Read In
शुक्रवार 23 आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.
आज चंद्ररास धनु 07:01 पर्यंत व नंतर मकर चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 25:27 पर्यंत व नंतर श्रवण.
आज महालक्ष्मी पूजन असून, याच दिवशी
मेष :–:महिलांना मातृसुखाचा आनंद मिळेल. व्यवसाय व लघुउद्ध्योग यातूनआर्थिक बाजू चांगलीच वर येईल. कुटुंबात एकवाक्यता येऊन वातावरणात समाधान राहिल. नोकरीत वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल.
वृषभ :–तुमच्या स्वभावातील चोख व्यवहारीपणा सर्वानाच जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्या. अचानक आलेल्या संकटाला धाडसाने सामोरे जाल. वडीलांचे नॉलेज बघून त्यांच्याविषयी पूर्वीपेक्षा जास्त आदर निर्माण होईल.
मिथुन :–संधीवात, हाडांचे दुखणे असणार्यांनी वेळेवर इलाज करावा दुर्लक्ष करू नये. विद्यार्थी वर्गाला कष्टाचे महत्व कळेल. नोकरीत आपले कौशल्य पणास लावता येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करता येणार आहेत.
कर्क :–तरूणांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. विवाहेच्छूना विवाह जुळवण्याच्या कामात अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागेल. अवघड काम पूर्ण करताना नाकी नऊ येतील.
सिंह :–इतरांबरोबर बोलताना तोंडात मध ठेवावा लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना दूर करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही. नवीन घराची कागदपत्रे नीट तपासून पहा वमगच व्यवहार करा.
कन्या :–कुटुंबात तुमच्या शब्दाला वजन राहील. व्यवसायात उधारी व वसुली यांचा मेळ बसणार नाही. मनातील जून्या इच्छा पूर्ण करण्याची स्वप्ने बघाल. नोकरीत सहकार्यांची चांगली मदत मिळेल. प्रवास जपून करावा.
तूळ :–कवी व साहित्यकांना वेगळेच दालन खुले होईल. विद्यार्थ्यांना व तरूणांना खरे बोलण्याचे महत्व कळेल तरूणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. आपले मत मांडताना योग्य शब्दांचा वापर करा.
वृश्र्चिक :–नोकरीत आपली पात्रता सिद्ध करण्याची. संधी मिळेल. वडिलांकडील नात्याची काळजी वाढेल. व आर्थिक मदत करावी लागेल. कोणत्याही चर्चेस आज वादाचे रूप येईल तरी शांत रहावे.
धनु :–लहान मुलांना आपल्या बुद्धीची चुणूक दाखवण्याची संधी मिळेल. तरूणांचे मनातील ओठावर येईल व अडचणीत सापडतील तरी मनाला आवर घालावा. कोणतेही आजारपण दूर होण्यासाठी प्रथम डांक्टरांवर श्रद्धा ठेवा.
मकर :–मनाला प्रसन्न करणार्या गोष्टी घडतील. कुटुंबात मंगलकार्याचे नाद उमटतील. अपत्यप्राप्तीच्या इच्छुकांना गुरूकृपेचा लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्यांना श्री गुरूमाऊलीकडून आशिर्वाद मिळेल.
कुंभ :–मित्रांमुळे संकटातून सहीसलामत बाहेर पडाल. कामातील अचूकतेमुळे कामात एकही चूक निघणार नाही. कायद्याची मदत आत्ता घेऊ नका. घरातील नात्यात संशयाचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास होईल.
मीन :–घरगुती समस्यांमुळे मनाचा गोंधळ उडेल. कुटुंबियांना आपलेसे करून वास्तवाचा विचार केल्यास नात्यात वितूष्ट येणार नाही. भूतकाळातील घटनांना प्राधान्य देऊ नका. व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल होऊ लागतील.
|| शुभं – भवतु ||
Dhanyawad Tai
Tai Aabhari Aahe
thank you…