Read In
गुरूवार 29 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास मीन असून चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 11:59 नंतर रेवती सुरू होत आहे… या नक्षत्रांच्या कालावधी रून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली वरून कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजची सकाळ अजूनही काही प्रमाणात मरगळलेली असणार आहे. महिलांना कुटुंबातील सदस्यांची ख ात मदत मिळेल. लहान मुलांच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे दिसून येईल.
वृषभ :–कलाकार मंडळीना आपल्या कलेमुळे प्रसिद्धी मिळत असल्याचे जाणवेल. आजचा दिवस अतिशय घाईगडबडीचा जाईल. पतीपत्नीमधील समंजसपणा भरभरून वाढेल.
मिथुन :–विद्यार्थी वर्गाला आपल्या आवडत्या क्षेत्रात बाजी मारण्याची संधी मिळेल. वयस्करांनी आपला वेळ आनंदात जाण्यासाठी जूना छंद आठवावा. चित्रकलेत वाहवा होईल.
कर्क :- गायन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बोलावणे येईल. महिलांना स्वत:कडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवेल. शिक्षक प्रोफेसर मंडळीना अचानक आपले फंडे बदलावे लागतील.
सिंह :–किरकोळ विक्रेत्यांना उद्धोगातून चांगला फायदा होईल. तरूणांना दगदग खूपच होणार आहे. व्यावसायिकांना एक जोडधंदा मिळेल व त्याना दुसर्याकडून विचारणा होईल.
कन्या :–बहिणभावंडातील रूसवे फुगवे आईच्या मध्यास्थिने कमी होतील. आज तुमचा आनंदाचा व उत्साहाचा दिवस आहे त्यामूळे जूनी रेंगाळलेली कामेही पार पाडाल.
तूळ :–नव्या उमेदीने कामाला लागाल. सहकार्यांची उस्फूर्त मदत मिळेल. महिलांना प्रकृतीचा त्रास संभवतो तरी काळजी घ्यावी. शिक्षकांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
वृश्र्चिक :–मनावरचे ओझे कमी होईल व मन मोकळे होईल. नोकरीत सहकार्यांबरोबरील संबंध वृद्धीगत होतील व जूने वाद, गैरसमज यांनाही संपवण्याचे मार्ग सापडतील.
धनु :–आई वडीलांना एखादी तुमच्याकडून मौल्यवान भेट देण्याचे ठरेल. विशेषतः क्रिमिनल वकिलांना कामातील गुंतागुंत वाढल्याचे जाणवेल. घराला भाडेकरू चालून येईल.
मकर :–लहान मुलांना आगीपासून सांभाळावे लागेल. नोकरीत वरीष्ठांकडून कामाचे कौतुक तर होईलच पण सहकार्य कडून ही मान मिळेल. सामाजिक स्तरावर तुमच्या कष्टाचे चीज झाल्याचे जाणवेल.
कुंभ :–पुरूष मंडळीना वडीलांकडील ज्येष्ठांची काळजी वाढवणार्या घटना घडतील. तरूणांनी अ आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यवसायात भागीदाराच्या मताचा विचार घ्यावा लागेल.
मीन :–मनातील भावनांना मोकळी वाट द्यावी लागेल. घाईगर्दीत महत्वाच्या गोष्टी विसरल्या जातील. व्यवसायानिनीत्ताने लहानशा प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेचा सराव करावा.
|| शुभं – भवतु ||
Dhanyawad Tai