Read In
श्री दुर्गायै नम:
श्री सप्तशती ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती
श्री सप्तशती ग्रंथातील सिद्ध मंत्रांची माहिती लेख सहावा.
मंत्र अकरावा :–विश्र्वाच्या हितकारक प्रगतीसाठी लाभदायक.
विश्र्वेश्र्वरि त्वं परिपासि विश्र्वं
विश्र्वात्मिका धारयसीति विश्र्वम् |
विश्र्वेशवन्द्धा भवती भवन्ति
विश्र्वाच्या ये त्वयि भक्तिनम्रा: ||
:–((विश्र्वाच्या उत्पत्तीपासून ते आजच्या काळाचा विचार केला तर सर्वच क्षेत्रात विश्र्वामध्ये प्रचंड घडामोडी सुरू आहेत. नैसर्गिक घडामोडींना सुद्धा मानव कारणीभूत आहेच पण प्रगतीच्या व संशोधनाच्या मागे लागून मानव करत असलेल्या प्रयत्नाने सार्या विश्र्वांवर परिणाम होत आहे.म्हणून या जगाच्या हितासाठी वधरणीमातेच्या रक्षणासाठी हा मंत्र))
माहिती :–जगाती होणारी प्रगती ही सर्व मानवजातीला, प्राणिमात्रांना व पशुपक्षांना सुखकारक हितकारक होऊ दे. असे म्हणून आई जगदंबेची प्रार्थना करावा व्या मंत्राचा सामूहिक जप करावा.
मंत्र बारावा:–कोणत्याही प्रकारच्या संकटाचे निवारण होण्यासाठी.
शरणागतदिनार्तपरित्राण पारायणे
नमसर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमो Sस्तु ते ||
माहिती :–प्रत्येकाच्या वैयक्तिक, सामाजिक व सामूहिक संकटांचे, अडचणींचे निवारण होण्यासाठी या मंत्राचा चांगला व शीघ्रलाभ होतो. या मंत्रांच्या जपाने श्री नारायणाची नारायणी शक्ती मदत करते. व कोणत्याही संकटाचे निवारण होते. हा जप श्री महाकाली, श्री जगदंबेच्या मंदिरात करावयाचा असतो. प्रथम संकल्प करून, रोजची ठरावीक वेळ ठरवून सामूहिक पद्धतीने 108 च्या पटीत हा जप करावा.
वरील मंत्र क्रमांक 1 ते 12 हे अखिल मानव जातींच्या, विश्र्वाच्या रक्षणासाठी व प्रगतीसाठी वेयक्तीक व सामूहिक पद्धतीने करावयाचे आहेत..
आता आपण आपले वैयक्तिक जीवन सुखकर करून आपल्या संकटांचे निराकरण करण्यासाठीचे जे मंत्र आहेत त्यांचा अभ्यास करूया.
************************************* ********,***********************************
Upaukta Mahiti