Read In
बुधवार 28 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज बुधवार चंद्र रास मीन असून चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा सकाळी09:10 पर्यंत असून नंतर उत्तरा भाद्रपदा सुरू होत आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. आज प्रदोष आहे.
मेष :–या गेलेल्या सप्ताहातील झालेल्या दगदगीमुळे आज आराम करावा असे मनात येणार आहे. दिवस कंटाळवाणा जाईल. शरिराच्या व मनाच्या इच्छेविरुद्ध त्यांना कष्टवू नका. आराम नाही करता आला तर निदान आवडीची गाणी ऐका.
वृषभ :– मित्रमंडळींच्या घोळक्यात, पसार्यात स्वत:ला विसरून जाल. कोर्टात रखडलेल्या कामातून सहिसलामत सुटण्याचे संकेत मिळतील. घरातून रागवून गेलेल्या व्यक्तीला घराची आठवण येईल व परतही येण्याचे मार्ग सुचतील.
मिथुन :–नोकरीतील प्रतिष्ठेत वाढ होईल.नव्याने सुरू केलेल्या व्यवसायात प्रगतीचे मार्ग सापडतील. चैनीच्या वस्तुंची खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल.
कर्क :–नोकरीत बदलाची अपेक्षा करणार्यांनी अचानक घुमजाव करू नका. ज्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत त्यांना काही जाचक अटी सहन कराव्या लागतील. लहान मुलाचे त्यांची चांगल्या वागणूकीबद्धल प्रशंसा होईल.
सिंह :– सरकारी आँफिसर्सना वेगळ्याच प्रकरणात अडकवण्याचा धोका आहे. तरूण महिलांनी कोणावरही अतिविश्र्वासाने अवलंबून वागू नये. बांधकामाच्या कामात त्रास निर्माण होईल.
कन्या :–आजारी आहोत अशी शंका जरी आली तरी डाँक्टरांकडे जावे. वैवाहिक सुखामध्ये वादग्रस्त विषय त्रास देतील. स्वत:च्या सुखापेक्षा इतरांची बाजू लावून धराल. नातेवाईकांसाठी धावपळ करावी लागेल.
तूळ :–कोणत्याही विषयावर स्पर्धात्मक चर्चा करू नका. उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रथम मनाची तयारी करा व मगच उडी घ्या. व्यवसायात समाधान मिळेल.
वृश्र्चिक :–नोकरीच्या शोधात असलेल्यांनी घाई करू नये. फसगत संभवते. व्यवसायातील बदल तक्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. लहान मुलींची काळजी वाटणारी गोष्ट घडेल.
धनु :– वादग्रस्त विषयाची कोंडी फुटेल. पैशाच्या देव घेवीच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मायग्रेनचा त्रास संभवतो. पुरूष मंडळीनी खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
मकर :–भाड्याचे घर असेल तर घराचा ताबा सोडण्याच्या सुचना मिळतील. शिक्षणामधे खंड पडू नये यासाठी मेहनत वाढवावी लागेल. आपण म्हणतो तेच खरे ही वृत्ती सोडल्यास मित्रांचे व इतरांचेही सहकार्य मिळेल.
कुंभ :–पूर्वनियोजित प्रवासात अचानक बदल होऊन कामाची लाईनच बदलेल. तरूणांना आज घराबाहेर पडूच नये असे वाटेल. हरकत नाही., आराम करा. आवडत्या छंदाला वेळ द्या.
मीन :–व्यवसायात आज आवक मनासारखी होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा शेअर्स मधील व्यवहार नको. कौटुंबिक प्रश्रन सोडवताना अतिभावूक होऊ नका. कामाच्या ठिकाणी लोकांसमोर आदर्श निर्माण कराल.
||शुभं– भवतु ||
Thank you Tai