daily horoscope

दैनिक राशीभविष्य शनिवार 31 आँक्टोबर 2020

Read In

 

शनिवार 31 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज चंद्र रास मेष व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 17:57 पर्यंत नंतर भरणी. आजपासून कार्तिक स्नानास प्रारंभ होत असून नवान्न पौर्णिमा आहे.या नवान्न पौर्णिमेविषयीची माहिती वेगळ्या लेखात दिलेली आहेच.

ज्येष्ठ अपत्यास निरांजनाने ओवाळावे. सकाळी 07:02 नंतरचा दिवस शुभ आहे.

मेष :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांना गोड बातमी कळेल. आजचा दिवस तुम्हाला लाभदायक असल्याने तुमच्यापर्यंत येणार्या सर्वच बातम्यानी आनंदी व्हाल.

वृषभ :– वयस्कर मंडळीना सुग्रास जेवणाचा आनंद मिळेल. जून्या दुखण्यांवर डाँक्टरांकडून आवश्यक ती ट्रिटमेंट मिळेल. सांधेदुखी च्या महिलांना प्रकृतीचा त्रास जाणवेल.

मिथुन :–वडिलांच्या मदतीने नवीन कामाची सुरूवात कराल. जून्यामित्रमैत्रिणींची भेट होईल. आवडत्या व्यक्तीसाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. लहानशा प्रवास करावा सांगेल.

कर्क :–कलाक्षेत्रातील प्रगती उत्साहजनक राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल. कलावंत, लेखक यांना आपल्या कला सादरकरण्यास मिळतील.

सिंह :–स्वत:च्या सुखापेक्षा इतरांची बाजू महत्वाची वाटून पदरमोड करून दुसर्‍यांसाठी खर्च करावा लागेल. भाऊ भावजय यांवरील विश्र्वासाचे फळ सुखदायक मिळेल.

कन्या :–बचतीचे महत्व कळेल. मित्राच्या व्यवसायात नव्याने गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. दलाल मंडळीना नवीन सौदे लाभदायक राहतील.धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च कराल.

तूळ :–जून्या मैत्रिला जागावे लागेल. मित्राने केलेली उधारी तुम्हाला भागवावी लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही.

वृश्र्चिक :–कुटुंबातील शुभकार्याकरिता पैश्याची मोठी मदत करावी लागेल. मनोबल वाढवणार्‍या घटना घडतील. मेहनती तरूणांच्या कामाचे कौतुक होऊन वरिष्ठांकडून पगारवाढ मिळेल.

धनु :–देवळाचे पुजारी, ज्योतिषी यांना नवीन कामाच्या माध्यमातून लाभ होईल. दुपारनंतर चा वेळ जास्त सत्कारणी लागेल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल..

मकर :–आज आरामाचा दिवस आहे. कामातील ताणतणावामुळे नवीन कामाला उत्साह वाटणार नाही.आरोग्याची काळजी घ्या. शेजार्यांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी.

कुंभ :पूर्वी दिलेल्या इंटरव्यूमधून नोकरीसाठी काँल येईल. नोकरीत वरिष्ठांबरोबरचे वाद अडचणीत आणतील. निद्रानाशाचा त्रास असलेल्यांना गुरू चा उपदेश मिळेल.

मीन:– स्वप्नांचा सूचक अर्थ समजून घ्या.परोपकाराची संधी मिळेल.उद्धोगव्यवसायात नव्याने गुंतवणूक कराल. महिलांना होम सायन्स मधे उत्तम यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे व उत्साहाचे राहील.

|| शुभं – भवतु ||

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य शनिवार 31 आँक्टोबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *