Read In
शनिवार 07 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास कर्क दिवसरात्र. चंद्रनक्षत्र पुनर्वसन 08:04 पर्यंत नंतर पुष्य.सकाळी 07:23 पर्यंत शुभ दिवस.
मेष :–महिलांना त्यांच्या कामातील योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुक होईल. दुग्धजन्य पदार्थांच्या उद्धोगातून चांगला मेळ बसत असल्याचे जाणवेल. हाती आलेल्या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. वडील भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. महिला आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकणार आहेत.
वृषभ :–व्यवसायातील नव्या मार्गांची माहिती मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना समाजाकडून मानाचे स्थान मिळेल. पाळीव प्राण्याची सेवा करावी लागेल. गुढशास्त्राच्या अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल व त्यावर योग्य ते मार्गदर्शन मिळेल. मनातील द्विधा मनस्थितीवर मात कराल.
मिथुन :–मित्रांच्या मदतीने होणार्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. व्यायाम करणार्या, शरिरावर मेहनत घेणार्याना प्रकृतीने चांगली सुधारणा दिसू लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल व कामातून वेगळाच आनंद निर्मुपकपपनवसससववटi स्वतःच्या कोशातून बाहेर येण्याची गरज आहे.
कर्क :–तुम्हाला कांहीही होत नसल्याची सुचना मनाला पटवून द्या. भाड्याच्या घराचा शोध आता फार दिवस करावा लागणार नाही. १० वर्षाच्या आतील मुलांना भाजण्यापासून सांभाळा. तसेच अचानक रडणार्या बाळांना पोटदुखीचा त्रास असण्याची शक्यता आहे. नवीन गायक व वादकांना त्याच्या कलेतून प्रसिद्धी मिळेल.
सिंह :–अचानक खर्चाचे प्रमाण वाढून प्रमाणाबाहेर जाईल. तरी शाँपिग आ जाताना क्रेडीट कार्ड बरोबर नेउ नका. रोखीने व्यवहार करा. नवीन ओळखीच्या व्यक्तीस आनंदाच्या भरात स्वतःची गोष्ट देउन टाकाल. कुटुंबात कांहीही कारण नसताना वाद निर्माण होईल. पशूपक्ष्यांकडून त्रास होईल.
तूळ :–सुग्रास अन्नाचा लाभ होईल तसेच स्वतः न करताही तुमच्यासाठी सुंदर वस्त्राची खरेदी होईल. महिलांना सासरेबुवांची सेवा करावी लागेल तर पुरुषांनाही सासुरवाडीच्या मंडळीना मदत करावी लागेल. तरूणांना मानसन्मानाचे प्रसंग येथील. विवाहेच्छूना आपल्या अपेक्षेप्रमाणे जोडीदाराची निवड करता येणार आहे.
वृश्र्चिक :– आईच्या प्रेमाचा लाभ होईल पण बर्याच बाबतीत आजचा दिवस मनस्तााचा राहील तरी कोणतेही नवीन काम सुरू करू नका. नवीन खरेदी चा उपयोग लाभदायक होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी, शेअरमधील गुंतवणूक फायदेशीर होणार नाही.
धनु:–तुमच्या हितशत्रूंच्या हातात तुमचे कोणतेच व्यवहार उघड करू नका. रोजची प्रेमाचे संबंध असलेल्या मैत्रीत व्यवहारामुळे वाकडेपणा येण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळींना शालेय जीवनातील मैत्रीचे क्षण आठवतील तरी मित्रमैत्रीणींचा शोध घ्या. तरूणांनी पित्तकारक पदार्थांचे सेवन करू नये.
मकर :–बर्याच दिवसापासून आजारी असलेल्यांना उतार पडू लागेल. नवविवाहितांना एकमेकांविषयी आश्वासक वाटू लागेल. मनातील शंका दूर करून स्वच्छ व निर्मळ नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. महिलांनी आपल्या वागण्यातून समोरील व्यक्ती दुखावत नसल्याचा विचार करावा.
कुंभ :–तुम्ही व्यावसायिक असाल तर एखाद्या सरकारी नियमात अडकणार आहात तरी साध रहावे. आईच्या आजारावर तातडीने उपाययोजना करा. दिरंगाई नको. नोकरीतील सहकार्यांकडून अतिशय मोलाची मदत मिळेल. महिलांना प्रकृतीचा जुना त्रास पुनः डोके वर काढेल. तरूणांनी व्यसनांचा विचारही करू नये. संकटाला आमंत्रण द्याल.
मीन :–खाण्यापिण्याची अनियमितता तुमच्या प्रकृतीत पित्ताचा बिघाड निर्माण करेल. औषधांच्या शेअर्स मधून लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्यांना श्री गुरूमाऊलीकडून आशिर्वाद मिळणार आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नये.
||शुभं भवतु||