weekly-horoscope-2020

साप्ताहीक भविष्य रविवार 01 नोव्हेंबर ते शनिवार 07 नोव्हेंबर 2020

Read In

 

साप्ताहिक भविष्य

साप्ताहीक भविष्य रविवार 01 नोव्हेंबर ते शनिवार 07 नोव्हेंबर 2020

साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.

weekly-horoscope-2020

या सप्ताहात चंद्र – मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीतून भ्रमण करणार आहे. रविवार चंद्ररास मेष 27:40 पर्यंत. चंद्रनक्षत्र भरणी 20:56 पर्यंत. सोमवार वृषभ दिवसरात्र कृतिका 23:48 पर्यंत, मंगळवार वृषभ दिवसभर, रोहिणी 26:29 पर्यंत.  बुधवार वृषभ 15:42 पर्यंतव नंतर मिथुन,  मृगशीर्ष 28:50 पर्यंत. गुरूवार दिवसरात्र, आर्द्रा अहोरात्र. शुक्रवार 2_5:47 पर्यंत, आर्द्रा 06:44  पर्यंतनंतर पुनर्वसन दिवसभर , शनिवार कर्क दिवसरात्र, पुनर्वसु 08:44 पर्यंत व नंतर पुष्य दिवसभर. वरील सर्व राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 5.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

बुधवार 4 संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 20:49( मुंबई) 

शुक्रवार 6 रविचा विशाखा नक्षत्रात प्रवेश 08:13.  तूळ राशीतील वक्री बुध बुधवार 4 पासून मार्गी होत आहे. 

मेष :–आज तुमच्याच राशीत असलेला चंद्र मानसिक बळ मिळवून देणार आहे. उपासना अशीच सुरू ठेवून मनात असलेल्या कार्यांना चांगले मार्गस्थ करू शकाल. 2 व 3 रोजी नोकरीच्या ठिकाणी महिलांना पुरूषवर्गांकडून व पुरूषांना महिला वर्गाकडून सहकार्य मिळणार नाही तरी तशी अपेक्षा करू नये. 4 च्या चतुर्थीला बाप्पाची ऊपासना लाभदायक राहील. शुक्रवार 6 ला अचानक रागाचा पारा चढेल व त्याचा परिणाम तब्बेतीवर होणार आहे.5 व 6 ला भावंडांबरोबरील संबंध एकदम खेळीमेळीचे राहतील तसेच या दोन दिवशी कोर्टाच्या कोणत्याही कामाचे टेंशन घेऊ नका. 

 

वृषभ :–महिलांना नव्याने सुरू केलेल्या व्यवसायातील प्रगतीचे मार्ग दृष्टीक्षेपात येथील. नवीन काँन्ट्रक्टस् मिळण्याचे संकेत मिळतील. 2 व 3 ला आनंद कारक घटना घडतील. कुटुंबातील अडचणींच्या प्रसंगावर चर्चेने मात कराल. आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज भासेल. या सप्ताहात गुंतवणूकीचा विचार करा व तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा. 5 व 6 ला प्रथम अपत्यास जून आनंदाची बातमी कळेल. पुरूष वर्गास सासुरवाडीकडून महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवली जाईल. 7 ला व्यवसायिक बोलणी कराल..

 

मिथुन :–रविवार 1 ला मित्रमैत्रीणींच्या बरोबरील चर्चेतून बर्‍याच विषयांवर उपाय सापडेल. 2 व 3 ला वैचारिक गोंधळ होऊन मन दोलायमान होईल. नोकरीत सहकार्यांबरोबरील संबंध अचानक सुधारत असल्याचे जाणवेल. 4 व 5 रोजी च्या जी कामे धाडसाने करावयाची आहेत त्याची सुरूवात केल्यास कामे मार्गी लागतील.  6 च्या दुपारनंतर मानसिक ताण तणाव जाणवेल. तरी मानसिक त्रास देणाऱ्या कामापासून दूर राहा. राविचा गुरूच्या नक्षत्रातील प्रवेश सरकार दरबारी सन्मान करेल. 

कर्क:- व्यावसायिक क्षेत्रात फार मोठी उलाढाल करण्याच्या फंदात पडु नका. 2 व 3 रोजी मित्रा मंडळींच्या सल्ल्याने क्लिष्ट प्रश्नांची उकल कराल. गुंतवणूकीचा विचार करत असाल तर फक्त शैक्षणीक व अग्नीच्या संबंधित क्षेत्रातील गुंतवणूक लाभदायक राहील. 4 व 5 रोजी मनाला त्रास देणाऱ्या घटना घडतील व तुम्ही जबाबदार नसलेल्या घटनाही तुम्हाला स्वीकारव्या लागतील. 6 चा रविचा विशाखा नक्षत्रातील प्रवेश व्यवसायातील प्रतिष्ठा वाढावेल. 7 चा शनिवार आनंददायी घटना घेऊन येणार आहे. 

सिंह:- आजचा रविवार अतिशय लाभदायक ठरणार आहे. प्रतिष्ठा, मानसन्मान यांनी सुखावून जाल. 2-3 रोजी वडिलांकडील नात्याची वर्दळ राहील व त्यांच्या साठी मोठी खरेदी घडेल. 4 च्या चतुर्थी मानसिक त्रास कमी करण्यासाठी बाप्पाची उपासना करा. 5-6 रोजी बोलक्या मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने सरकारी अडकलेल्या कामात मदत मिळेल. 7 शनिवार चैनीच्या वस्तूंवर खर्च करणारा ठरेल. खण्यापिण्याचीही चंगळ कराल. 

कन्या:- 5-6 रोजी अडकलेल्या, रेंगाळलेल्या कामातून मार्ग काढला व नोकरीत त्या कामाचे क्रेडिट घ्याल. विरोधक तुमच्यावर टीका करण्याच्या तयारीत राहणार असल्याने सर्व व्यवहार सांभाळून करावेत. 2 व 3 रोजी अधिकारतील कामांना प्राधान्य देऊन कामे कामे हातावेगळी करा. 4ची चतुर्थी मनाची चंचलता वाढवेल. 7 च्या शनिवारी एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरेल. एकंदर हा सप्ताह अतिशय मिश्र संवेदनांनाचा काहीसा गुंतागुंतीचा व काळजीने काम करणारा राहील.

तूळ:- 5 व 6 रोजी अतिशय कठीण वाटणाऱ्या प्रसंगावर मात करण्याच्या योजना आखाल. व्यवसायातील प्रतिस्पर्धी व नोकरीतील कनिष्ठ वर्ग तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल. 2-3 रोजी मानासारख्या गोष्टी जुळून येतील. प्रत्येक कामातून फायद्याचा विचार केलात तर हातात काहीच राहणार नाही. 1 चा रविवार वादग्रस्त ठरेल. 4 ची चतुर्थी लाभदायक राहील.

वृश्चिक:-6 चा विशाखा नक्षत्रातील प्रवेश सद्गुरूंच्या सहवासात जाईल. मान्यवर गुरूतुल्य व्यक्तीकडून मोलाचे मार्गदर्शन होईल. स्वभावातील हॅक व हट्टीपणा सोडल्यास या सप्ताहात होणार त्रास कमी होईल. 1 चा रविवार सप्ताहाच्या सुरवातीला मात्र आनंदाच्या व समाधानाच्या घटना घडवणार आहे तरीही कुटुंबात जोडीदाराबरोबर जुळवुन घ्यावे लागेल. 2 व 3 रोजी पुरुषांनी महिलांबरोबरचे व महिलांनी पुरुषांबरोबरचे वादाचे प्रसंग टाळावेत. सामाजिक ठिकाणी मतप्रदर्शन करताना सौम्य शब्दांचा वापर करावा.

धनु:- या सप्ताहात 1 व 7 रोजी तुमच्याकडून तुमच्या नावावर महत्त्वाच्या गोष्टी जमा होऊन तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. जेष्ठ व श्रेष्ठ महिलांचा आपल्या वागण्याने अपमान होणार नाही याची काळजी घ्या. 4 ची चतुर्थी लाभदायक ठरणार असून न मागता जुने येणे वसूल होईल. रविचा विशाखा नक्षत्रातील प्रवेश तुमच्या साठी मान सन्मानाचा लाभ घेऊन येणार आहे. उच्च विभूषितांना समाजाला प्रबोधन करण्याची संधी मिळेल. एकंदर हा सप्ताह सुख समाधानाच्या सोहळ्यांचा राहील.

मकर:- 2व 3 रोजी सरकारी कामातील गुंता सोडवण्यास यश येईल. मनोविकार तज्ज्ञांना 3 रोजी येणार अनुभव स्मरणात राहणारा ठरेल. महिला मातृत्वाच्या भावनेने प्रश्नांची उकल करतील. तर पुरुष तेच प्रश्न आपल्या स्वभावातील जरबेने, आक्रमकतेने मार्गी लावतील. 4 ची संकष्टी चतुर्थी कुटुंबातील नात्यात कडवटपणा निर्माण करेल. 6 चा विशाखा नक्षत्रातील प्रवेश तुमच्या बोलण्यातील चातुर्याने यश मिळवुन देईल. वक्ते मंडळींना आपले म्हणणे समाजाच्या गळी उतरवता येईल. 

कुंभ:- 4 ची संकष्टी चतुर्थीला कुटुंबातील जुन्या गोष्टींना नव्याने ऐकावे लागेल. 2 व 3 रोजी खाजगी नोकरीतील कर्मचाऱ्यांना जबाबदारीच्या कामास सामोरे जावे लागेल. बाळ संगोपन, मानसोपचारतज्ज्ञ यांना त्यांच्या समोर येणारे प्रश्न अतिशय सावधपणे, हळूवार व वात्सल्य भावनेने सोडवावे लागतील. तरुण मूलामुलींना आपल्या प्रश्नात इतरांनी व जेष्ठ व्यक्तिंनि डोकावल्याचे आवडणार नाही. 1 चा रविवार धावपळीचा व उलाढालीचा राहील. आर्थिक व्यवहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

मीन:- 2 व 3 रोजी महिला मंडळ, महिला सक्षमीकरण येथे प्रबोधन करता येणार आहे. समाजातील आर्थिक मागासलेल्यांसाठी चालू असलेल्या प्रकल्पातील चाललेली वाटचाल ही फक्त तूमच्याच कर्तृत्वावर राहील. वकील मंडळींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार नाही तरी तसा प्रयत्न करू नये. 1 व 7 रोजी मनःशक्ती केंद्राचे गुरुवर्य यांना फार मोठ्या घडामोडीत सहभाग घ्यावा लागेल. चर्चेने प्रश्न सुटण्याऐवजी अधिकाराचा वापर करावा लागेल. एकंदरीत हा सप्ताह फार मोठ्या जबाबदारीचा राहील.

 

ll शुभं-भवतु ll

One thought on “साप्ताहीक भविष्य रविवार 01 नोव्हेंबर ते शनिवार 07 नोव्हेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *