महानवमी व दसरा समारंभाचे महत्व

Read In

 

महानवमी व दसरा. सोने लुटणारा दसरा.

Dussehra 2020

 

आज शनिवार 24 आँक्टोबर 2020 अष्टमीची तिथी सकाळी 06:58  पर्यंत असून त्यानंतर नवमी सुरू होत आहे.  नवमीची तिथी रविवारी 07:41 असल्याने महानवमीचा उपवास शनिवारी 24 आँक्टोबर रोजी आहे. नवरात्र उठण्यास एकच दिवस शिल्लक असल्याने आज एकरात्रोत्सवास आरंभ होत आहे .तसेच आज शनिवारीच खंडेनवमी असल्याने देवीच्या जवळ राजचिन्हे, शस्त्रे, आयुधांची, पूजा करण्याची प्रथा आहे. . खंडेनवमी म्हणजे आयुधांची पूजा होय. प्रत्येकानी आपल्या आपल्या कामाची असलेली आयुधे पूजावीत. आमच्या काळात आम्ही पाटी पेन्सील , पेन , कंपास बाँक्स, तर आमची आई शिवणाच्या मशीनची व बाजाच्या पेटीची व तबल्याचीही पूजा करत असे.एवढेच नाही तर चुलीचीही पूजा करत असे ज्यामुळे वर्षभर या वस्तूंपासून आपल्याला सुख व समृद्धी मिळो. . सरस्वती विसर्जनही आजच आहे. नवमीस श्रवण नक्षत्रावर जप होम समाप्त करून नवमीस व्रत, जागर, यथाविधी बलिदान (कोहळ्याचे) करावे .त्यामुळे ऐंश्र्वर्य प्राप्त होते. अश्र्विन शुक्ल नवमी रविवारी सकाळी 07:41 पर्यंत आहे व सूर्योदय 06:38 ला आहे. म्हणून ही नवमीची तिथी लक्ष्मी, विद्या, जय, इच्छिणार्यांसाठी शुभ आहे. 

 नवमीची तिथी रविवारी सकाळी 07:41 ला संपत असल्याने रविवारीच विजयादशमी म्हणजेच दसरा आहे. श्री प्रभूरामचंद्रानी श्रवण नक्षत्रावर प्रस्थान केले आहे. म्हणून त्या दिवशी व त्या नक्षत्रावर मनुष्यांनी सिमेचे उल्लंघन करावे अशी आपली प्रथा आहे. 

विजयादशमीला भक्तांना अभय देणार्‍या शमीयुक्त श्रीभगवंताचे पूजन करावे व पुन: शमीचे पूजन करावे. नंतर त्याच शमीचे मंत्र पूर्वक पूजन करून शमीवृक्षाच्या मुळातील ओली माती अक्षतासहित वाजत गाजत घरी आणावी.नंतर घरातील सर्वांनी नवीन वस्त्रे व आभूषणे धारण करावीत. या दिवशी नगराच्या राजाने आपल्या सैन्याला सैन्यवृद्धीकरिता व विजयाकरीता अनुक्रमाने निरांजनाने ओवाळुन  नगराच्या राजाने शुभकारक अशा खंजनपक्षाचे दर्शन  उदकाजवळ किंवा गाईंच्या गोठ्याजवळ घ्यावे. ( खंजन याचा अर्थ आकाशात जन्म घेणारा, जीत, विजेता, जयेश.) 

वरिलप्रमाणे विजयादशमीचा समारंभ आम्ही लहानपणापासून कोल्हापूर ला पाहत आलो आहोत. आजही हीच प्रथा कोल्हापूर येथील दसरा चौकात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे सिमोल्लंघनानंतर आपट्याची पाने एकमेकास देउन, प्रेमाने अलिंगन देऊन ढोल ताशांच्या गजरात हा दसरा मेळावा साजरा केला जातो. व या चौकाचे नांवही दसरा चौक आहे. या सिमोल्लंघनाचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांचे वंशज या कार्यक्रमात परंपरेने सहभाग घेत आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा सोने लुटण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. 

||शुभं – भवतु ||

 

One thought on “महानवमी व दसरा समारंभाचे महत्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *