Read In
शुक्रवार 06 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्र रास मिथुन 25.47 पर्यंत नंतर कर्क. चंद्रनक्षत्र आर्द्रा 06.44 पर्यंत नंतर पुनर्वसु. या दोन्ही नक्षत्र व राशींचा तसेच पाहते 5.30 च्या नैसर्गिक कुंडलीनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रिय फलादेश देत आहे.
मेष:- मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. नियमांच्या चौकडीत राहून गुंतवणूक केल्यास भविष्यात लाभ होईल. विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी अभ्यासात मेहनत वाढवावी. वरिष्ठांनी आपल्या अधिकारांचा वापर सांभाळून करावा.
वृषभ:- जावयाकडून भेटवस्तू मिळण्याचे संकेत आहेत. आज सरकारी कामासाठी झालेला प्रवास लाभदायक ठरेल. जोडीदाराबरोबर घालवलेला वेळ आनंद घेऊन येईल. उष्णतेचा त्रास संभवतो.
मिथुन:- मित्रांसोबत वेळ घालवाल. वडील भावंडांशी बौध्दिक मतभेद होतील. श्री गुरुमाऊलींकडून अध्यात्मिक प्रगतीचे संकेत मिळतील. सासूबाईंकडून भेटवस्तू मिळेल. प्रगतीचे आनंदात वेळ घालवला. म्हणणे खरे ठरेल. मातृतुल्य व्यक्तींची काळजी घ्या.
कर्क:- कुटुंबासाठी उंची वस्त्रांची खरेदी कराल. महिलांना सासुरवाडीकडून अचानक भेटवस्तू मिळण्याचे संकेत आहेत. मातृतुल्य व्यक्तींशी वाद टाळा. सरकारी नोकरदारांनी आज आपल्या अधिकारांचा वापर सांभाळून करावा. आज जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. जुने आजार पुन्हा आपले अस्तित्व जाणवून देतील.
सिंह:- सरकारी कामकाजासाठी केलेला प्रवास सुखकारक व लाभदायक ठरेल. श्री गुरुमाऊलींकडुन अध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थी वर्गाला आजचा दिवस कठोर मेहनतीचा ठरेल. नोकरदार महिला आपली कामामुळे कौतुकास प्राप्त होतील. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान करा.
कन्या:- आज आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. वडील भावंडांशी वैचारिक मतभेद होतील. आपल्या नावडत्या विषयात विद्यार्थ्यांना गुरुवर्गा कडून मार्गदर्शन मिळेल. नोकरदार मंडळींना आपल्या सहकाऱ्यांकडून सहकार्य लाभेल. जुने उष्णतेचे विकार आपले डोके वर काढतील.
तूळ:- आज आपण केलेली गुंतवणूक ही भविष्यात लाभदायक ठरणार आहे. वाहन चालवताना नियम मोडू नका. बँकेचे व्यवहार मार्गी लागतील. जोडीदाराचेच म्हणणे बरोबर असेल. स्त्रियांना मासिक पालियाचा त्रास संभवतो.
वृश्चिक:- संतती कडून अपेक्षापूर्तीचे सुख लाभेल. न्यायालयात अडकलेले जमिनीचे काम मार्गी लागण्याचे संकेत आहेत. नोकरदार मंडळींना वरिष्ठांकडून शाबासकीची थाप मिळणार आहे. कुटुंबाबरोबर वेळ घालवाल. श्वसनाचे आजार असलेल्या मंडळींनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
धनु:- मसाल्याच्या पदार्थांच्या, स्टील व्यवसायात, लोखंडाच्या व्यवसायात गुंतवणूक केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल. मातृतुल्य व्यक्तींशी वादाचे प्रसंग टाळा. सरकारी कामकाजातील न्यायालयीन बाबी मार्गी लागतील. जोडीदाराबरोबर बौद्धिक मतभेद टाळावेत. ऍलर्जी सारखे आजार उद्भण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी.
मकर:- सतत केलेल्या परिश्रमाचे फळ आज आपल्याला मिळणार आहे. शिक्षक, प्राध्यापक वर्गाला वरिष्ठांकडून बौद्धिक आणि जबाबदारीचे कार्य सोपवण्यात येईल. मातृसुखत न्हाऊन निघालं.राजकारणी व्यक्तींनी आपल्या पदाचा गैरवापर करू नये. आपला छंद जोपासताना खूप आनंद अनुभवाला. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
कुंभ- उच्च शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना आज आपल्या मनासारखे शिक्षण घेण्याचे मार्ग उघडे होतील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण घालवाल. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्या.
ll शुभं भवतू ll
Thank you Tai