Read In
शुक्रवार 30 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास मीन 14:56 पर्यंत नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 14:56 पर्यंत नंतर अश्र्विनी. आज दुपार पर्यंत चतुर्दशी असून नंतर पौर्णिमा सुरू होत आहे. सकाळी 6:40 ते 14:56 या वेळेत शुक्र रेवती अमृतयोग आहे. आज सकाळी 10:44 ला शुक्राचा कन्या राशीत प्रवेश होत आहे. आज ईद– ए -मिलाद आहे. मीन व मेष राशीचा विचार करून आणि रेवती व अश्र्विनी नक्षत्राचा विचार करून आजचे कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. . आजारी मंडळीना जरी स्नान करणे जमले नाही तरी हातपाय धुवून देवीची उपासना करावी.
मेष :–आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र अनुभवाचा राहील. रेवती व अश्र्विनी नक्षत्रावर येणारी पौर्णिमा आनंद व सुख यांचा मिलाप देणारी ठरेल. मनातील ईच्छा पूर्ण करणारी आहे
वृषभ :–आज अनपेक्षित एखादी लाभदायक घटना घडेल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील तरी वैचारिक गोंधळ उडणार नाही याची दखल घ्या. नोकरीत अगदी कमी कालावधीसाठी अंतर्गत बदली होईल.
मिथुन :–प्रत्येक कामात तुम्ही आज कार्यतत्परता दाखवणार आहात. सामाजिक कामात सहनशील असावे लागेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनात अडकू नये. विशेषतः व्यसनापासून दूर रहावे.
कर्क :–मनांत आलेल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यानी आपला अभ्यास जोरदार सुरूच ठेवावा. आज करावयाच्या आर्थिक गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल.
सिंह :– आज तुमच्या मनाला आनंद देणार्या गोष्टी करण्याची संधी मिळेल. व्यवसायातील खाचाखोचांवर चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. गर्भवती महिलांनी कामाचा फार ताण घेऊ नये.
कन्या :–दुकानदार मंडळीना नवनवीन प्रयोग सुचतील. लहान मुलांसाठी प्रवासात वेगळी सोय करावी लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका स्वत: जाऊन भेटून या.
तूळ :–जूनी उधारी वसूल होईल. शेअर्स लाँटरीत फायदा होईल. शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. नोकरी बदलण्याचा विचारही करू नका.
वृश्र्चिक :–मानसिक त्रास कमी होत असल्याचे जाणवेल. हाती आलेले नवीन प्रकल्पांना प्राधान्य द्या. जून्या प्रोजेक्टकडून चांगले मानधन मिळेल. नव्या विचारांना कार्यान्वित करा.
धनु :– लहान मुलांच्या खेळण्यांकडे लक्ष द्या दुखापतीचा धोका आहे. सकाळ अतिशय उत्साहात व आनंदात जाईल. मानसिक आजार असलेल्यांना आरामाची व समुपदेशनाची गरज भासेल.
मकर :–आज प्रत्येक कामात कष्ट वाढणार आहेत. स्वत:च्या जीवावर मोठे काम काढू नका. कुटुंबात पत्नीबरोबर मिळुन मिसळुन काम कराल. आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज भासेल.
कुंभ :– संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांना आश्र्चर्यजनक अनुभव येईल. सामाजिक स्तरावर कतृत्वाचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी अभ्यासातील मेहनत कमी पडत असल्याचे जाणवेल.
मीन :–कामातील घाई गर्दी मानसिक ताण वाढवेल. नात्यातील संबंधात प्रेमाचा सल्ला मिळेल. न्यायालयातील कामास प्राधान्य देउन वकीलबुवांची भेट घ्या. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत.
|| शुभं – भवतु ||
Accurate bhavishya aste, thank you