Read In
गुरुवार 5 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्र नक्षत्र आर्द्रा दिवसरात्र.
मेष:- विवाहित महिलांना माहेरपणाला बोलावणे येईल. नोकरदार मंडळींना बोनसच्या रूपात नसला तरी धनलाभ होणार आहे. लहान मुलांच्या डोक्याला दुखापत होण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी. वयस्कर मंडळींच्या आदर्श स्वभावाचा अनुभव येईल.
वृषभ:- जुन्या त्वचा रोगाच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये. स्वभावातील चिडकेपणा वाढेल. तरी रंगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आज. घसा खवखवणे, आवाज बाहेर न येणे या सारख्या त्रास होणार आहे तरी काळजी घ्यावी. व्यवसायातील त्रासदायक व्यक्तीवर मात कराल.
मिथुन:- विचारातील चंचलता वाढून निर्णय घेता येणार नाहीत. जेष्ठांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्यावा. आई वडिलांकडील सुखद घटना कळतील. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायात चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकण्यापेक्षा ऑडीओ क्लिप मधून विषय लवकर समजेल.
कर्क:- डोकेदुखीचा व मायग्रेनचा त्रास जाणवेल. नोकरदारांना लहानसा प्रवास करावा लागेल. प्रवासात महत्त्वाची कागदपत्रं सांभाळून न्यावी लागतील.विस्मरण होण्याची शक्यता आहे. घर, जागा खरेदी करणाऱ्यानी आज व्यवहाराशी सुरुवात करावी. रजिस्ट्रेशन करू नये(आर्द्रा नक्षत्र).
सिंह:- कुटुंबात सणासुदीच्या समारंभाच्या वातावरणास सुरवात होईल. कुटुंब प्रमुखांकडून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. निद्रानाशाचा त्रास असलेल्यांना आज झोपेचे चांगले सुख लाभेल. शाळा कॉलेज मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनि योग्य ती माहिती घेऊन कागदपत्रांची तयारी ठेवावी.
कन्या:- महिलांना आपल्या आवडीच्या विषयाचे काम मिळेल. तरुण मुले व मुली यांना मनोरंजनातून आनंद मिळेल. नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मंडळींना निरनिराळ्या क्षेत्रांची माहिती मिळेल. बँकेतील कर्मचाऱ्यांनि मॅनूअली काम करताना विशेष काळजी घ्यावी.
तूळ:- विचारांतील समतोलपणा कृतीतून दिसून येईल. बँकेच्या कर्जाच्या परतफेडीचा विषयात बँकेत भेटल्यास मार्गी लागेल. तरुण मुला मुलींना आपल्या सौन्दर्य वाढवावेसे वाटेल. लेखक मंडळींना उत्तम प्रकाशक मिळतील. पाण्याच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक:- शब्दकोडे, पत्ते इत्यादिंचा चांद असणाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करू नये. ज्योतिष विद्या, मंतर विद्येच्या उपासकांना योग्य गुरूचा मार्ग सापडेल. नाटक सिनेमातील कलाकारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. बाळ संगोपनाच्या प्रमुखांनी शिजवलेल्या अन्नाची काळजी घ्यावी.
धनु:- दिलदार मंडळींकडून मोठमोठ्या रकमा समाजासाठी खर्च होतील. हॉस्पिटल व वृद्धश्रामातील प्रमुख वर्गाकडे लक्ष द्यावे. प्रथम संतातीकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. शिक्षक, प्राध्यापकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेचे कौतुक केले जाईल.
मकर:- वयस्कर मंडळींच्या आजाराचा त्रास कमी होऊ लागेल. शेत जमीन व जागा याबाबतील कोर्टातील वाद समांजसपणाने सुटण्याचा मार्ग सापडेल. पाळीव प्राणी हरवणार नाहीत याची काळजी घ्यावी. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शकांकडून आवश्यक त्या सूचना मिळतील.
कुंभ:- पती पत्नीतील विकोपाला गेलेले वाद समंजसपणे सुटण्यासाठी मध्यस्थाची मदत घ्या. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांचे मार्ग मोकळे होतील. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तिंनी अति आत्मविश्वासाने कोणतेही धाडस करू नये.
मीन:- पूर्वीच हरवलेली कागदपत्रे, दस्तऐवज अचानक सापडतील. तरुणांकडून नवीन वाहन घेण्याचे मनसुबे रचले जातील. वडील भावंडांकडून अचानक धनलाभ होईल. दवाखान्यात ऍडमिट असलेल्यांना आज उद्याकडे डिस्चार्ज मिळेल.
ll शुभं भवतु ll
Dhanyawad Tai
Thank you Tai