Read In
शनिवार 24 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
शनिवार 24 आँक्टोबर 2020 आज चंद्ररास मकर अहोरात्र, चंद्र नक्षत्र श्रवण 26:37 पर्यंत. दुर्गाष्टमी. एकरात्रोत्सवारंभ, महानवमी उपवास.. ज्यांची कुलस्वामिनी श्रीमहालक्ष्मी, श्री तुळजाभवानी, किंवा श्री कालिमाता आहे त्यांनी आजचा महानवमीचा उपवास करावा.
रविचा चित्रा नक्षत्रातील कालावधी आज संपत असून 23:59 ला स्वाती नक्षत्रात प्रवेश करत आहे. स्वाती नक्षत्र हे राहूचे आहे. राहूच्या गुणधर्माविषयी माहिती आपण “राहूचा वृषभेतील प्रवेश “ या लेखात घेतली आहे. तरी त्यानुसार योजना आखाव्यात.
मेष:–श्रीदुर्गा आता तुम्हाला व्यवसायातील अडचणी दूर करण्याचा आशिर्वाद देणार आहे. राजकारणातील मंडळीना कायदेशीर मार्गाने प्रगतीचा मार्ग ओपन होईल.
वृषभ :–पाण्यापासून उद्भवलेल्या त्रासावर उपाय सापडेल. श्री जगदंबामाता संसारातील त्रास कमी करून आयुष्यात आनंद देणार आहे. उपासना अशीच सुरू ठेवा.
मिथुन :–विद्यार्थांना अभ्यासाबरोबर इतरही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. श्री महाकाली देवी तुमच्यातील आत्मविश्वासात वाढ होण्यासाठी आशिर्वाद देईल.
कर्क :–व्यवसायातील अडीअडचणीं दूर करण्यासाठी श्री दुर्गा मातेला प्रार्थना करा. व देवीच्या स्तोत्राचे वाचन करण्याचा संकल्प करा.
सिंह :–कालच रात्री रवीने स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे. उच्च शिक्षणासाठी अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळण्यासाठी श्री महाकाली देवीची प्रार्थना करा. तिच्या आशिर्वादाने अडचणी दूर होतील.
कन्या:–मनाला आनंद व समाधान देणार्या घटना घडतील. विवाहेच्छूंना प्रेमातील व्यवहारातील घाई त्रासदायक ठरेल. शांततेने घ्या. श्री महालक्ष्मी देवीचा आशिर्वाद घ्या.
तूळ :–नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्यावर विशेष जबाबदारी सोपवली जाईल. प्रतिष्ठेला बाधा आणणार्या गोष्टींपासून त्रास संभवतो. श्री महाकाली व श्री भैरवनाथाची उपासनेने सर्व अडचणी दूर होतील.
वृश्र्चिक :–वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करून प्रेम वृद्धींगत करण्याकरीता श्री महाकाली देवीला प्रार्थना करा व श्रीमहालक्ष्मी ची उपासनेने इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करा.
धनु :–मान्यवर गुरूवर्यांकडून अपेक्षित सल्ला मिळेल व अध्यात्मिक प्रगतीचा आशिर्वाद ही मिळेल. आजच्या महानवमीला दैवी उपासनेचे बळ कळेल.
मकर :–कष्टप्रद जीवनावर श्री महालक्ष्मी देवीचा आशिर्वाद मिळेल. नोकरी व्यवसायाच्या नव्या दिशा सापडतील. बेरोजगारांचा उत्पन्नाचा स्त्रोत सुरू होईल. श्री महाकाली च्या कृपेने मार्ग मोकळे होतील.
कुंभ :–जून्या आजारावर आराम पडत असल्याची जाणिव होईल. श्री दुर्गा मातेची प्रार्थना करून संकल्पाने जपास सुरूवात करा. आईवडिलांची चिंता कमी करणार्या गोष्टी घडतील.
मीन :–श्री गुरूकृपेची आंस लागलेल्या साधकांना दैवी चमत्काराचा अनुभव येईल. सामाजिक स्तरावर मानसन्मान वाढेल. श्री आई जगदंबेच्या कृपेने आरिष्ट दूर होईल व त्याची जाणिवही होईल.
|| शुभं – भवतु ||
Thank you Tai