Read In
सोमवार 26 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास कुंभ दिवसभर, चंद्रनक्षत्र शततारका 30:35 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–महिलांना सासूबाईंच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अधिकारी मंडळीना आपले अधिकार वापरताना मर्यादा येथील. अचानक डोळ्यांचा त्रास जाणवेल. वडिलांकडून मोलाच्या सूचना मिळतील.
वृषभ :–नातवंडांना आजी आजोबांबद्धल प्रेमाचे भरते येईल. सामाजिक कार्यातील सहभागाने मनस्ताप होईल. आज एकदम मोठी उडी घेउ नका. संतती कडून अतिशय आनंद मिळेल.
मिथुन :–कामाची वाटणी करू नका. बर्याच दिवसापासून मनात असलेल्या प्रश्र्नाला वाचा फुटेल. अति घाईने केलेल्या कामात चुका निघून ते परत करावे लागेल.
कर्क :–महत्वाच्या कामासाठी पूर्वतयारी करावी लागेल. लहान मुलांचा कानाचा त्रास अचानक वाढेल तरी दुर्लक्ष करू नका. मित्र मैत्रिणीच्या घरातील वादग्रस्त विषय सोडवण्याची जबाबदारी पार पाडाल.
सिंह:-:सकाळपासून सर्वच कामात घाईगडबड होणार आहे. मानसिक शांतीसाठी तरूणांनी प्राणायामाचा अभ्यास करावा. बहिणीबरोबर वार्तालाप आनंद देईल. बँकेचे व्यवहार स्वत: करावेत.
कन्या :–बोलण्याच्या ओघात अचानक नको त्या गोष्टी उकरून काढल्या जातील. प्रथम संततीच्या बाबतीत जागरूक रहावे. मुलांचे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवा.
तूळ :–मनावर ताण येऊन ब्लडप्रेशरचा त्रास होण्याचे संकेत मिळतील. मानसिक शांततेची गरज आहे. वडिल भावंडांबरोबर महत्वाची चर्चा कराल. नोकरीच्या कामामध्ये अनुत्साह जाणवेल.
वृश्र्चिक :–श्री जगदंबेच्या कृपादृष्टीसाठी उपासना वाढवावी लागेल. निर्णयात दोलायमान व्हाल. महिलांना खरेदीचा मूड येईल. कुटुंबातील ज्येष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
धनु :–खर्चावर नियंत्रण घालावे लागेल. बँकेतील महत्वाच्या कामांना वेळ द्या. दुसर्यांवर सोपवू नका. आज दुपारनंतरचा वेळ आनंदात जाईल. कलाकार मंडळींचे मनोधैर्य वाढेल.
मकर :–लोखंडाच्या व्यावसायिकांनी मोठ्या आर्थिक व्यवहाराचा विचार करू नये. नातवंडांच्या बाबतीत आजी आजोबांनी न पेलवणार्या गोष्टींची जबाबदारी घेऊ नये.
कुंभ :–महिलांनी ऊपवासाच्या भानगडीत पडू नये. ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी आज आराम करण्याची गरज आहे. वडिलांकडील कुटुंबातून काळजी लावणारा निरोप येईल.
मीन :–महत्वाची कागदपत्रे सापडणार नाहीत. डाँक्टरी पेशातील मान्यवरांना समाजाकडून कौतूकाचे शब्द ऐकायला मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीची भेट घडेल व अवघड प्रश्र्न सुटतील.
|| शुभं – भवतु ||
Dhanyawad Tai