Read In
साप्ताहिक भविष्य
साप्ताहीक भविष्य रविवार 25 आँक्टोबर ते शनिवार 31 आँक्टोबर 2020
साप्ताहिक भविष्य कृष्णमूर्ती पद्धती नक्षत्रीय फलादेश.
या सप्ताहात चंद्र मकर, कुंभ मीन, व मेष या राशीतून भ्रमण करणार आहे.
25 रविवार मकर रास 15:25: पर्यंत चंद्र नक्षत्र धनिष्ठा 28:22 पर्यंत,/ 26 सोमवार कुंभ रास दिवसभर , चंद्र नक्षत्र शततारका 30:35 पर्यंत, /27 मंगळवार कुंभ रास 26:30 पर्यंत, चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा अहोरात्र/,. 28 बुधवार मीन रास दिवसभर, चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा 09:10 पर्यंत/ 29 गुरूवार मीन रास, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 11:59, /30 शुक्रवार मीन रास 14:56 पर्यंत, चंद्रनक्षत्र रेवती 14:56/, 31 शनिवार पौर्णिमा मेष दिवसभर चंद्रनक्षत्र अश्र्विनी 17:57 पर्यंत नंतर भरणी.
** रविवार 25 रोजीचा दसरा लोखंडाचे व्यवसाय, धान्याची किरकोळ विक्री, सॅनिटरी वस्तू यांच्या उलढलातून फायदा देणारा आहे.
मेष :–28, 29 ला नोकरीमध्ये विशेष सुखकारक व सन्मानाच्या घडामोडी घडतील. व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्यांची विशेष दखल घेतली जाईल. 25 व 26 ला प्रथम संपत्तीची काळजी करावयास लावणारे प्रश्र्न वाढतील. महिलांना हार्मोनल चेंजेसचा त्रास होईल व चिडचीड वाढेल. 31 शनिवारची पौर्णिमा आयुष्याला वेगळेच सकारात्मक वळण देणारी ठरेल.
वृषभ :–25, 26 व 27 या तीन दिवसात जेवढे संकल्प करता येतील तेवढे करून घ्या 25 चा दसरा यशदायी व धनदायी ठरेल. बालसंगोपन केंद्र चालवणार्यांनी विचाराधीन असलेल्या नवनवीन योजनांचा शुभारंभ करावा. 28,29 डोकेदुखीचा किंवा जुना शारीरिक त्रास उद्भवेल. 25 च्या रविवारचा दसरा भाग्योदयाची सूचना देत आहे.
मिथुन:- 26, 27 जुन्या योजना कार्यान्वित करण्यावर विचार करावा. स्वतःचा प्रॉडक्शन प्लांट असलेल्यांना जास्त लाभदायक ठरेल. नोकरीतील कोणत्याही अडचणीची शनी महाराजांची उपासना लाभदायक ठरेल. 31 ची कोजागिरी पौर्णिमा मोठ्या आर्थिक उलढालीची ठरेल.
कर्क:- 28 व 29 आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तिंना गुरुपदेशाची ठरेल. 26, 27 आळस, कंटाळा पाठ सोडणार नाही. तरीही 27 चे पूर्व भाद्रपदा नक्षत्र हातात छडी घेऊन तुमच्याकडून काम करून घेईल. 25 ला टिनएजर्स आडमुठेपणाने वागतील. 26 ला महत्त्वाची कामे काढू नयेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर कामे हातावेगळी करण्याचा संकल्प करा.
सिंह:- 28 व 29 प्रत्येक कामात सर्व सूत्रे आपल्या हातात असावी असे वाटेल. बॉसगिरीची वृत्ती उफाळून येईल. 28 व 29 गुरुकृपेचा वरदहस्त लाभून नियोजित कामात मदत होईल. गुरुदीक्षा घेतलेल्या साधकांनी उपासनेचे बाळ वाढविल्यास संकटांचा सामना करणे सहज शक्य होईल. दसऱ्याचा मुहूर्त शुभ असला तरी नवीन योजना राबवू नयेत.
कन्या:- 26, 27 जुनी रेंगाळलेली, दुर्लक्षित बझालेली कामे स्वतःहुन करायला घेतल्यास नक्कीच कामे मार्गी लागतील. 28 व 29 ला नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल व व्यवसायात भागीदाराला चुचकारावे लागेल. -31 ची पौर्णिमा उलढालीतून लाभ देईल. 25 चा दसरा नवीन योजना सुरू करण्याची सूचना देत आहे.
तूळ:- 26-27 आर्थिक व्यवहारांची गणिते चांगली जुळतील. व्यवहारात चाणाक्ष बुद्धी वापरा. 28-29 वयस्कर लोकांचा सल्ला पटणार नाही तरीही ऐकून घ्या. 25 चा दसरा घर शेतजमीन यातून होण्याऱ्या लाभाची सूचना देईल.30-31 ची पौर्णिमा ओळखीतूनकमे करण्याची संधी देईल.
वृश्चिक:- 28-29 आजारांवर उतार पडेल. वरिष्ठ पदावर असलेल्या नोकरदारांनी हाताखालील मंडळींवर कायद्याचा बडगा उचलू नये. 30-31 ला नियमांच्या बंधनात राहून कामे करा. 25 च्या दसऱ्याला असमाधान किंवा राग यांचा स्फोट होऊ देऊ नका. वडिलांकडील नातेवाईकांची चौकशी करा.
धनु:- 26-27 नोकरीतील दगदग वाढेल व जबाबदरीतही वाढ होईल. वकील मंडळींना आपले म्हणणे मांडताना अडथळ्यांचा सामना करावा लागेल. कुटुंबात सहकार्याची भावना ठेवल्यास वाद निर्माण होणार नाहीत. 25चा दसरा लोखंडाच्या व्यावसायिकांना लाभदायक जेल. व्यवहार करा.
मकर:- 26-27 ला नोकरदार मंडळींनी जुनी पुराणी प्रकरणे हाताळू नयेत. 28-29 ला लहान मुलांकरिता दवाखान्याची फेरी करावी लागेल. दवाखान्यात ऍडमिट असलेल्यांना आराम पडेल पण डिस्चार्ज मिळणार नाही. 25 चा दसरा बांधकाम क्षेत्र, शेअर मार्केट व पोलीस खात्यातील कामांना लाभदायक ठरेल.
कुंभ:- 30-31 ची पौर्णिमा उत्साहाची व धावपळीची राहील. 28-29 मौल्यवान वस्तू व घर सुशोभित करणाऱ्या वस्तूंची खरेदीचा ठरेल. 26-27 विद्यार्थ्यांना केलेल्या मेहनतीचे फळ देणारी ठरेल. तसेच महिलांना बाहेर पडून आवडीच्या वस्तूंची भेट मिळेल. 25 चा दसरा जुने येणे वसूल करू देईल.
मीन:- 26-27 किरकोळ विक्री दारांना लाभदायक ठरेल. नवीन भांडवल गुंतवायला हरकत नाही.28-29 सामाजिक स्तरातून तुमच्या वस्तूंची मागणी वाढण्याचे लक्षात येईल. 30-31 कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची चिंत सतावेल. 25 चा दसरा तुमची सामाजिक पत वाढवणारा ठरेल.
Il शुभं भवतु ll
Thank you Tai