daily horoscope

दैनिक राशीभविष्य मंगळवार 27 आँक्टोबर 2020

Read In

 

मंगळवार 27 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज चंद्ररास कुंभ 26:30 पर्यंत आहे व चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा अहोरात्र. या रास व नक्षत्र याचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष:– मनामध्ये अतीव तिव्रतेने आलेल्या गोष्टींचा विचार करा. कदाचित पुढील घटनेची महत्वाची सुचना असू शकते. हितचिंतकांकडून महत्वाचा उपदेश मिळेल.

वृषभ :–पुरूष मंडळीना डाव्या कानाचा त्रास उद्भवेल. शिक्षण क्षेत्रातील संबंधितांनी आपली कामे दुसर्यांवर सोपवू नयेत. त्वचेच्या त्रास कमी होऊ लागल्याचे जाणवेल.

मिथुन :–मनातील विचार तुमच्या देहबोलीतून दुसर्यांना कळतील. नवीन कपडे परिधान कराल. आर्थिक बाबतीत नियोजनाची गरज भासेल. आज तुमची औषध क्षेत्रातील गुंतवणूक लाभदायक ठरेल.

कर्क :–आज कुटुंबात आनंदोत्सव साजरा कराल. आजोळ कडील नातेवाईकांचे येणे होईल. भाजी मार्केटमधे तुमची पर्स सांभाळा. घाईगडबडीत हरवण्याची शक्यता आहे.

सिंह :–मित्रमंडळींकडून तुमच्या हुषारीबाबतचे शाब्दिक प्रमाणपत्र मिळेल. लहान बहिणीकडून आवडत्या गोष्टीची भेट मिळेल. गणित शाखेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

कन्या :–मनातील शंका बोलून दाखवल्यामुळे प्रश्र्न लवकर सुटेल. राजकारणातील मंडळीना कायदेशीर मार्गाने प्रगतीचा मार्ग सापडेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून चांगले सहकार्य मिळेल.

तूळ :–आर्थिक क्षमतेवर इतरांचा विश्र्वास बसणार नाही. मनातील जून्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हितचिंतकांची चांगली मदत मिळेल. कामातील घाई नुकसान करेल.

वृश्र्चिक :–बोलण्यातील कडवटपणा कमी झाल्याचा दाखला विरोधकांकडून मिळेल. व्यवसायातील संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यवहार जपून करावेत.

धनु :–शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना सामाजिक पातळीवर काम करावे लागेल. लाँटरी, शेअर्स यामधे आज कोणतीही उलाढाल करू नये. वृद्ध व वयस्कर मंडळींनी पायांची काळजी घ्यावी.

मकर :–पाण्यापासून त्रास संभवतो.. पुरूष मंडळीनी न पेलवणारे धाडस दाखवू नये. जागेचा ठरलेला व्यवहार अचानक बिघडणार आहे तरी अविचाराने आर्थिक व्यवहार करू नका.

कुंभ :–बालसंगोपन या विषयावर तुमच्या अभ्यासाला समाजाकडून चांगली दाद मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात तुमचा उल्लेख सन्मानाने केला जाईल. खेळाडूनी आपली उद्दीष्ट्ये नक्की करावीत.

मीन :–कुटुंबातील कुरूबुरीचे कारण कळेल. व्यवसायातील गणिते अचुक ठरतील. वकील मंडळीनी दुसर्याच्या अभ्यासावर शंका घेण्याचे धाडस करू नये.

|| शुभं – भवतु ||

 

One thought on “दैनिक राशीभविष्य मंगळवार 27 आँक्टोबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *