या ठिकाणी अधिकारपदावर तुमचा नंबर लागेल. फँन्सी वस्तूंऐवजी पौराणिक वस्तु, सणासुदीला लागणार्या वस्तुंच्या उद्योगातून चांगला लाभ होईल. 12 व 13 रोजी नवीन घराच्या प्रतिक्षेतील मंडळीना अचानक ओळखीतून अपेक्षित घराचा सुगावा लागेल. 14 पासून मिठाई व बेकरीच्या पदार्थांपासून व्यवसायाला सुरूवात केलीत तर या दिपावलीच्या दिवसात व्यवसाय चांगला चालेल.
||शुभं भवतु||
Dhanyawad Tai