Read In
बुधवार 4 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास वृषभ 15:42 पर्यंत , नंतर मिथुन रास व चंद्र नक्षत्र मृगशीर्ष 28:50 पर्यंत.आज संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय 20:49 आहे.
मेष:- एखादे वृद्धाश्रम किंवा संगोपन केंद्रासाठी मोठा निधी देण्याचे विचार होतील. लहान मुलांच्या उजव्या डोळ्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. उद्यजकांनी प्रत्येक गोष्ट ही पैसे मिळावण्याची आहे असं विचारकरू नये. विद्यार्थांचे उत्तम वक्तृत्वांचे कौतुक होईल.
वृषभ:- अनेक दिवस एकाच एक काम केल्यामुळे कामात निरसपणा येईल. बदलत्या हवामानाचा परिणाम जाणवणाऱ्या वयस्कर मंडळींनी काळजी घ्यावी. आज डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कर्जासाठी प्रयत्न करत असाल तर तुमचे काम लांबणीवर पडण्याचे संकेत मिळतील.
मिथुन:- महिलांना वडील भावंडाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल. वयस्कर मंडळींना डाव्या कानाचा त्रास जाणवेल. नोकरदार वर्गास हातातून गेलेले अधिकार पुन्हा प्राप्त होण्याचे मार्ग खुले होतील. तरूणांना पाय व पोटऱ्या दुखण्याचा त्रास होईल. भोजन प्रेमींना सुग्रास अन्नभोजन मिळेल.
कर्क:- उच्च शिक्षणाचा प्रयत्न करणाऱ्यांनी आपल्या शिक्षणाची दिशा नक्की ठरवावी. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टकोणात वाढ होईल. वडिलांच्या घरी नातेवाईकांचे येणे होईल. भटजी, ज्योतिषी, पुरोहित यांना मौल्यवान विचारांचा लाभ होईल. वृद्ध मंडळी तीर्थ यात्रेचे बेत आखातील.
सिंह:- वडिलांच्या सेवेत तुमच्याकडून कोणतीही कसर राहणार नाही. मंत्र यंत्राचा अभ्यास करणार्यांना आजचा दिवस अतिशय लाभदायक आहे. श्री गणेशाला नमस्कार करून अभ्यासास सुरुवात करावी. कोर्टासंबंधीत महत्वाचे पत्र येईल किंवा निरोप मिळेल.
कन्या:- आवडीच्या व चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. महिलांची नटण्या मुराडण्याची हौस वाढेल. विवाह इच्छुकांना उत्तम कुळातील जोडीदार मिळेल. वडील किंवा गुरुतुल्य व्यक्तींबरोबर एखादा प्रवास ठरेल. पती पत्नीच्या एकत्रित व्यवसायास वृद्धीचा मार्ग सापडेल.
तूळ:- आज सकाळी उठल्यापासूनच आपल्याला काहितरी होत आहे या विचाराने अस्वस्थता जाणवेल. गर्भवती महिलांनी आज पूर्णपणे आराम करावा. व्यवसाय क्षेत्रात नोकरदार वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. महिलांनी केलेल्या धान्याच्या साठ्याची काळजी घ्यावी.
वृश्चिक:- धार्मिक वृत्तीच्या व्यक्तिंना आज गुरुपदेशाचा लाभ होईल. व्यवसायातील तुमचे अंदाज आज चुकीचे ठरतील.वादग्रस्त विषय टाळल्यास गैरसमजुती होणार नाहीत. शेतीकाम, बागकाम यातील कामात रमून जाल. घरातील पाळीव प्राण्याची तब्येत बिघडेल.
धनु:- जाड, अतिजाड व्यक्तिंनी आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष द्यावे. विद्यार्थी वर्गास शिक्षकांच्या रोगास सामोरे जावे लागेल. किडा मुंग्यांपासून लहान मुलांना जपावे लागेल. वयस्कर मंडळींना कफ, खोकल्याचा त्रास जाणवेल. लहान मुलांच्या लहरीपणातील वाढ आई वडिलांना त्रासदायक ठरेल.
मकर:- उत्तम प्रतिकारशक्ती असलेल्यांनाही आज आरोग्याचा त्रास जाणवेल. नात्यातील जेष्ठ व्यक्तींकडून वस्त्र किंवा अलंकारांची भेट मिळेल. लहान भावंडांकडून मानसिक त्रास देणारी बातमी कळेल. आई व सासुरवाडीकडील मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्या.
कुंभ:- सामाजिक कार्यात भाग घेऊन समाजाला प्रबोधन करण्याची आजची संधी घालवू नका. वाहन चालवताना धोक्याची सूचना ओळखा. उत्तम व मध्यम सांपत्तिक स्थितीच्या लघुउद्योजकांनी आपल्या व्यवसायात करावयाच्या सुधारणा आजच्या दिवशी ठरवल्यास लाभदायक ठरतील.
मीन:- आज प्रत्येक बाबतीत खडाजंगी वाद होण्याचा धोखा आहे. मन शांत ठेवावे. सरकारी काम करताना आर्थिक फसगत होईल. बऱ्याच काळापासून रखडलेला पत्रव्यवहार मार्गी लागेल. लेखक मंडळींच्या चित्तथरारक कथेबद्दल वाचकांकडून चांगले कौतुक होईल.
ll शुभं भवतु ll
Thank you Tai
Tai Aabhari Aahe