sapasathi siddhi mantra

सप्तशती च्या ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती लेख 5

Read In

 

श्री दुर्गायै नम:

श्री प्तशती ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती

**  वैयक्तिक कारणांसाठी करावयाचे सिद्ध मंत्र. **

sapasathi siddhi mantra

मंत्र तेरावा :–स्वत :चे संरक्षण होण्यासाठी.

मंत्र :–शूलेन पाहि नो देवि पाहि खङ्गेन चाम्बिके |

घण्टास्वनेन न: पाहि  चापज्यानि :स्वनेन च ||

माहिती  :--आपले सर्व प्रकारे  प्रत्येक संकटापासून रक्षण होण्यासाठी या मंत्राचा जप आपल्या राहत्या घरीच रोज करावयाचा आहे. श्री जगदंबे मोर बसून प्रथम संकल्प करून 108 वेळा जप करून मग रोज ठराविक वेळी हा जप करावा.

 

मंत्र चौदावा :--दारिद्र्य आणि दु:ख यांचा नाश होऊन जीवनात सुख मिळण्यासाठी.

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो:|

स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि |

दारीद्र्यदु:खभयहारिणि का त्वदन्या

सर्वोपकारकरणाय सदाSSर्द्रचित्ता ||

माहिती  :--मनुष्याला आपले दु:ख, व्यथा, दारिद्र्य कमी होऊन सुखी होण्याची आस असते. तसेच मानसिक शांती मिळून कुटुंबात सुख व आर्थिक स्थैर्यासाठी या मंत्राच्या जपाने आश्र्चर्यजनक लाभ होतो. ज्या व्यक्तीसाठी हा जप करावयाचा आह े त्याच्यासाठी त्याच्या जवळच्या ९ जणांनी शुचिर्भूत होऊन त्याचे नांव घेऊन देवी श्री जगदंबा आईसमोर बसून संकल्पकरावा. सर्वांनी गोलाकार बसून मध्यभागी शुद्धोदकाने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवावा. वरील मंत्र मोठ्या आवाजात शुद्ध व स्पष्ट उच्चारात १०८ वेळा जप करावा. जपान तर हे जपाने अभिमंत्रित झालेले जल यजमानास प्यावयास द्यावे व जपास सहाय्य केलेल्यांना द्यावे व श्री जगदंबे नमस्कार करावा.

 

मंत्र पंधरावा :--सौख्य, इष्टकार्याची सिद्धी  व जीवनाचे कल्याण होण्यासाठी.

सर्वमंङ्गलमाङ्ल्ये शिवे सर्वार्थसाधिके |

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोSस्तुते ते ||

माहिती :– मनातील ईच्छा आकाक्षांची पूर्तता होऊन, जीवनात सुख प्राप्ती मिळून आयुष्याचे कल्याण होण्यासाठी हा मंत्र खूपच महत्वाचा आहे. कोणत्याही कार्याची सुरूवात करताना, त्यात यश मिळण्यासाठी श्री महालक्ष्मीला नमस्कार करून संकल्प करावा व या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. दुसरे दिवशी आसून रोज सकाळी किमान ८ वेळा व ज्याना शक्य असेल त्यांनी २७, ५४, ८१, किंवा १०८ वेळा जप करावा. योजलेल्या कार्यात यश मिळून जीवन समृद्ध होईल.

 

(संदर्भग्रंथ: 1)निर्णयसिंधु राजेश प्रकाशन पुणे..2)  श्री दुर्गा सप्तशती सौंनंदा ठाकूरधार्मिक प्रकाशन संस्था मुंबई 4

||  शुभं – भवतु ||

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *